छत्रपती संभाजीनगर येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये सुरू असलेल्या अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या ४७ व्या राष्ट्रीय स्पर्धेत महावितरणने कुस्तीच्या १० वजन गटामध्ये ५ सुवर्ण व २ रौप्य पदकांची कमाई करीत सांघिक विजेतेपद मिळवले. तर महावितरणच्या खो-खो संघाने या स्पर्धेवर एकतर्फी वर्चस्व ठेवत विजेतेपदकाची अपेक्षित कमाई केली. तसेच बास्केटबॉलच्या अंतिम लढतीत पंजाब संघाने विजेतेपद मिळवले. एमएसईबी होल्डिंग कंपनीद्वारे आयोजित या राष्ट्रीय स्पर्धेत शुक्रवारी कुस्तीच्या १० वजनगटामध्ये शुक्रवारी (दि. ८) अंतिम सामने झाले. यात विविध वजनगटानुसार अनुक्रमे विजेते व उपविजेते पुढीलप्रमाणे. ५७ किलो- १) सुदर्शन पाटील (महावितरण) व जर्नेलसिंग (हिमाचल प्रदेश), ६१ किलो- अश्विन मोरे (महावितरण) व सुरेश कुमार (हरियाणा), ६५ किलो- राजकुमार काळे (महावितरण) व अजय कुमार (हिमाचल प्रदेश), ७० किलो- रणवीरसिंग (पंजाब) व आनंद नागरगोजे (महावितरण), ७४ किलो- सुखबीरसिंग (हिमाचल प्रदेश) व नरेंदरसिंग (पंजाब), ७९ किलो- अखिल मुजावर (महावितरण) व शेरोसिंग (पंजाब), ८६ किलो- अजय कुमार (हिमाचल प्रदेश) व दीपक कुमार (राजस्थान), ९२ किलो- बलवीरसिंग (हिमाचल प्रदेश) व अरूण गौड (हरियाणा), ९७ किलो- अमोल गवळी (महावितरण) व मदन (हरियाणा), १२५ किलो- विजेंदरसिंग (हिमाचल प्रदेश) व प्रमोद ढेरे (महावितरण). महावितरण विरुद्ध हरियाणा पॉवर संघामध्ये खो-खोची अंतिम लढत झाली. यात भारतीय खो-खो संघाचा कर्णधार प्रतिक वाईकर याच्यासह निशिकांत शिंदे, विराज कोटमकर, महेंद्र पाटील यांनी महावितरणच्या आक्रमण व संरक्षणामध्ये आक्रमकता कायम ठेवली आणि हरियाणा पॉवर संघाचा दोन गुण आणि एक डाव राखून एकतर्फी विजय मिळवला. कबड्डीमध्ये महावितरणने अंतिम फेरीत प्रवेश केला असून तुल्यबळ व मागील विजेता हिमाचल प्रदेशशी लढत होणार आहे. महावितरणने बीएसईएस दिल्ली संघाचा ३६ विरुद्ध १० असा एकतर्फी पराभव करीत अंतिम फेरी गाठली. तर हिमाचल प्रदेशने हरियाणा पॉवर संघाचा ४८ विरुद्ध २८ असा पराभव करीत अंतिम फेरीमध्ये महावितरणला आव्हान दिले आहे. बास्केटबॉलच्या अंतिम सामन्यात पंजाब संघाने (४५) हरियाणा संघाला (३०) १५ गुणांनी विजय मिळवत स्पर्धेतील विजेतेपद मिळवले. पंजाबकडून हरप्रित सिंग यांनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर तृतीय स्थानासाठी अत्यंत चुरशीच्या व शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा निर्माण झालेल्या बास्केटबॉलच्या लढतीत महावितरण संघाने (२३) राजस्थान संघाचा (२१) केवळ २ गुणांनी पराभव केला. महावितरणकडून भारत मराठे यांनी शेवटच्या क्षणाला दोन गुणांची कमाई करीत संघाला विजयी केले. या लढतीत कृष्णा लाड, किशोर सपकाळे यांनीही चमकदार कामगिरी केली.
Source link
विद्युत कंपन्यांची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा:खो-खो, कुस्तीमध्ये महावितरणच्या संघाला विजेतेपद; बास्केटबॉलच्या अंतिम लढतीत पंजाबची बाजी
- Advertisment -
- Advertisment -
ताज्या बातम्या
daily horoscope 8 july 2026 taurus gemini income news
15 तासांपूर्वीकॉपी लिंक8 जुलै, बुधवार रोजी वृषभ राशीच्या लोकांसाठी लाभदायक ग्रहस्थिती राहील. नोकरदार लोकांना महत्त्वाचे पद मिळू शकते. सिंह राशीच्या लोकांसाठी रिअल इस्टेटशी...
प्रतिका रावल जखमी, लॉर्ड्स कसोटीतून बाहेर:प्रिया पुनिया दीड वर्षानंतर परतली; इंग्लंडची टॅमी ब्यूमोंट शेवटचा...
भारतीय महिला संघाची सलामीवीर प्रतिका रावल लॉर्ड्स कसोटीतून बाहेर पडली आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे ती इंग्लंडविरुद्धची एकमेव कसोटी खेळू शकणार नाही. तिच्या जागी प्रिया...
काळा चणा, आरोग्याचा खजिना:स्वस्त सुपरफूड, झिंक, मॅग्नेशियमने परिपूर्ण; आहार तज्ञांकडून जाणून घ्या, कुणी खाऊ...
काळा चणा एक स्वस्त आणि पौष्टिक सुपरफूड आहे, जो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात प्रोटीन, फायबर, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अनेक आवश्यक जीवनसत्त्वे-खनिजे...
महाराष्ट्रात ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य:प्रवासी सुरक्षेसह भाषिक स्वाभिमानाचा नवा अध्याय, महाराष्ट्र मोटार वाहन नियमात सुधारणा
"मराठी ही कोणाला दूर करणारी भाषा नाही, तर माणसाला माणसाशी जोडणारी भाषा आहे." या भावनेतून महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी...
प्रतिका रावल जखमी, लॉर्ड्स कसोटीतून बाहेर:प्रिया पुनिया दीड वर्षानंतर परतली; इंग्लंडची टॅमी ब्यूमोंट शेवटचा...
भारतीय महिला संघाची सलामीवीर प्रतिका रावल लॉर्ड्स कसोटीतून बाहेर पडली आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे ती इंग्लंडविरुद्धची एकमेव कसोटी खेळू शकणार नाही. तिच्या जागी प्रिया...
काळा चणा, आरोग्याचा खजिना:स्वस्त सुपरफूड, झिंक, मॅग्नेशियमने परिपूर्ण; आहार तज्ञांकडून जाणून घ्या, कुणी खाऊ...
काळा चणा एक स्वस्त आणि पौष्टिक सुपरफूड आहे, जो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात प्रोटीन, फायबर, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अनेक आवश्यक जीवनसत्त्वे-खनिजे...
‘चुकीचे काम करणाऱ्यांवर टीका व्हायलाच पाहिजे’:अयोध्येतील देणगी चोरीवर अनुपम खेर म्हणाले- यामुळे लोकांच्या श्रद्धेवर...
चित्रपट अभिनेते अनुपम खेर मंगळवारी अयोध्येत पोहोचले. येथे त्यांनी सर्वप्रथम हनुमानगढी आणि राम जन्मभूमीत दर्शन-पूजन करून भगवान राम आणि बजरंगबलीचा आशीर्वाद घेतला. यानंतर...
भारतात 7 दिवसांनंतर स्वस्त मिळतील UKची व्हिस्की व कार:15 जुलैपासून लागू होईल मुक्त व्यापार...
भारतात यूकेच्या गाड्या, व्हिस्की, कपडे आणि पादत्राणे ७ दिवसांनंतर स्वस्त मिळतील. कारण, भारत-यूके दरम्यानचा मुक्त व्यापार करार १५ जुलैपासून लागू होईल. म्हणजेच या...































