राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व कायदेविषयक प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांना विविध शासकीय योजनांचा प्रभावी लाभ मिळावा यासाठी राज्य शासनाने “एकल महिला धोरण” तयार करण्यात येणार असल्याचे महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सांगितले. राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या , राज्यातील विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित, अविवाहित तसेच एकट्याने संसाराचा भार सांभाळणाऱ्या महिलांच्या समस्या शासन स्तरावर प्रभावीपणे मांडून त्यांच्यासाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता होती. महिला व बाल विकास विभागाने यासंदर्भात शासन निर्णय जारी करून मसुदा समिती गठीत केली असल्याचे श्रीमती बोर्डीकर यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केलेल्या घोषणेनुसार या धोरणासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये एकल महिलांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून त्याच्या आधारे सक्षमीकरणासाठी उपाययोजना आखण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या समितीत विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे. समिती एकल महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी धोरणात्मक शिफारसी करणार असून अंमलबजावणीतील अडचणी दूर करण्यासाठी उपाययोजना सुचविणार आहे. “राज्यातील एकल महिलांना सन्मानाने जगता यावे, त्यांना शासकीय योजनांचा प्रभावी लाभ मिळावा आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, यासाठी शासन कटिबद्ध आहे. हे धोरण महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.” समितीचे कामकाज व समन्वय महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे यांच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे ही बोर्डीकर यांनी यावेळी सांगितले. कर्करोगविरोधी लढ्यात सहभागी व्हा – आबिटकर दुसरीकडे, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी राज्यातील सर्व शासकीय, खासगी कर्करोग रुग्णालये व सेवाभावी संस्थांना कर्करोगविरोधी लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. कर्करुग्ण संख्या वाढत आहे. कर्करोग उपचारांमध्ये अर्ली डिटेक्शन म्हणजेच सुरुवातीच्या टप्प्यात निदान होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कर्करोग प्रारंभीच्या अवस्थेत आढळल्यास रुग्ण बरा होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे राज्यभर जनजागृती, निदान व उपचार या त्रिसूत्रीच्या आधारे कर्करोगा विरोधात लढाई सुरू आहे. कर्करोग तपासणीसाठी राज्यातील आठ परिमंडळात प्रत्येक एक कर्करोग निदान व्हॅन द्वारे तपासणी सुरू असून, आतापर्यंत तीन कोटीपेक्षा अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. कर्करुग्णांच्या उपचारासाठी राज्यात 27 ठिकाणी डे केअर युनिट सुरू करण्यात येत आहेत, असे ते म्हणाले.
Source link
एकल महिला धोरणासाठी मसुदा समिती:सर्वेक्षण करून त्या आधारावर उपाययोजना आखणार, मंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
डियॉर-गुच्ची देखील स्वीकारत आहेत भारतीय हस्तकला:भारतीय वस्त्रोद्योगाचे नवे पर्व; जग स्वीकारत आहे, असे करा...
भारतीय हँडलूम आता फक्त लग्न आणि सणांपुरते मर्यादित राहिलेले नाही. चंदेरी, जामदानी, इकत, कोटपद आणि कांजीवरम यांसारखे पारंपरिक वस्त्र आता ऑफिस वेअर, कॅज्युअल...
गायक गिप्पी गरेवालच्या घरावर गोळीबार:लॉरेन्स टोळीने म्हटले होते – सलमानला सांगा येऊन वाचवावे, गायकाने...
पंजाबचे लोकप्रिय गायक आणि अभिनेते रुपिंदर सिंग उर्फ गिप्पी ग्रेवाल यांच्या कॅनडा येथील घरावर 2023 साली गोळीबार झाला होता. काही काळानंतर लॉरेन्स गँगने...
फुली सेल्फ ड्राइव टेस्ला मॉडेल YL ची डिलिव्हरी सुरू:6 सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही एका चार्जवर...
एलन मस्कची EV कंपनी टेस्ला इंडियाने भारतात आपली सर्वात लांब इलेक्ट्रिक SUV मॉडेल YL ची डिलिव्हरी सुरू केली आहे. ही भारतात टेस्लाची पहिली...
पाक राष्ट्रपती झरदारी म्हणाले- वाराणसीतील गंज शहीदा मशीद धोक्यात:भारताला कारवाई थांबवण्याचे आवाहन
पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी भारतातील मुस्लिम धार्मिक स्थळांबाबत चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रपती कार्यालयाने शनिवारी त्यांचे निवेदन जारी केले. निवेदनात...
डियॉर-गुच्ची देखील स्वीकारत आहेत भारतीय हस्तकला:भारतीय वस्त्रोद्योगाचे नवे पर्व; जग स्वीकारत आहे, असे करा...
भारतीय हँडलूम आता फक्त लग्न आणि सणांपुरते मर्यादित राहिलेले नाही. चंदेरी, जामदानी, इकत, कोटपद आणि कांजीवरम यांसारखे पारंपरिक वस्त्र आता ऑफिस वेअर, कॅज्युअल...
गायक गिप्पी गरेवालच्या घरावर गोळीबार:लॉरेन्स टोळीने म्हटले होते – सलमानला सांगा येऊन वाचवावे, गायकाने...
पंजाबचे लोकप्रिय गायक आणि अभिनेते रुपिंदर सिंग उर्फ गिप्पी ग्रेवाल यांच्या कॅनडा येथील घरावर 2023 साली गोळीबार झाला होता. काही काळानंतर लॉरेन्स गँगने...
फुली सेल्फ ड्राइव टेस्ला मॉडेल YL ची डिलिव्हरी सुरू:6 सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही एका चार्जवर...
एलन मस्कची EV कंपनी टेस्ला इंडियाने भारतात आपली सर्वात लांब इलेक्ट्रिक SUV मॉडेल YL ची डिलिव्हरी सुरू केली आहे. ही भारतात टेस्लाची पहिली...
गुगलने अमेरिकेत सर्च एजंट सादर केला:पार्श्वभूमीवर 24 तास एआय काम करेल; अपडेट्सवर त्वरित अलर्ट...
25 वर्षांपासून इंटरनेटवर काहीही शोधण्याची पद्धत जवळपास सारखीच राहिली आहे. जेव्हाही कोणत्याही प्रोडक्टची, फ्लाइट तिकिटाची किंवा एखाद्या बातमीची माहिती हवी असते, तेव्हा आपल्याला...