Homeमहाराष्ट्रसाहित्य परिषदेच्या निवडणूकीत सत्तापालट:विद्यमान कार्यकारिणीला पराभवाचा धक्का, प्रमुख पदांवर विरोधी पॅनेलचा विजय

साहित्य परिषदेच्या निवडणूकीत सत्तापालट:विद्यमान कार्यकारिणीला पराभवाचा धक्का, प्रमुख पदांवर विरोधी पॅनेलचा विजय

साहित्य संस्थांची आद्य संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताबदल झाला. सत्ताधारी परिवर्तन उत्कर्ष पॅनेलला पराभवाची धूळ चारत साहित्य संवर्धन आघाडीने साहित्य परिषदेच्या प्रमुख पदांवर विजय मिळवला. एकूण 31 जागांपैकी 24 जागा विद्यमान सदस्यांना मिळाल्या, तर 7 जागा विरोधी पॅनेलला मिळाल्या. अध्यक्षपदी साहित्य संवर्धन आघाडीचे योगेश सोमण विजयी झाले. प्रमुख कार्यवाहपदी स्वाती महाळंक तर कोषाध्यक्ष पदी प्रदीप निफाडकर विजयी झाले. टिळक रस्त्यावरील साहित्य परिषदेच्या कार्यालयात मतमोजणीला रविवारी सकाळी साडेअकरा वाजता सुरूवात झाली. रात्री 9.30 वाजता निकाल जाहीर करण्यात आला. साहित्य परिषदेचे कार्यक्षेत्र असलेल्या पुण्यासह अकरा जिल्ह्यांत ‘मसाप’चे 16 हजार 607 मतदार होते. यापैकी 10 हजार 901 इतक्या सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण वैध मते 10 हजार 713 तर 188 मते अवैध ठरले. मतमोजणीत उत्कर्ष परिवर्तन आणि साहित्य संवर्धन या दोन पॅनेमध्ये अखेरपर्यंत चुरस पहायला मिळाली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी 2021 मध्ये करोनाचे कारण देऊन सर्वसाधारण सभेत निवडणुकीऐवजी पाच वर्षांसाठी मुदतवाढ घेतली. यापूर्वी साहित्य परिषदेची निवडणूक 2016 मध्ये झाली होती. मुदतवाढीमुळे विद्यमान कार्यकारिणीकडे दहा वर्षे परिषदेच्या कारभाराची सूत्रे होती. मतमोजणीला सकाळपासूनच 7 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात विश्रामबाग पोलिस ठाण्याचे 3 पोलिस आणि 4 होमगार्ड यांचा समावेश होता. प्रत्येक फेरीदरम्यान कुणाला किती मते पडली हे शेवटच्या क्षणापर्यंत गुलदस्यात ठेवण्यात आले होते. सुरुवातीला पुणे जिल्हा आणि शहर प्रतिनिधी पदासाठीची मतमोजणी घेण्यात आली. जिल्हा व शहर कार्यवाह पदासाठी 1 हजार 506 सदस्यांनी मतदान केले. सुरुवातीपासून साहित्य संवर्धन आघडीचे वर्चस्व मतमोजणीत दिसून आले. 8 फेऱ्यापर्यंत हेच पॅनल 1300/1400 मतांनी आघाडी होते. शेवटच्या काही फेऱ्यात मताधिक्य कमी झाल्याने उमेदवारांची धडधड वाढली. निवडून आलेले उमेदवार अध्यक्ष : योगेश सोमण
प्रमुख कार्यवाह : स्वाती महाळंक
कोषाध्यक्ष : प्रदीप निफाडकर जिल्हा प्रतिनिधी सातारा : नंदकुमार सावंत
अलका बेडकीहाळ
अमर सिह पाटणकर
सोलापूर : पद्माकर कुलकर्णी
कल्याण शिंदे
डॉ. श्रुती वडगबाळकर
सांगली : दीपक स्वामी
कोल्हापूर : राजन मुठाणे
कोकण : अरुण इंगवले
नशिक : उन्मेश गायधनी
प्रकाश होळकर
अहिल्यानगर : जयंत येलूलकर
डॉ. गणेश भगत
जळगाव : डॉ. वासुदेव वले
गणेश आढाव
ठाणे : सुरेश देशपांडे
भिकू बारस्कर
पुणे : राजन लाखे
पुरूषोत्तम काळे
प्रभाकर ओव्हाळ
धुळे-नंदुरबार : प्राचार्य संजीव गिरासे स्थानिक कार्यवाह
सुनील महाजन
अंजली कुलकर्णी
सुनेत्रा मंकणी
प्रसाद मिरासदार
माधव राजगुरू
नितीन संगमनेरकर
आशुतोष जावडेकर प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते
अध्यक्ष : योगेश सोमण- 5 हजार 365
प्रा. मिलिंद जोशी- 5 हजार 320
मताधिक्य- 45 प्रमुख कार्यवाह
स्वाती महाळक : 5 हजार 414
सुनीताराजे पवार : 5 हजार 285
मताधिक्य : 129 कोषाध्यक्ष
प्रदीप निफाडकर : 5 हजार 536
विनोद कुलकर्णी : 5 हजार 168
मताधिक्य : 368 साहित्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष योगेश सोमण म्हणाले, साहित्य परिषदेची निवडणूक अतिशय चूरशीची झाली. सर्व आजीव सभासदांनी यावेळी भरभरून मतदान केले. साहित्यप्रेमीचा चांगला पाठिंबा मिळाला. निवडणुकीत सहभागी असलेल्या सर्व घटकांचे आभार.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!