दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मोठा कायदेशीर दिलासा मिळाला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानंतर सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) विशेष न्यायालयानेही त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे २०१६ सालापासून सुरू असलेल्या प्रकरणात तब्बल १० वर्षांनी भुजबळांनी यश मिळवले आहे. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीतून बाहेर पडून ते २ जुलै २०२३ रोजी सत्तेत सहभागी झाले होते. त्यानंतर ९३६ दिवसांनी भुजबळांची या आरोपांमधून पूर्णत: मुक्तता झाली. शुक्रवारी विशेष पीएमएलए न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी भुजबळांसह इतर आरोपींचे निर्दोष मुक्ततेचे अर्ज मान्य केले. ‘मूळ गुन्हा नसेल तर ईडीचा खटला चालू शकत नाही’ या तांत्रिक मुद्द्यावर न्यायालयाने हा निकाल दिला. यात ईडीने भुजबळ, त्यांचे पुत्र पंकज आणि पुतणे समीरवर मनी लाँड्रिंगचे आरोप केले होते. हा सापशिडीचा खेळ आहे- छगन भुजबळ छगन भुजबळांवर असा आरोप होता की, महाराष्ट्र सदनाचा मूळ खर्च १३.५ कोटींचा होता. तो त्यांनी ५० कोटींवर नेला. विविध कंपन्यांकडून १३.५ कोटींची लाच घेतली. इतर कामांमधून सुमारे १९० कोटींचा नफा मिळवला. निकालानंतर भुजबळ म्हणाले की, तेलगी प्रकरण मला चिकटवण्यात आलं. त्या आरोपपत्रातही माझं नाव नसल्याचं स्पष्ट झालं. आताही या प्रकरणांमध्ये माझा दोष नसल्याचं समोर आलंय. हा सापशिडीचा खेळ आहे. राजकीय लाभ होण्याची अधिक शक्यता भुजबळांच्या मुक्ततेचे दूरगामी राजकीय परिणाम होणार आहेत. कॅबिनेट मंत्री म्हणून काम करताना विरोधकांकडून होणारी कोंडी आता फुटेल. ओबीसींचे प्रभावी नेते म्हणून भुजबळांचे वजन वाढेल. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, मूळ गुन्हा रद्द झाल्यास ईडीचा खटला टिकू शकत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. यामुळे मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात अडकलेल्या इतर राजकीय नेत्यांना मोठा कायदेशीर आधार मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मुख्य आधार भुजबळांच्या वकिलांनी सुनावणीत सर्वोच्च न्यायालयातील ‘विजय मदनलाल चौधरी विरुद्ध केंद्र सरकार’ खटल्यातील निर्णयाचा दाखला दिला. त्यानुसार एसीबीने दाखल केलेला मूळ गुन्हा रद्द झाला असेल, तर ईडीचा खटला स्वतंत्रपणे चालू शकत नाही. एसीबीने ९०० कोटींच्या अफरातफरीचा दावा केला होता. मात्र, हे सर्व निर्णय सामूहिक होते आणि लाच घेतल्याचे कोणतेही पुरावे नाहीत, हा भुजबळांचा दावा न्यायालयाने मान्य केला होता.
Source link
महाराष्ट्र सदन घोटाळा; भुजबळ मंत्री झाल्यावर 936 दिवसांनी निर्दोष:मूळ गुन्हा दाखल नसल्याच्या तांत्रिक मुद्द्यावर झाले मुक्त
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.
...
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...
हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...


























