Homeमहाराष्ट्रMaharashtra Rain, Orange Alert, Yellow Alert | अरबी समुद्रात चक्राकार वारे: तळ...

Maharashtra Rain, Orange Alert, Yellow Alert | अरबी समुद्रात चक्राकार वारे: तळ कोकणाला ऑरेंज अलर्ट, पुढील दोन दिवस पावसाचे; हवामान विभागाचा अंदाज – Mumbai News

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाला पूरक वातावरण निर्माण झाले असून, अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस होत आहे. तळ कोकण आणि किनारपट्टी भागांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भासाठी यलो अलर्ट देण्यात आल

?

अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय झाल्यामुळे येत्या पाच दिवसांत किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढणार असून, त्यानंतर हळूहळू तो कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्याच्या बहुतांश भागांत दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक मोठे प्रकल्प, तलाव आणि नद्यांमधील जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत सरासरी 93 टक्के पावसाची नोंद झाली आहे.

मराठवाड्यात यलो अलर्ट

प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार, पुढील तीन ते चार तासांत नांदेड जिल्ह्याच्या काही भागांत तुरळक पावसाची शक्यता आहे, तर छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड तसेच नाशिक, पुणे सातारा घाट परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई व कोल्हापूर घाट परिसरात पावसाचा यलो अलर्ट आहे. उत्तर महाराष्ट्र व विदर्भातही आज येलो अलर्ट देण्यात आला आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे.

पुढील दोन दिवस पावसाचे – हवामान विभाग

30 जून रोजी राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तळ कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासाठी हवामान विभागाने पावसाचा हायअलर्ट जारी केला आहे. तर 1 जुलै रोजी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, तळ कोकण, बहुतांश मध्य महाराष्ट्रातील जिल्हे आणि संपूर्ण विदर्भासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सावरकर मानहानी प्रकरण; पणतू म्हणाले- नेहरू ब्रिटिश समर्थक होते:सावरकरांनी इंग्रजांशी समझोता केला असता तर...

0
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू सात्यकी यांनी मंगळवारी पुणे येथील विशेष न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधात सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यात जबाब दिला....

पैठणमध्ये स्वाभिमानीचे शोले स्टाईल आंदोलन:साखर कारखान्याच्या 19 कोटी 50 लाखांच्या एफआरपीसाठी टाकीवर चढून आंदोलन

0
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याने 2025-26 च्या हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल 19 कोटी 50 लाख रुपयांची एफआरपी (FRP) थकविल्याच्या निषेधार्थ आज पैठणमध्ये...

17 ऑगस्टपर्यंत सूर्य कर्क राशीत:वृषभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल, प्रवासात लाभ होईल, कन्या राशीसाठी...

0
सूर्य मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत आला आहे. सूर्याच्या राशी बदलाला संक्रांती म्हणतात. काही हिंदी पंचांगानुसार कर्क संक्रांतीची तारीख 16 जुलै तर...

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...
spot_img

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...

फिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक चाहत्यांच्या परंपरा | नॉर्वे वायकिंग चांट आणि जपान स्वच्छताबोस्टन8 तासांपूर्वीलिंक कॉपी कराकाही दिवसांपूर्वी बोस्टनच्या एका गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर असे दृश्य...

पावसाळ्यामध्ये वाढतात फूड पॉयझनिंगचे रुग्ण:ही 7 लक्षणे दुर्लक्षित करू नका, डॉक्टरांकडून जाणून घ्या बचावासाठीच्या...

0
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते. यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस लवकर वाढतात. हेच कारण आहे की, या हंगामात फूड पॉयझनिंगचे प्रमाण जास्त असते....

‘प्रहार, द उज्ज्वल निकम स्टोरी’ लवकरच प्रदर्शित होणार:निकम म्हणाले- राजकुमारने माझी नक्कल केली नाही,...

0
राजकुमार राव अभिनीत 'प्रहार: द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या तयारीबद्दल आणि राजकुमारच्या मेथड ॲक्टिंगबद्दल स्वतः ज्येष्ठ वकील...
error: Content is protected !!