सर्व खेळाडूंना एकत्रितपणे, एकजुटीने व सहकार्याने खेळूनच विजयाला गवसणी घालावी लागते. त्यामुळे कोणत्याही संघात सर्वप्रथम संघभावना निर्माण झाली की प्रत्येकाच्या वैयक्तिक कौशल्याला संधी मिळते. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रामुख्याने विद्युत कंपन्यांमधील खेळाडूंचा सहभाग व नावलौकीक वाढत आहे, ही अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी बुधवारी (दि. ६) केले. बालेवाडी (पुणे) येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलमध्ये एमएसईबी होल्डिंग कंपनीद्वारे आयोजित अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या ४७व्या राष्ट्रीय कबड्डी, कुस्ती, खो-खो व बास्केटबॉलच्या तीन दिवसीय क्रीडास्पर्धेला प्रारंभ झाला. महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून या स्पर्धेचे उद्घाटन झाले. विद्युत कंपन्यांच्या या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्रासह गुजरात, हरियाणा, तेलंगाणा, राजस्थान, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली आदी राज्यांतील सरकारी व खासगी विद्युत कंपन्यांचे 41 संघ आणि सुमारे 538 महिला व पुरुष खेळाडू सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) सुनील काकडे, आयोजन समितीचे उपाध्यक्ष व मुख्य अभियंता अनिल कोलप (महापारेषण) व अशोक घाडगे, मुख्य अभियंता धनराज पेठकर, मुख्य महाव्यवस्थापक (मानव संसाधन) भूषण कुलकर्णी , मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके (महावितरण) व पुरुषोत्तम वारजुरकर (महानिर्मिती), विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष जिग्नेश राय, सरचिटणीस नरेश कुमार, उपाध्यक्ष भरत पाटील, खजीनदार ललित गायकवाड यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. विद्युत नियंत्रण मंडळाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा खऱ्या अर्थाने देशातील सर्व विद्युत कंपन्यांच्या खेळाडूंचे हक्काचे व्यासपीठ बनले आहे. सर्व विद्युत कंपन्या आणि त्यांच्या उत्कृष्ट खेळाडूंना देशपातळीवर एकत्र आणण्यासाठी या मंडळाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे, असे गौरवोद्गार संचालक पवार यांनी काढले. प्रादेशिक संचालक सुनील काकडे यांनी सांगितले, की विद्युत क्षेत्र धकाधकीचे आहे. त्यामुळे क्रीडा स्पर्धेतून कर्मचारी मानसिक व शारीरिकदृष्ट्या कणखर बनतात. यासह त्यांच्या मैदानातील शिस्तीने कार्यालयातील कार्यक्षमतेत देखील वाढ होते. अत्यंत नेत्रदीपक व उत्साहात झालेल्या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात सर्व खेळाडूंनी संचलन करीत पाहुण्यांना मानवंदना दिली. यावेळी काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत विविध राज्यांतील सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाचे खजिनदार ललित गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संतोष पाटणी, रामगोपाल अहीर, भक्ती जोशी, सोनाली बाविस्कर, स्वागती सोळंकुरे यांनी केले तर अशोक घाडगे यांनी आभार मानले.
Source link
विद्युत कंपन्यांची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा:महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांच्या हस्ते उद्घाटन; देशभरातील 41 संघ आणि 538 खेळाडू सहभागी
- Advertisment -
- Advertisment -
ताज्या बातम्या
सामरा नगरातील कुंटनखान्यावर पोलिसांची कारवाई:३ महिला, १ पुरुष आणि संचालिका ताब्यात
अमरावती येथील सामरा नगरात सुरू असलेल्या एका कुंटनखान्यावर राजापेठ पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत देहव्यापारात गुंतलेल्या तीन महिला, एक पुरुष ग्राहक आणि देहव्यापाराचे...
2027 मध्ये NEET परीक्षा 6 दिवस चालेल, संगणकावर आधारित असेल:1000 पेक्षा जास्त परीक्षा केंद्रे...
देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET-UG 2027 मध्ये किमान सहा दिवस चालेल. ही पूर्णपणे संगणक-आधारित चाचणी (CBT) पद्धतीने घेतली जाईल. परीक्षेसाठी देशभरात...
daily horoscope 8 july 2026 taurus gemini income news
15 तासांपूर्वीकॉपी लिंक8 जुलै, बुधवार रोजी वृषभ राशीच्या लोकांसाठी लाभदायक ग्रहस्थिती राहील. नोकरदार लोकांना महत्त्वाचे पद मिळू शकते. सिंह राशीच्या लोकांसाठी रिअल इस्टेटशी...
प्रतिका रावल जखमी, लॉर्ड्स कसोटीतून बाहेर:प्रिया पुनिया दीड वर्षानंतर परतली; इंग्लंडची टॅमी ब्यूमोंट शेवटचा...
भारतीय महिला संघाची सलामीवीर प्रतिका रावल लॉर्ड्स कसोटीतून बाहेर पडली आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे ती इंग्लंडविरुद्धची एकमेव कसोटी खेळू शकणार नाही. तिच्या जागी प्रिया...
प्रतिका रावल जखमी, लॉर्ड्स कसोटीतून बाहेर:प्रिया पुनिया दीड वर्षानंतर परतली; इंग्लंडची टॅमी ब्यूमोंट शेवटचा...
भारतीय महिला संघाची सलामीवीर प्रतिका रावल लॉर्ड्स कसोटीतून बाहेर पडली आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे ती इंग्लंडविरुद्धची एकमेव कसोटी खेळू शकणार नाही. तिच्या जागी प्रिया...
काळा चणा, आरोग्याचा खजिना:स्वस्त सुपरफूड, झिंक, मॅग्नेशियमने परिपूर्ण; आहार तज्ञांकडून जाणून घ्या, कुणी खाऊ...
काळा चणा एक स्वस्त आणि पौष्टिक सुपरफूड आहे, जो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात प्रोटीन, फायबर, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अनेक आवश्यक जीवनसत्त्वे-खनिजे...
‘चुकीचे काम करणाऱ्यांवर टीका व्हायलाच पाहिजे’:अयोध्येतील देणगी चोरीवर अनुपम खेर म्हणाले- यामुळे लोकांच्या श्रद्धेवर...
चित्रपट अभिनेते अनुपम खेर मंगळवारी अयोध्येत पोहोचले. येथे त्यांनी सर्वप्रथम हनुमानगढी आणि राम जन्मभूमीत दर्शन-पूजन करून भगवान राम आणि बजरंगबलीचा आशीर्वाद घेतला. यानंतर...
भारतात 7 दिवसांनंतर स्वस्त मिळतील UKची व्हिस्की व कार:15 जुलैपासून लागू होईल मुक्त व्यापार...
भारतात यूकेच्या गाड्या, व्हिस्की, कपडे आणि पादत्राणे ७ दिवसांनंतर स्वस्त मिळतील. कारण, भारत-यूके दरम्यानचा मुक्त व्यापार करार १५ जुलैपासून लागू होईल. म्हणजेच या...
































