महाराष्ट्र पोलिस भरती अंतर्गत राज्य राखीव पोलिस दलाच्या (SRPF) गट 5, दौंड येथील लेखी परीक्षेत एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका खाजगी प्रकाशनाच्या सराव पुस्तकातील 100 पैकी तब्बल 85 प्रश्न या परीक्षेत जसेच्या तसे विचारण्यात आले होते. विरोधी पक्षांनी यावर तीव्र आक्षेप घेतल्यानंतर, पोलिस भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे विभागाच्या पोलिस उपमहानिरीक्षकांनी तातडीने सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, अपर पोलिस महासंचालकांनी या संदर्भात एक अधिकृत पत्रक काढून दौंड येथील ही भरती प्रक्रिया तूर्तास स्थगित करण्याची घोषणा केली आहे. खाजगी प्रकाशकाच्या पुस्तकातील प्रश्न जसेच्या तसे आल्यामुळे यामागे काही मोठे रॅकेट किंवा संगनमत आहे का, याचा तपास आता पोलिस प्रशासनाकडून केला जात आहे. राज्य राखीव पोलिस बल (SRPF) गट क्रमांक 5, दौंड यांच्या अधिपत्याखाली सन 2024-25 मधील सशस्त्र पोलिस शिपाई भरतीसाठी 2 मे 2026 रोजी लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील 100 पैकी तब्बल 85 प्रश्न हे ‘महाराष्ट्र पब्लीकेशन पोलिस भरती प्रश्नपत्रिका सराव प्रश्नसंच 10’ मधील जसेच्या तसे असल्याचे तक्रारी आणि माध्यमांद्वारे समोर आले आहे. या प्रकारामुळे पोलिस भरती प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून उमेदवारांमध्येही असंतोष पसरला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस उपमहानिरीक्षक, राज्य राखीव पोलिस बल, पुणे यांच्यामार्फत 4 मे 2026 पासून सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत दौंड येथील ही संपूर्ण भरती प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या चौकशीचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतरच सत्य समोर येईल आणि त्यानुसार पुढील योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सुप्रिया सुळेंनी पोस्ट केला होता व्हिडिओ खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. त्यात एक तरुण क्लासचा प्रश्नपत्रिका संच व त्यातील आलेल्या प्रश्नांवर उहापोह करताना दिसून येत आहे. सुप्रिया सुळे याविषयी बोलताना म्हणाल्या, ‘राज्य राखीव पोलीस दला’च्या नुकत्याच झालेल्या परीक्षेत एका खासगी क्लासने टेलिग्राम या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर दिलेल्या नमुना प्रश्नपत्रिकेतील तब्बल 85 प्रश्न जसेच्या तसे आल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ जर खरा असेल तर हे अतिशय चिंताजनक आहे. कोणत्याही शासकीय नोकरीसाठी अनेक मुले जीवतोड मेहनत करीत असतात. आयुष्याची अनमोल वर्षे ही मुले परीक्षेच्या तयारीसाठी देतात. त्यामुळे या परीक्षा निष्पक्ष आणि संशयविरहित होणे आवश्यक आहे. परंतु जर असे प्रकार उघडकीस येत असतील तर परीक्षांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. एका खासगी क्लासच्या नमुना प्रश्नपत्रिकेतील एक दोन प्रश्न मूळ परिक्षेत येणे समजू शकते पण तब्बल 85 प्रश्न येण्याचा चमत्कार कसा घडला याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. माझी शासनाला विनंती आहे की कृपया आपण याची सखोल चौकशी करावी, असे सुळे म्हणाल्या. तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा खेळ – वडेट्टीवार दुसरीकडे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकरणी सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांच्या आयुष्याशी सरकार अक्षरशः खेळ करत आहे. आता हे उघडपणे दिसू लागले आहे. महाराष्ट्र पोलिस भरतीतील SRPF गट 5, दौंड येथील लेखी परीक्षा म्हणजे पारदर्शकतेचा विनोदच ठरला. तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी प्रश्नपत्रिका तयार करावी अशी अपेक्षा असताना, 100 पैकी तब्बल 85 प्रश्न एका खासगी प्रकाशनाच्या पुस्तकातून जसेच्या तसे उचलले गेले. मग ही परीक्षा होती की त्या पुस्तकाची ओपन बुक टेस्ट? ही चूक नाही, ही व्यवस्था ढासळल्याची स्पष्ट निशाणी आहे. पोलीस भरतीसारख्या संवेदनशील प्रक्रियेत असा प्रकार घडतो, म्हणजे आतूनच कुठेतरी साखळी जुळलेली आहे का असा प्रश्न निर्माण होतो. सरकारकडून केवळ घोषणा आणि जाहिराती. प्रत्यक्षात तरुणांच्या भविष्याशी खेळ सुरूच. 3977 मुलांनी प्रामाणिकपणे मेहनत घेऊन ही परीक्षा दिली. त्यांच्या स्वप्नांवर असा पाणी फेरणाऱ्यांना वाचवायचे की जबाबदारांना शिक्षा द्यायची, हा निर्णय आता सरकारने घ्यायचा आहे. अन्यथा पारदर्शक भरती हा शब्द केवळ पोस्टरपुरताच उरेल, असे वडेट्टीवार म्हणाले. केव्हा झाली परीक्षा? काय घडला प्रकार? एसआरपीएफ-5 या गटाची 100 गुणांची लेखी परीक्षा गत शनिवारी इंदापूरच्या एका महाविद्यालयात झाली. परीक्षेत प्रत्येकी 1 गुणाचे 100 प्रश्न होते. त्याच समान 100 प्रश्नांची क्रमवारी मागे – पुढे करून ए, बी, सी, डी असे प्रश्नसंच पुरविण्यात आले. चारही प्रश्नपत्रिकेत 85 प्रश्न एका खासगी प्रकाशनाच्या (महाराष्ट्र पब्लिकेशन) ‘पोलिस भरती 2026- 50 प्रश्नपत्रिका संच’ पुस्तकातील ‘सराव प्रश्नसंच 10’ या एकाच प्रश्नपत्रिकेतून उचलले आहेत. ‘सराव प्रश्नसंच 10’ या प्रश्नपत्रिकेतील सलग 85 प्रश्न एसआरपीएफच्या प्रश्नसंच ‘ए’मध्ये अगदी त्याच क्रमवारीनुसार आणि त्याच पर्यायांनुसार जसेच्या तसे घेण्यात आले आहेत. विद्यार्थी व पालकांमधून या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Source link
अखेर SRPF गट 5 अंतर्गत घेण्यात आलेली परीक्षा स्थगित:अपर पोलिस महासंचालकांकडून कारवाई; 100 पैकी 85 प्रश्न जसेच्या तसे छापून आले होते
- Advertisment -
- Advertisment -
ताज्या बातम्या
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.
...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
Gemini Financial Gain & Capricorn Promotion 2026
9 तासांपूर्वीकॉपी लिंकसोमवार, 2 नोव्हेंबर रोजी मिथुन राशीच्या नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नतीची शक्यता आहे आणि दीर्घकाळापासून रखडलेले पैसेही परत मिळू शकतात. मकर राशीच्या...
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...
हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
























