राज्यातील काही भागांमध्ये 17 ते 20 मार्च दरम्यान प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील नाकारता येत नाही. सध्याच्या अंदाजानुसार 18 ते 20 मार्च दरम्यान या हवामान घडामोडींची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. राज्यात सध्या हवामानाचा मोठा बदल पाहायला मिळत असून उष्णतेची लाट आणि अवकाळी पावसाचा दुहेरी फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः विदर्भ भागात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंशांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः अमरावती, वर्धा आणि अकोला या जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. उत्तर-पश्चिमेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानात वाढ होत असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, उष्णतेची लाट सुरू असतानाच 14 आणि 15 मार्चदरम्यान विदर्भात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे राज्यात तापमानात मोठे चढउतार दिसून येत आहेत. हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार 13 ते 16 मार्चदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. काही भागांत वादळी वारेही वाहू शकतात. दरम्यान मुंबई येथे उष्णतेची तीव्रता काहीशी कमी झाली असून गुरुवारी कमाल तापमान सुमारे 33 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. पुढील काही दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. 15 आणि 16 मार्चदरम्यान धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील इतर भागातही विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 72 तास हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पुढील 48 तास दमट आणि उकाड्याचे वातावरण कोकण किनारपट्टी भागातही उष्णतेचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तास दमट आणि उकाड्याचे वातावरण राहण्याचा अंदाज आहे. या भागासाठीही हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. काही ठिकाणी तापमान 39 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान वाढले असून पुढील 24 तासांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जोरदार वारे आणि गारपिटीचाही धोका दरम्यान, 17 ते 20 मार्चदरम्यान राज्यातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि गारपिटीचाही धोका नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाच्या अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची खबरदारी घ्यावी, असे कृषी विभागानेही सांगितले आहे.
Source link
संभाजीनगरसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान वाढले:पुढील 24 तासांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता
- Advertisment -
- Advertisment -
ताज्या बातम्या
स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.
...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...
हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

























