Homeमहाराष्ट्रदादांच्या निधनानंतर तिसऱ्याच दिवशी जर शपथविधी:दुःख आम्हीच व्यक्त करायचे? लक्ष्मण हाकेंचा सवाल;...

दादांच्या निधनानंतर तिसऱ्याच दिवशी जर शपथविधी:दुःख आम्हीच व्यक्त करायचे? लक्ष्मण हाकेंचा सवाल; बारामतीतून निवडणूक लढवण्याचे संकेत

अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीची निवडणूक बिनविरोध होणार असल्याच्या चर्चांना आता पूर्णपणे वेगळे वळण मिळाले असून, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दर्शवली आहे. बारामतीतील कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपण ही निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सांगतानाच, हाके यांनी अत्यंत टोकदार शब्दांत आपली भूमिका मांडली. दादांच्या निधनानंतर तिसऱ्याच दिवशी जर शपथविधी होऊ शकतो, तर आम्हीच केवळ त्यांच्या निधनाचे दुःख का व्यक्त करायचे? असा खोचक सवाल करत त्यांनी ही निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत, ज्यामुळे बारामतीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. लक्ष्मण हाके म्हणाले, बारामतीत जाऊन निवडणुकीसंदर्भात सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असल्याचं लक्ष्मण हाके म्हणाले. कार्यकर्त्यांसोबत व्यापक बैठक घेऊन निवडणूक लढवायची का आणि कोणी लढवायची याबाबत निर्णय जाहीर केला जाईल, असे हाके यांनी स्पष्ट केले आहे. लक्ष्मण हाके पुढे म्हणाले की, बारामतीतील एका वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात आलेले अहिल्यादेवींचे नाव बदलण्याचा जीआर हे शासन काढू शकते, आम्ही ते कधीही सहन करणार नाही. ओबीसींचे कोणतेच प्रश्न स्वर्गीय अजितदादा किंवा या सरकारने सोडवले नाहीत, आमची कोणतीही मागणी मान्य केली नाही. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती असेल किंवा होस्टेल असेल असे अनेक विषयांसाठी आम्ही झगडत होतो मात्र त्याला न्याय कधीच मिळाला नसल्याचे हाके यांनी म्हटले आहे. लोकशाहीत निवडणुका बिनविरोध होणे चुकीचे आहे. दादांच्या निधनानंतर होत असलेली निवडणूक ही अनुकंपा म्हणून आम्ही मानायची का? असा सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, दादांच्या निधनाच्या तिसऱ्या दिवशी हे शपथविधी करतात. आजोबा, नातू अधिवेशनाला निघून जातात. मग दुःख फक्त आम्ही करायचे का? असाही सवाल हाके यांनी उपस्थित केला आहे. लक्ष्मण हाके म्हणाले, आमच्या ओबीसी समाजाचे आरक्षण एका बाजूला संपवून टाकण्यात आले आहे. आमचे सर्व प्रश्न तसेच प्रलंबित आहेत. अशावेळी अन्यायाला वाचा फोडायला निवडणुकीसारखा दुसरा कोणता पर्याय आहे का? सुप्रिया सुळे जर प्रोफेशनल राजकारण करत असतील तर आम्हीही तसे करू, असेही हाके म्हणाले.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!