Homeमहाराष्ट्रआता गॅस एजन्सीला फेऱ्या मारण्याची गरज नाही:लाखांदूरच्या तरुणाने पाण्याची टाकी अन् ट्रॅक्टरच्या...

आता गॅस एजन्सीला फेऱ्या मारण्याची गरज नाही:लाखांदूरच्या तरुणाने पाण्याची टाकी अन् ट्रॅक्टरच्या ट्युबच्या मदतीने बनवला बायोगॅस

आखातातील युद्धामुळे सध्या स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. ग्रामीण भागात तर अनेकदा गॅसचा तुटवडा निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांनी जगायचे कसे? असा प्रश्न उभा ठाकला असतानाच, भंडारा जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने आपल्या कल्पक बुद्धीने सर्वांना चकित केले आहे. जितेंद्र हरिदास आठोळे (३५, रा. पाहुनगाव, ता. लाखांदूर) या युवकाने घरच्या घरी ‘बायोगॅस’चा असा काही यशस्वी प्रयोग केला आहे की, आता त्याला गॅस एजन्सीच्या फेऱ्या मारण्याची गरज उरलेली नाही. ​जितेंद्र आठोळे यांनी हा प्रयोग अत्यंत साध्या आणि कमी खर्चात पूर्ण केला आहे. त्याने यासाठी बाजारातून कोणतेही महागडे यंत्र आणले नाही. आपल्याकडील ५०० लिटर क्षमतेच्या प्लास्टिकच्या पाण्याच्या टाकीत त्याने शेण आणि पाण्याचे मिश्रण (गोबर) टाकले. या मिश्रणातून नैसर्गिकरीत्या गॅस तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली. ​मात्र, हा गॅस साठवून ठेवण्याचे आव्हान जितेंद्रसमोर होते. त्यावर त्याने एक देशी जुगाड शोधून काढला. त्याने या टाकीला एक पाईप जोडून तो थेट ट्रॅक्टरच्या ट्युबला जोडला. टाकीत तयार होणारा गॅस या ट्युबमध्ये साठवला जातो. जेव्हा स्वयंपाक करायचा असतो, तेव्हा या ट्युबचा दुसरा पाईप शेगडीला जोडला की, निळ्या रंगाची ज्योत पेटते. महागाईच्या काळात ‘आठोळे पॅटर्न’ची चर्चा ​सध्या सर्वत्र गॅसचा तुटवडा असल्याने अनेक कुटुंबांना नाइलाजास्तव पुन्हा जंगलात लाकूड फाटा गोळा करायला जावे लागत आहे. धुरामुळे महिलांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. अशा काळात जितेंद्रने शोधलेला हा मार्ग अत्यंत पर्यावरणपूरक आणि खिशाला परवडणारा ठरला आहे. या प्रयोगामुळे त्याच्या कुटुंबाची गॅसच्या समस्येतून कायमची सुटका झाली असून, ते आता याच बायोगॅसवर रोजचा स्वयंपाक करीत आहेत. ​ग्रामीण युवकांसाठी प्रेरणादायी पाऊल ​जितेंद्र आठोळे यांच्या या प्रयोगाची माहिती मिळताच पाहुनगाव आणि परिसरातील नागरिक त्यांचा हा ‘बायोगॅस प्रकल्प’ पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. “गरज ही शोधाची जननी आहे,” ही म्हण जितेंद्रने सार्थ ठरविली आहे. केवळ ३५ वर्षांच्या या तरुणाने दाखवून दिले आहे की, जर इच्छाशक्ती असेल तर आधुनिक तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता आपल्याकडील उपलब्ध साधनसामग्रीतूनही आपण मोठी क्रांती घडवू शकतो. ​”गॅसचे दर सतत वाढत आहेत आणि वेळेवर सिलिंडरही मिळत नाही. त्यामुळे मी घरच्या घरी हा प्रयोग करण्याचे ठरवले. ५०० लिटरची टाकी आणि जुनी ट्युब वापरून आज माझ्या घरचा स्वयंपाक सुलभ झाला आहे. इतर शेतकऱ्यांनीही असा प्रयोग केल्यास इंधनाचा खर्च वाचू शकतो,” अशी भावना जितेंद्र हरिदास आठोळे यांनी या प्रकरणी व्यक्त केली आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Gemini Financial Gain & Capricorn Promotion 2026

0
9 तासांपूर्वीकॉपी लिंकसोमवार, 2 नोव्हेंबर रोजी मिथुन राशीच्या नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नतीची शक्यता आहे आणि दीर्घकाळापासून रखडलेले पैसेही परत मिळू शकतात. मकर राशीच्या...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!