स्वतःला बाळू मामाचा अवतार सांगणाऱ्या मनोहर मामा भोसलेला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एकदा बेड्या ठोकल्या आहेत. भोंदूगिरी आणि आर्थिक फसवणुकीच्या ताज्या प्रकरणात कुर्डुवाडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मनोहर भोसलेवर याआधीच करमाळा आणि सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात महिलांवर अत्याचार केल्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. याशिवाय बारामती आणि दौंड पोलीस ठाण्यांमध्येही त्याच्यावर आर्थिक फसवणूक आणि भोंदूगिरीचे गुन्हे नोंदवण्यात आले असून, आजच्या कारवाईमुळे त्याच्यावरील गुन्ह्यांची मालिका अधिक गडद झाली आहे. मनोहर भोसलेवर केवळ अत्याचाराचेच नाही, तर भक्तांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन त्यांना लुबाडल्याचेही गंभीर आरोप आहेत. कॅन्सरसारखे दुर्धर आजार मंत्रतंत्राने बरे करण्याचे खोटे आश्वासन देऊन त्याने अनेक भाविकांची मोठी आर्थिक फसवणूक केली आहे. यापूर्वी अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक झाली असताना बार्शी सत्र न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. सध्या तो जामिनावर बाहेर असतानाच, फसवणूक आणि भोंदूगिरीच्या नवीन तक्रारीमुळे पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेतल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. व्यवसाय उद्योगात भरभराट आणण्याचे आमिष दाखवून पूजाअर्चा करण्यासाठी मनोहर मामा भोसले याने एका भक्ताकडे 2 लाख रुपयांची मागणी केली होती. यापैकी 50 हजार रुपये दिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे भक्ताच्या लक्षात आले, ज्यावरून कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात मनोहर भोसले आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध आर्थिक फसवणूक तसेच जादूटोणा व अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणात पोलिस निरीक्षक अतुल मोहिते यांच्या पथकाने मनोहर मामा भोसलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, ‘भविष्य’ सुधारण्याचे दावे करणाऱ्या या भोंदू महाराजाचे स्वतःचेच भविष्य आता अंधकारमय होताना दिसत आहे. मनोहर मामा भोसलेचे राजकीय नेत्यांसोबत फोटो मनोहर मामा भोसलेचे शरद पवार, सुप्रिया सुळे, नितीन गडकरी, राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार सुनील शेळके यांसारख्या दिग्गज राजकीय नेत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नाशिक आणि संगमनेरमधील घटनांनंतर आता सोलापूर जिल्ह्यातही भोंदूगिरीचे हे गंभीर प्रकरण समोर आल्याने जनतेमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. बड्या नेत्यांसोबतच्या या फोटोंमुळे चर्चेत आलेल्या मनोहर भोसलेला आता आर्थिक फसवणूक आणि जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्या भोंदूगिरीच्या जाळ्याचा अधिक तपास सुरू आहे.
Source link
‘बाळू मामाचा अवतार’ सांगणारा मनोहर भोसले पुन्हा गजाआड:कुर्डुवाडी पोलिसांकडून भोंदूगिरीप्रकरणी बेड्या, आर्थिक फसवणुकीचाही आरोप
- Advertisment -
- Advertisment -
ताज्या बातम्या
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.
...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
Gemini Financial Gain & Capricorn Promotion 2026
9 तासांपूर्वीकॉपी लिंकसोमवार, 2 नोव्हेंबर रोजी मिथुन राशीच्या नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नतीची शक्यता आहे आणि दीर्घकाळापासून रखडलेले पैसेही परत मिळू शकतात. मकर राशीच्या...
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...
हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
























