Homeदेश-विदेशकर्नाटकात थरार!:जमिनीच्या वादातून भीषण गोळीबार, तब्बल 6 जणांची निर्घृण हत्या; आरोपींचा शोध...

कर्नाटकात थरार!:जमिनीच्या वादातून भीषण गोळीबार, तब्बल 6 जणांची निर्घृण हत्या; आरोपींचा शोध सुरू

कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील गोविंदपूर (चडचण) या ठिकाणी झालेल्या भीषण गोळीबारात तब्बल सहा जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे भयानक हत्याकांड जमिनीच्या जुन्या वादातून घडले असल्याचे समोर येत आहे. एकाच वेळी आणि एकाच कारणावरून सहा जणांचे प्राण गेल्याने संपूर्ण विजापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून, परिसराचा ताबा घेतला आहे. सध्या पोलिसांकडून या सामूहिक हत्याकांडाचा सखोल तपास सुरू करण्यात आला असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे. गोळीबार करत सहा जणांची निर्घृण हत्या विजापूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर गावात शुक्रवारी सायंकाळी एक अत्यंत भीषण आणि थरारक घटना घडली. गावात आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी थेट गोळीबार करत सहा जणांची निर्घृण हत्या केली. प्राथमिक माहितीनुसार, गोविंदपूर गावातील निराळे आणि गुळगी (गोलगी) या दोन कुटुंबांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जमिनीच्या कारणावरून वाद सुरू होता. याच जुन्या वैमनस्यातून हा रक्तरंजित हल्ला झाल्याचा दाट संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात या भयंकर गोळीबारात चंदू निराळे, दुंडप्पा निराळे, शिवपुत्र निराळे, राहुल निराळे, समर्थ निराळे आणि शब्बीर नदाफ यांच्यासह आणखी एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. एकाच वेळी सहा जणांचे प्राण गेल्याने सीमाभागातील नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली असून, गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांचा मोठा फौजफाटा तात्काळ गावात दाखल झाला असून, संपूर्ण परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू या सामूहिक हत्याकांडामुळे संपूर्ण विजयपूर जिल्हा हादरून गेला असून, भिमातीर परिसरात पुन्हा एकदा रक्तपाताची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली आहे, तसेच पसार झालेल्या अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथकेही तैनात करण्यात आली आहेत. दरम्यान, या भयंकर घटनेबाबत पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आणि मृतांची संपूर्ण ओळख अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेली नाही.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दिल्लीत आंदोलनानंतर आपल्या घरी पोहोचले अभिजीत दीपके:म्हणाले- सरकारने ट्रेलर पाहिला कॉकरोच काय करू शकतात,...

0
कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी रविवारी सांगितले की, परीक्षांमधील गोंधळावरून त्यांचे आंदोलन तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री...

बंगाल सीमा पडताळणी | बांगलादेशात परतणारे स्थलांतरित

0
लेखक : अजय प्रकाश2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील हकीमपूर चेकपोस्टवर सध्या बेकायदेशीरपणे भारतात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची गर्दी जमा होत...

स्वामी अवधेशानंद जी गिरी यांचे जीवन सूत्र:अज्ञान, आळस, संकुचित विचार, कमकुवतपणा आणि नकारात्मक भावना...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; अज्ञान, आळस, संकुचित विचारसरणी, कमकुवतपणा आणि नकारात्मक भावना माणसाला आयुष्यात पुढे जाऊ...

वेस्ट इंडिज-श्रीलंका दुसरा वनडे पावसामुळे रद्द:टॉस झाल्यानंतर एकही चेंडू टाकता आला नाही, मालिका 1-1...

0
श्रीलंकेच्या वेस्ट इंडिज दौऱ्यातील दुसरा एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. किंग्स्टन येथील सबीना पार्क स्टेडियममध्ये शनिवारी रात्री टॉस झाल्यानंतर एकही चेंडू टाकता...
spot_img

वेस्ट इंडिज-श्रीलंका दुसरा वनडे पावसामुळे रद्द:टॉस झाल्यानंतर एकही चेंडू टाकता आला नाही, मालिका 1-1...

0
श्रीलंकेच्या वेस्ट इंडिज दौऱ्यातील दुसरा एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. किंग्स्टन येथील सबीना पार्क स्टेडियममध्ये शनिवारी रात्री टॉस झाल्यानंतर एकही चेंडू टाकता...

कर्णधार म्हणून गिलच्या दुसऱ्या सर्वात जलद हजार धावा:पंत 50 कसोटी सामने खेळणारा तिसरा भारतीय...

0
भारत-अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने 85 षटकांत 3 गडी गमावून 368 धावा केल्या. भारतीय कर्णधार शुभमन गिल आणि सलामीवीर केएल...

कंट्री काउंटर्स; जगातील सर्व देश फिरण्याचा ट्रेंड:गर्दीला कंटाळलेले लोक अस्पर्शित ठिकाणांकडे वळत आहेत, तज्ज्ञ...

0
प्रशांत महासागरातील छोटासा बेट असलेला देश ‘तुवालु’... हवाई आणि ऑस्ट्रेलियाच्या मध्ये वसलेला हा देश जगातील त्या मोजक्या ठिकाणांपैकी एक आहे, जिथे वर्षभरात एखादाच...

शिल्पा शिंदेवर कायदेशीर कारवाईची CM फडणवीसांकडे मागणी:निर्मात्यावर लैंगिक छळाचे खोटे आरोप केले; शिल्पाची पोस्ट-...

0
टेलिव्हिजन अभिनेत्री शिल्पा शिंदेच्या एका अलीकडील खुलाश्यावर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने तीव्र आक्षेप घेतला आहे. शिल्पाने कॉमेडियन भारती सिंग आणि...
error: Content is protected !!