- मराठी बातम्या
- राष्ट्रीय
- कर्नाटकने १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घातली, कर्नाटक आंध्र हे पहिले राज्य बनले
बेंगळुरू/अमरावती11 मिनिटांपूर्वी
- लिंक कॉपी करा
मुलांच्या सोशल मीडियाच्या वापरावर औपचारिक बंदी जाहीर करणारी कर्नाटक व आंध्र प्रदेश ही शुक्रवारी भारतातील पहिली २ राज्ये ठरली. कर्नाटकमध्ये १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घातली जाईल. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केले की, १६ वर्षांखालील मुले मोबाइल फोन बाळगू शकतात, परंतु सोशल मीडिया वापरू शकत नाहीत.
यावर नियंत्रणासाठी एक कार्यक्रम तयार केला जाईल. दुसरीकडे, आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी विधानसभेत सांगितले की, १३ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी ९० दिवसांत लागू केली जाईल. १३ ते १६ वयोगटातील मुलांबाबत सर्वसमानतेने निर्णय घेतला जाईल. गोवा, महाराष्ट्र व बिहारातही असे धोरण विचाराधीन आहे.
- इंडोनेशियानेही शुक्रवारी १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घातली आहे.
- ऑस्ट्रेलिया-मलेशियातही बंदी लागू आहे. फ्रान्स-पोर्तुगालमध्ये विधेयके मंजूर झाली आहेत.
मुलांना वारंवार आत्महत्येशी संबंधित आशय दाखवू शकते अल्गोरिदम
अमेरिकन सर्जन जनरलच्या ॲडव्हायझरीमध्ये संशोधनाचा हवाला देत म्हटले आहे की, दररोज ३ तास सोशल मीडिया वापरणाऱ्या मुलांमध्ये इतरांच्या तुलनेत नैराश्य दुप्पट आढळले. सोशल मीडियाचा सततचा वापर मेंदूच्या दोन महत्त्वाच्या भागांमध्ये (अमिग्डाला आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्स) बदल घडवू शकतो, ज्यामुळे मुले छोट्या गोष्टींबाबतही अत्यंत संवेदनशील बनतात. एक तृतीयांश किशोरवयीन मुले मध्यरात्रीपर्यंत सोशल मीडियावर सक्रिय असतात. हार्वर्डच्या मते, झोपेची कमतरता अभ्यासातील कमकुवतपणा आणि तणाव सहन करण्याच्या क्षमतेतील घटीशी संबंधित आहे.






















