कराड तालुक्यातील पेरले गावाजवळ पैशाच्या व्यवहारातून एका तरुणावर पिस्तुलातून गोळीबार करून गंभीर जखमी केल्यानंतर अहिल्यानगर येथे फरार झालेल्या दोन्ही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व उंब्रज पोलिसांच्या संयुक्त पथकाने अवघ्या 24 तासांत अटक केली. 17 जुलै रोजी रात्री सुमारे 11.45 वाजता इंदोली पुलाजवळील पाणंद रस्त्यावर ही घटना घडली. संतोष शंकर घोलप (वय 37, रा. कालगाव, ता. कराड) यांना पैशाचा व्यवहार मिटविण्याच्या बहाण्याने बोलावण्यात आले. त्यावेळी आरोपी सोमनाथ रमेश चव्हाण (रा. कालगाव) व त्याचा साथीदार योगेश सुदाम दीक्षित (रा. मसूर, ता. कराड) यांनी फिर्यादीला शिवीगाळ व धमकी दिली. त्यानंतर सोमनाथ चव्हाण याने फॉर्च्युनरमधून पिस्तूल काढून दोन गोळ्या झाडल्या. त्या चुकविण्याचा प्रयत्न करत असताना घोलप यांच्या दोन्ही पायांना गोळ्या लागून ते गंभीर जखमी झाले. या प्रकरणी उंब्रज पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमे, शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी यांच्यासह विशेष तपास पथक तयार करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि साक्षीदारांच्या मदतीने आरोपी अहिल्यानगर येथे लपल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने कायनेटीक चौकातील साई सुर्या हॉटेलवर छापा टाकून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील तपासासाठी त्यांना उंब्रज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
Source link
पिस्तुलातून गोळीबार करून फरार:दोघांना अवघ्या 24 तासांत बेड्या, स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
शनिवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना प्रमोशन किंवा वेतनवाढ मिळू शकते, पैसे गुंतवण्यासाठी कन्या राशीच्या...
शनिवार, 1 ऑगस्ट रोजी मेष राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये मोठी झेप घेण्याचे योग आहेत. वृषभ राशीच्या लोकांना नोकरी बदलण्याचा चांगला प्रस्ताव मिळू शकतो. मिथुन...
सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!
आगामी आपत्काळातून तारण्यासाठी आणि ‘रामराज्या’साठी साधनेला पर्याय नाही - श्री चैतन्य तागडे
पुणे - संपूर्ण जगावर घोंघावणारे तिसऱ्या महायुद्धाचे संकट, वाढती महागाई आणि नैराश्य यांवर...
स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:आपण अशा पुस्तकांचा अभ्यास केला पाहिजे जी सत्य आणि धर्माच्या...
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; सत्य आणि नीतिमत्तेच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या पुस्तकांचा आपण अभ्यास केला पाहिजे.हरिद्वार17...
राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
Hyundai Naira इलेक्ट्रिक MPV संकल्पना GIIAS 2026 मध्ये अनावरण करण्यात आली
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराइंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या GIIAS 2026 इव्हेंटमध्ये हुंडईने आपली नवीन नेइरा कॉन्सेप्ट सादर केली आहे. ही एक इलेक्ट्रिक MPV आहे, जी...
‘के-शेप्ड इकॉनॉमी’ परिणाम दाखवत आहे:1400 रुपयांच्या आईस्क्रीमच्या रांगेत लपले आहे अमेरिकन अर्थव्यवस्थेचे सत्य
अमेरिकेतील हॉप्किन्स, मिनेसोटा या एका छोट्या शहरात प्रत्येक ऋतूत एकसारखेच दृश्य दिसते. 27 अंश सेल्सिअस उष्णता असो किंवा बर्फाळ थंडी, लोक एकाच गोष्टीसाठी...






























