Homeमहाराष्ट्ररक्ताच्या क्लिष्ट तपासण्या जूनपासून ‘जीएमसी’त हाेणार‎:जळगावमधील आयपीएचएल लॅबमुळे आता मुंबई आणि पुणे...

रक्ताच्या क्लिष्ट तपासण्या जूनपासून ‘जीएमसी’त हाेणार‎:जळगावमधील आयपीएचएल लॅबमुळे आता मुंबई आणि पुणे जाण्याचा फेरा वाचणार‎

जिल्ह्यात गंभीर आजाराचे निदान‎करण्यासाठी किंवा रक्ताच्या विशेष तपासण्यांसाठी आतापर्यंत रुग्णांना मुंबई‎ अथवा पुण्याच्या प्रयोगशाळांकडे धाव‎ घ्यावी लागत असे. अनेकदा तर रुग्ण‎ बरा होऊन घरी गेला तरी रिपोर्ट प्राप्त‎ होत नसे, अशा अडचणींना सामोरे ‎जावे लागत होते. मात्र आता जळगाव ‎जिल्हा सामान्य रुग्णालयात जूनपासून ‎सुरू होणाऱ्या “इंटिग्रेटेड पब्लिक हेल्थ‎लॅबोरेटरी”मुळे हा त्रास कायमचा‎ मिटेल. आठ दिवसांनी येणारे अहवाल‎ अवघ्या 24 ते 48 तासांत मिळण्यासाठी ‎मदत होईल. त्यामुळे वेळ वाचेल.‎ सध्या अनेक क्लिष्ट चाचण्यांचे‎ज्यात सिकलसेल, कॅन्सर निदान,‎विशिष्ट हार्मोन्स नमुने पुण्याला पाठवावे‎ लागतात. तिथून रिपोर्ट येण्यास 5 ते 8‎ दिवस लागतात. या काळात रुग्णाची ‎प्रकृती खालावण्याची भीती असते ‎किंवा अनेकदा उपचार पूर्ण झाल्यावर ‎रिपोर्ट हातात येतो. आयपीएचएलमुळे हे‎सर्व रिपोर्ट आता 24 ते 48 तासांत ‎जळगावातच मिळणार आहेत. त्यामुळे ‎रुग्णावर तातडीने उपचार करणे शक्य ‎होऊ शकेल. दरम्यान, अनेक खासगी ‎लॅबमध्ये काही अत्यावश्यक असलेल्या‎ चाचण्यांचे दर सध्या आवाक्याबाहेर‎ असल्याने गरीब रुग्ण मुंबई-पुण्यातील ‎सरकारी रुग्णालयांची वाट धरतात. यात‎वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो.‎आयपीएचएल लॅबमध्ये केंद्र शासनाच्या‎ अत्याधुनिक उपकरणांद्वारे खासगी‎ लॅबच्या तोडीस तोड तपासणी होईल.‎ आता सर्व चाचण्या एकाच छताखाली‎ पूर्वी रक्त, लघवीच्या साध्या चाचण्या जळगावच्या‎ जिल्हा रुग्णालयात व्हायच्या, पण गुंतागुंतीच्या‎ चाचण्यांसाठी नमुने पुणे किंवा मुंबईला पाठवावे ‎लागायचे. आता 100 हून अधिक प्रकारच्या‎ चाचण्या एकाच ठिकाणी होतील. खासगी लॅबमध्ये ‎ज्या चाचण्यांसाठी हजारो रुपये मोजावे लागतात,‎त्या जीएमसीत अतिशय माफक दरात होतील.‎ प्रयोगशाळेचे काम अंतिम टप्प्यात‎ एमसीच्या आवारातच महिला आणि बाल ‎रुग्णालयाच्या इमारतीत ही प्रयोगशाळा सुरू होणार ‎आहे. काम अंतिम टप्प्यात आहे. साधारणत:‎ जूनपर्यंत ही प्रयोगशाळा सुरू होईल. त्यामुळेच रुग्णांचे रिपोर्ट 24 ते 28 तासांत मिळतील. अचूक‎निदान लवकर होऊन उपचार करता येणार आहे.‎ डॉ. स्वप्निल सांगळे, जिल्हा शल्यचिकित्सक‎ प्रयोगशाळेत या तपासण्यांमुळे लवकर होणार आजाराचे निदान‎ रक्तविषयक : सिकलसेल,‎थॅलेसेमिया, रक्ताचा कर्करोग ‎प्राथमिक निदान, डेंग्यू आणि‎ मलेरियाचे योग्य निदान.‎
हृदयविकार : थायरॉइड,‎कोलेस्टेरॉल, ट्रोपोनिन-I‎(हृदयविकारासाठी), यूरिक‎ ॲसिड, यकृत आणि किडनी‎ कार्यक्षमतेबाबतची तपासणी.‎
संसर्गजन्य : एचआयव्ही, हिपॅटायटिस-बी, सिफिलीस,‎लेप्टोस्पायरोसिस आणि कॉलरा‎‎
कर्करोग : महिलांसाठी पॅप‎स्मिअर (गर्भाशय मुखाचा‎कॅन्सर) आणि एफएनएसी ‎(गाठींची तपासणी)‎
पाणी, स्वच्छता : पिण्याच्या ‎पाण्याची शुद्धता (एच 2 एस‎/कोलिफॉर्म) आणि अन्न‎विषबाधा या सर्व तातडीच्या‎ तपासण्या जळगावात होतील.‎



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!