आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्रित रणनीती आखली असून, मतदारसंघाच्या सोयीनुसार ‘घड्याळ’ किंवा ‘तुतारी’ या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या जागावाटप आणि चिन्हांच्या तडजोडीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर इंदापूर तालुक्यातही याचे प्रतिबिंब पाहायला मिळत आहे. या नव्या सूत्रानुसार दोन्ही राष्ट्रवादी एकत्र ताकदीने निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. याच रणनीतीचा भाग म्हणून, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील-ठाकरे या इंदापूर तालुक्यातील ‘बावडा’ जिल्हा परिषद गटामधून आपली उमेदवारी दाखल करणार आहेत. विशेष म्हणजे, शरद पवार गटाच्या नेत्याची कन्या असूनही अंकिता पाटील या ‘घड्याळ’ चिन्हावर आपली निवडणूक लढवणार आहेत. त्या बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून इंदापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. तसेच इंदापूर पंचायत समितीच्या निवडणुकीत राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे सुपुत्र श्रीराज दत्तात्रय भरणे राजकारणाच्या आखाड्यात उतरणार आहेत. श्रीराज भरणे हे बुधवारी ‘बोरी’ पंचायत समिती गणासाठी अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्या या राजकीय प्रवेशामुळे भरणे कुटुंबाचा वारसा आता नव्या पिढीकडे सोपवला जात असल्याची चर्चा असून, इंदापूरच्या स्थानिक राजकारणात या युवा नेतृत्वाच्या एन्ट्रीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी ‘सोयीनुसार चिन्ह’ वापरण्याची विशेष रणनीती आखली असून, पुणे जिल्ह्यासह राज्यभरात ‘घड्याळ’ आणि ‘तुतारी’ या दोन्ही चिन्हांचा वापर केला जाणार आहे. महानगरपालिका निवडणुकांनंतर दोन्ही गटांच्या नेत्यांनी एकत्र येत ही नवी रणनीती निश्चित केली असून, ज्या मतदारसंघात जे चिन्ह विजयासाठी अधिक फायदेशीर ठरेल, तिथे त्याच चिन्हावर उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला जाईल. राष्ट्रवादीच्या या ‘चिन्ह समन्वया’च्या प्रयोगामुळे स्थानिक राजकारणात मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आघाडी केली होती. तरी देखील भाजप पक्ष या दोन्ही ठिकाणी वरचढ ठरल्याचे दिसून आले आणि दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचा पराभव झाला. आता पुढील निवडणुकीत काय चित्र पाहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
Source link
इंदापूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे सोयीचे राजकारण!:हर्षवर्धन पाटलांची कन्या अंकिता पाटील ‘घड्याळ’ चिन्हावर लढणार, बुधवारी अर्जही दाखल करणार
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.
...
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...
हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...


























