हिंगोली जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवरील तीन वेगवेगळ्या कारवाईमध्ये तीन वाहनांसह ३५.८५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पाच जणांवर रविवारी ता. १५ पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथके स्थापन करण्यात आली आहेत. गुन्हे शाखेसोबतच स्थानिक पोलिस ठाण्यांची पथकेही कार्यरत आहेत. दरम्यान, रविवारी ता. १५ पहाटेच्या सुमारास औंढा नागनाथ तालुक्यातील देवाळा फाटा येथे एक हायवा मधून वाळू वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून जमादार संदीप पवार, सुमीत टाले, सतीष नरवाडे, विनोद कुटे यांच्या पथकाने तातडीने देवाळा येथे जाऊन एक हायवा पकडला. त्यानंतरच जवळा बाजार भागातील नालेगाव परिसरातून एक टॅॅक्टर पकडण्यात आले. पोलिसांनी दोन्ही वाहने जप्त केली असून या प्रकरणी चौघांवर औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, वसमत तालुक्यातील पळसगाव पाटी येथे नांदेडकडून एका हायवामध्ये वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती वसमत ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, जमादार विजय उपरे, नामदेव बेंगाळ, शहाजी बामणीकर यांच्या पथकाने पळसगाव पाटी येथे जाऊन वाहनांची तपासणी केली. यामध्ये हायवा व वाळू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या तीन प्रकरणात पोलिसांनी ३५.८५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर दत्ता कुटे (रा. चिमेगाव, ता. औंढा), सुनील सांगळे, अरबाज खान पठाण (रा. नालेगाव), राजू भंडारी (रा. नांदेड) यांच्यासह अन्य एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
Source link
अवैध वाळू वाहतूक करणारी तीन वाहने पकडली:35.85 लाखांचा मुद्देमाल जप्त, अप्पर पोलिस अधिक्षकांच्या पथकाची कारवाई
- Advertisment -
- Advertisment -
ताज्या बातम्या
स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.
...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...
हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...























