Homeमहाराष्ट्रहळदवाडी साठवण तलावामुळे 298 हेक्टर शेती सिंचनाखाली येणार:दोन गावांची तहान भागणार, मे...

हळदवाडी साठवण तलावामुळे 298 हेक्टर शेती सिंचनाखाली येणार:दोन गावांची तहान भागणार, मे अखेरपर्यंत काम पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न

हिंगोली तालुक्यातील हळदवाडी साठवण तलावाचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी जलसंपदा विभागाकडून युध्दपातळीवर प्रयत्न सुरु झाले असून कामाला गती आली आहे. या तलावात 1.646 दशलक्ष घनमीटर पाणीसठा होणार असून त्यातून दोन गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. या शिवाय 298 हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. तलावाच्या कामाची शनिवारी ता. 18 आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी पाहणी केली. हिंगोली तालुक्यातील हळदवाडी शिवारात जलसंपदा विभागाच्या वतीने सुमारे 39 कोटी रुपये खर्चुन तलावाचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. य तलावासाठी नर्सी नामदेव व वैजापूर शिवारातील 39 हेक्टर जमीनीवर तलावाचे बांधकाम केले जात आहे. सदर तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर या तलावामध्ये 1.646 दशलक्ष घनमिटर पाणीसाठी होणार आहे. त्यातून नर्सी नामदेव व पुसेगाव या दोन गावांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. या शिवाय 298 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून शेती सिंचनासाठी पाणी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना एकरी उत्पन्न वाढविण्यास मदत होणार आहे. दरम्यान, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तलावाचे काम युध्दपातळीवर सुरु असून मे अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचे प्रयत्न असल्याचे जलसंपदा विभागाच्या सहाय्यक अभियंता प्राजक्त भुजाडले यांनी सांगितले. या तलावाच्या बांधकामाची आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी पाहणी केली. यावेळी सहाय्यक अभियंता भुजाडले, ॲड. के. के. शिंदे, संतोष टेकाळे, विलास गोरे, माणिक लोडे, आसाराम घुगे, सरपंच शंकर सिंदे, प्रल्हाद शिंदे, रुस्तुम शिंदे, प्रद्युम्न गिरीकर, शिवाजी मेटकर यांची उपस्थिती होती. यावेळी आमदार मुटकुळे यांनी तलावाच्या कामाबाबत आवश्‍यक सूचनाही दिल्या आहेत



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

NTA म्हणाले- NEET पेपर आमच्या प्रणालीतून लीक झाला नाही:संसदीय समितीने विचारले- पुन्हा परीक्षा का,...

0
NEET-UG पेपरफुटी प्रकरणासंदर्भात गुरुवारी संसदेच्या स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीत NEET परीक्षा घेणारी संस्था नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) चे अधिकारीही उपस्थित होते....

सातारा जिल्ह्यातही ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची धडक:धुळदेव ग्रामसभेत तरुणांचा एल्गार, हातात पोस्टर घेऊन आक्रमकपणे उपस्थित...

0
देशभरात चर्चेत आलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) या व्यंगात्मक मोहिमेचे पडसाद आता सातारा जिल्ह्यातीस माण तालुक्यातही उमटू लागले आहेत. माण तालुक्यातील धुळदेव येथील...

गुजरात विधानसभा निवडणुका 2027 मध्ये होणार:2029 मध्ये ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची अंमलबजावणी झाल्यास 2034...

0
वन नेशन, वन इलेक्शन प्रकरणी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीने (JPC) विविध राज्यांमध्ये जाऊन राजकीय पक्ष आणि अधिकाऱ्यांशी सल्लामसलत सुरू केली आहे. तीन...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:शास्त्रे सत्याचा मार्ग दाखवतात आणि आम्हाला शुभ संकल्पांसह जीवन जगण्याची...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; पवित्र शास्त्र सत्याचा मार्ग दाखवते आणि उदात्त संकल्प आणि सकारात्मक मूल्यांसह जीवन...
spot_img

भारत देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2026-27 वेळापत्रक; दुलीप ट्रॉफी सुरू, रणजी दोन टप्प्यात

0
मराठी बातम्याखेळभारत देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2026 27 वेळापत्रक; दुलीप ट्रॉफी सुरू, रणजी दोन टप्प्यातमुंबई1 तासापूर्वीलिंक कॉपी कराभारतीय देशांतर्गत हंगाम 2026-27 ची सुरुवात 23...

‘हिटलर’ बॉस; सहानुभूतीत शून्य:संशोधनातून खुलासा – इतरांच्या कामाचे श्रेयही घेतात, नफ्याच्या नादात चुकीची निवड...

0
एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकाची उत्कृष्ट कामगिरी, शानदार संवादक, कंपनी बोर्डाचा आवडता. पण त्याच्या टीममध्ये सतत राजीनामे, भीतीचे वातावरण आणि अनैतिक निर्णयांच्या तक्रारी....

सोनाक्षी सिन्हा-झहीर इकबालने मेलोडी टॉफीवर व्हिडिओ बनवला:PM मोदींनी मेलोनींना भेट दिली टॉफी; सोशल मीडियावर...

0
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचे पती झहीर इक्बाल सोशल मीडियावर सुरू असलेल्या 'मेलोडी' ट्रेंडमध्ये सामील झाले आहेत. दोघांनी बुधवारी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर...

2031 पर्यंत चंद्र मोहिमेसाठी 8 तास टॉयलेट बॅकअप

0
न्यू यॉर्क6 दिवसांपूर्वीलिंक कॉपी करानासाच्या 2028 पर्यंत मानवांना पुन्हा चंद्रावर पाठवण्याच्या मोहिमेला धक्का बसू शकतो. अमेरिकन ऑडिट रिपोर्टनुसार, 'एक्झिओम स्पेस'चे नवीन स्पेस सूट...
error: Content is protected !!