सेनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हत्ता शिवारात साध्या वेशात गेलेल्या पोलिसांच्या पथकाने सोमवारी ता. १ जुगार अड्यावर छापा टाकून ५४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सहा जणांवर सेनगाव पोलिस ठाण्यात गुुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात अवैध व्यवसायाला आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके स्थापन केली आहेत. पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांनी स्थापन केलेल्या पथकाकडून दररोज कारवाईची माहिती घेतली जात आहे. या शिवाय उपाधिक्षक मयूर रसाळ यांचे स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले असून या पथकाकडून अवैध व्यवसायावर कारवाईची मोहिम सुरु आहे. दरम्यान, सेनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत हत्ता शिवारातील एका शेतात जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस उपाधिक्षक मयूर रसाळ, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार संदीप जाधव, भुजंग कोकरे, किशोर सावंत, हरिभाऊ गुंजकर, साईनाथ कंठे यांच्या पथकाने साध्या वेशात जाऊन छापा टाकला. यामध्ये घटनास्थळी पुंजाजी गडदे( रा. हत्ता पाटी), ज्ञानबा पादरे (रा. हत्ता), अनिल साळवे (रा. साखरा), रवी चव्हाण (रा. पाटोदा), भाऊराव पवार (रा. भानखेडा) यांच्यासह अन्य एक जण जुगार खेळतांना आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराच्या साहित्यासह ५४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Source link
हत्ता शिवारात जुगार अड्ड्यावर छापा:जुगार साहित्यासह 54 हजारांचा मुद्देमाल जप्त, 6 जणांवर गुन्हा; पोलिसांची साध्या वेशात कारवाई
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
इंडिया ब्लॉक अलायन्स वाद; माकपने काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली आहे
नवी दिल्ली5 तासांपूर्वीलिंक कॉपी कराइंडिया ब्लॉकच्या बैठकीपूर्वी मित्रपक्षांनी काँग्रेसवर सहकार्य न केल्याचा आरोप केला आहे. शनिवारी, CPI(M) चे सरचिटणीस एम. ए. बेबी यांनी...
‘कॉकरोच जनता पार्टी’चे दिल्लीत जोरदार आंदोलन:CM फडणवीसांची ‘अराजकता’ म्हणत टीका, तर ठाकरेंचा सरकारला इशारा
सोशल मीडियाच्या माध्यमातून कोट्यवधी तरुणांना आकर्षित करणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी'ने (CJP) आज देशाची राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर थेट रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन केले. या...
गांगुली म्हणाले- मी युसूफ पठाण यांना खासदारकी सोडायला सांगितले नाही:मला राजकारणात रस नाही, दावा-...
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली म्हणाले की, मी ममता बॅनर्जींच्या सांगण्यावरून टीएमसी खासदार आणि माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांना राजीनामा देण्यास...
6 जूनचे राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कुंभ राशीच्या लोकांना उत्पन्नाचे स्रोत...
शनिवार, 6 जून रोजी मेष राशीचे लोक प्रॉपर्टी किंवा गाडी खरेदी-विक्री करण्याचा विचार करू शकतात. मिथुन राशीच्या लोकांना व्यवसायात महत्त्वाचे ऑर्डर मिळण्याची शक्यता...
कर्णधार म्हणून गिलच्या दुसऱ्या सर्वात जलद हजार धावा:पंत 50 कसोटी सामने खेळणारा तिसरा भारतीय...
भारत-अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने 85 षटकांत 3 गडी गमावून 368 धावा केल्या. भारतीय कर्णधार शुभमन गिल आणि सलामीवीर केएल...
कंट्री काउंटर्स; जगातील सर्व देश फिरण्याचा ट्रेंड:गर्दीला कंटाळलेले लोक अस्पर्शित ठिकाणांकडे वळत आहेत, तज्ज्ञ...
प्रशांत महासागरातील छोटासा बेट असलेला देश ‘तुवालु’... हवाई आणि ऑस्ट्रेलियाच्या मध्ये वसलेला हा देश जगातील त्या मोजक्या ठिकाणांपैकी एक आहे, जिथे वर्षभरात एखादाच...
शिल्पा शिंदेवर कायदेशीर कारवाईची CM फडणवीसांकडे मागणी:निर्मात्यावर लैंगिक छळाचे खोटे आरोप केले; शिल्पाची पोस्ट-...
टेलिव्हिजन अभिनेत्री शिल्पा शिंदेच्या एका अलीकडील खुलाश्यावर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने तीव्र आक्षेप घेतला आहे. शिल्पाने कॉमेडियन भारती सिंग आणि...
दिल्ली E85 फ्लेक्स इंधन लाँच
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी करा85% इथेनॉल मिश्रित E85 इंधन दिल्लीत अधिकृतपणे लॉन्च झाले आहे. विशेष म्हणजे, हे दिल्लीत विकल्या जाणाऱ्या E20 पेट्रोलपेक्षा ₹20...

































