बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिराचा १३.२ एकर परिसर अतिक्रमणमुक्त केला जाणार आहे. भाविकांसाठी २० एकर परिसरात १५६.६२ कोटींच्या निधीतून ३३ प्रकारच्या सोयी-सुविधांची निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम सुरू झाले असून, या परिसरात १२ ज्योतिर्लिंगांची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. भाविकांना पाऊस आणि उन्हात उभे राहून दर्शन घ्यावे लागत होते. आता ६५० मीटर अंतराची दर्शन रांग बांधण्यात येणार आहे. यात खुलताबाद-कन्नड मार्गावर दर्शनरांग भुयारी मार्ग असेल. वाहनांसाठी २ एकरात पार्किंग व्यवस्था केली जाणार आहे. ५० खोल्यांचे भक्तनिवास उभारले जाणार आहे. यात २०० पेक्षा अधिक भाविक राहू शकतात. भाविकांसाठी वेरूळ घाटातून स्वतंत्र १.८ किलोमीटर रस्ता तयार केला जाणार आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे. ‘श्रीक्षेत्र घृष्णेश्वर वेरूळ विकास आराखडा’ असे प्रकल्पाचे नाव आहे. नियोजन विभागाकडून प्रकल्पासाठी निधी मंजूर झाला आहे. या प्रकल्पाला ९ ऑक्टोबर २०१८ रोजी ११२ कोटींची मान्यता मिळाली होती. कोरोनामुळे काम मागे पडले होते. पार्किंगचे ९० टक्के काम पूर्ण पार्किंगची सोय नसल्यने भाविकांना वाहने रस्त्यावर उभी करावी लागत होती. आता २ एकरांवर पार्किंग असेल. त्याचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. त्याचबरोबर वेटिंग हॉल क्रमांक-एकचे काम ६० टक्के पूर्ण झाले आहे. दर्शन रांगेचे काम सुरू करण्यात आले आहे. कुंभमेळ्यापूर्वी काम व्हावे घृष्णेश्वर मंदिराचा विकास आराखडा २०१८ मध्ये मंजूर झाला होता. त्यानंतर कोरोनामुळे काम रेंगाळले होते. २०२३ मध्ये निधीत वाढ केली. आता कामाला सुरुवात झाली आहे. नाशिकच्या कुंभमेळ्यापूर्वी काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. – योगेश टोपरे, अध्यक्ष, घृष्णेश्वर मंदिर ट्रस्ट, वेरूळ. २०२४मध्ये वाढीव निधी मंजूर ४ जानेवारी २०२४ रोजी १५६.६२ कोटींचा वाढीव निधी मंजूर झाला. या प्रकल्पाचा आराखडा ‘डीपी डिझाइन असोसिएट कंपनी’ने तयार केला. सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया राबवली. के. एच. कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान कामाचे उद्घाटन झाले, अशी माहिती ‘डीपी डिझाइन’चे वास्तुविशारद प्रदीप देशपांडे यांनी दिली.
श्रीक्षेत्र घृष्णेश्वर वेरूळ विकास प्रकल्पाचा आराखडा
Source link
संडे बिग स्टोरी:‘घृष्णेश्वर’ दोन वर्षांत अतिक्रमणमुक्त; 156.62 कोटींमधून परिसराचा विकास, 650 मीटर दर्शनरांग, 50 खोल्यांचे भक्तनिवास
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
मल्टी स्पोर्ट्स संस्कृती, मार्गदर्शन, क्ले कोर्ट प्रशिक्षणाने बनवले सुपरपॉवर:महिला टेनिसवर चेकिया देश राज्य करत...
विम्बल्डन 2026 चा महिला एकेरीचा अंतिम सामना यावेळी खूप खास होता. या वर्षी विजेतेपदाचा सामना चेकिया (चेक रिपब्लिक) च्या दोन स्टार खेळाडू -...
जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...
महिलांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय:पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ, कर्ज परतफेडीचा भार होणार...
राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनवण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या 'पिंक ई-रिक्षा' योजनेबाबत राज्य मंत्रिमंडळाने एक अतिशय ऐतिहासिक आणि मोठा निर्णय घेतला आहे. महिला...
शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...
मल्टी स्पोर्ट्स संस्कृती, मार्गदर्शन, क्ले कोर्ट प्रशिक्षणाने बनवले सुपरपॉवर:महिला टेनिसवर चेकिया देश राज्य करत...
विम्बल्डन 2026 चा महिला एकेरीचा अंतिम सामना यावेळी खूप खास होता. या वर्षी विजेतेपदाचा सामना चेकिया (चेक रिपब्लिक) च्या दोन स्टार खेळाडू -...
जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...
शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...
सोने ₹476 ने घसरून ₹1.42 लाखांवर:चांदी ₹849 ने वाढून ₹2.19 लाख प्रति किलोवर, या...
आज म्हणजेच 14 जुलै रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव...