महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यात एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. शेतजमीन विक्रीतून मिळालेल्या कोट्यवधी रुपयांवर डोळा ठेवून एका ६४ वर्षीय ज्येष्ठ शेतकऱ्याला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवण्यात आले आहे. केवळ मोबाइल रिचार्ज करण्याच्या निमित्ताने ओळख वाढवून, अत्याचाराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत एका दांपत्याने या वृद्धाला तब्बल ७० लाख रुपयांनी लुटले. याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी दांपत्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. हा शेतकरी मूळचा नांदगाव पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असून त्याचे शहरात स्वतःचे घर आहे. गाडगेनगर भागात आरोपी दांपत्याचे मोबाइलचे दुकान आहे. मोबाइल रिचार्ज करण्यासाठी हा शेतकरी या दुकानात नियमित जात असे. तेथूनच त्यांची या दांपत्याशी ओळख झाली. पुढे महिलेने शेतकऱ्याशी जवळीक वाढवली आणि त्यांच्यात संमतीने संबंध प्रस्थापित झाले. यानंतर मात्र महिलेने आणि तिच्या पतीने संगनमत करून या शेतकऱ्याला अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणे सुरू केले. बदनामीच्या आणि कारवाईच्या या भीतीमुळे प्रचंड दडपणाखाली असलेल्या या वृद्धाने गेल्या चार वर्षांत टप्प्याटप्प्याने तब्बल ७० लाख रुपये या दांपत्याला दिले. अखेर ११ मे रोजी रात्री उशिरा या शेतकऱ्याने नांदगाव पेठ पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. यावरून पोलिसांनी हनी ट्रॅप रचणाऱ्या महिलेसह तिच्या पतीवर विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. जमीन विक्रीतून आले होते दोन ते अडीच कोटी या शेतकऱ्याने २०२० मध्ये आपली शेतजमीन विकली होती. या व्यवहारातून त्याला दोन ते अडीच कोटी रुपये मिळाले होते. हीच मोठी रक्कम शेतकऱ्याकडे असल्याची माहिती या दांपत्याला समजली होती. पैशांच्या याच लालसेपोटी महिलेने आणि तिच्या पतीने अत्यंत सुनियोजितपणे हे मायाजाल विणले आणि त्यात या निष्पाप शेतकऱ्याला ओढले.
Source link
शेतकऱ्याला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून 70 लाख लुटले:मोबाइल रिचार्ज करणे महागात पडले, अमरावतीच्या दांपत्यावर खंडणीचा गुन्हा दाखल
- Advertisment -
- Advertisment -
ताज्या बातम्या
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.
...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
Gemini Financial Gain & Capricorn Promotion 2026
9 तासांपूर्वीकॉपी लिंकसोमवार, 2 नोव्हेंबर रोजी मिथुन राशीच्या नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नतीची शक्यता आहे आणि दीर्घकाळापासून रखडलेले पैसेही परत मिळू शकतात. मकर राशीच्या...
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...
हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
























