Homeमहाराष्ट्रशिवसेना घाबरणारी पार्टी नाही:त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळावेत, हॉटेलमधील नगरसेवकांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचा...

शिवसेना घाबरणारी पार्टी नाही:त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळावेत, हॉटेलमधील नगरसेवकांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना इशारा

मुंबईचा महापौर कोणाचा होणार? यावरून कमालीची गुप्तता आणि रस्सीखेच पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या सर्व २९ नगरसेवकांना वांद्रे येथील ‘ताज लँडस् एन्ड’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवले आहे. आज त्यांनी या नगरसेवकांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी शिंदेंनी संवाद साधला आहे. शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? शिवसेनेला लोक घाबरतात. नवीन नगरसेवकांना आम्ही मार्गदर्शन करण्यासाठी हॉटेलमध्ये एकत्र ठेवले होते. ओळखी पाळखी, बोलणे-चालणे, काम कसे करायचे, जुने नगरसेवक कसे काम करत होते, त्यांचे अनुभव, निधीची तरतूद कशी करायची यावर आम्ही चर्चा केली. मला यांना भेटायचे होते. निवडणुकीत ते व्यस्त होते आणि इकडे जरा त्यांना वेगळा आनंद म्हणून हॉटेलमध्ये बोलावले होते, असे एकनाथ शिंदे म्हणाले. मुंबईत 29 नगरसेवक आम्ही निवडून आणले आहेत. जनतेचा हा आशीर्वाद आहे. लोकांनी आमचे काम स्वीकारले आहे आणि उबाठाचे नाकारले आहे. मुंबईचा महापौर महायुतीचा होईल. त्यांना त्यांची भीती आहे, त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवावेत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेत बहुमतासाठी आवश्यक 114 हा आकडा गाठण्यासाठी भाजपकडे 89 जागा असल्याने त्यांना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची मदत घेणे अपरिहार्य ठरले आहे. या स्थितीचा फायदा घेत शिंदे गटाकडून महापौरपदाचे अडीच-अडीच वर्षांचे सूत्र आणि स्थायी समितीसह अन्य महत्त्वाच्या समित्यांमध्ये प्रभावी प्रतिनिधित्वाची मागणी केली जाण्याची दाट शक्यता आहे. सत्तास्थापनेसाठी सुरू असलेल्या या अटी-शर्तींच्या राजकारणामुळे आणि संभाव्य वाटाघाटींमुळे मुंबईच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत असून, महायुतीमधील सत्तेचे हे समीकरण नेमके कसे जुळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!