Homeमहाराष्ट्रअहमदपूर तालुक्यात 3 रेश्टर स्केलचा भूकंप:महात्मा गांधी महाविद्यालयाच्या वेधशाळेमध्ये नोंद‎

अहमदपूर तालुक्यात 3 रेश्टर स्केलचा भूकंप:महात्मा गांधी महाविद्यालयाच्या वेधशाळेमध्ये नोंद‎

येथील महात्मा गांधी महाविद्यालयात अद्ययावत भूकंप वेधशाळा यंत्रणेची सुविधा उपलब्ध केली असून, भूगोल विभागातील या सुसज्ज भूकंप वेधशाळेमध्ये दि. ११ फेब्रुवारी राजी दुपारी ३.२० वाजता ३.०० रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद दिसून आली आहे. सदरील इमेजमध्ये ए.एच.एम.डी- १२३ नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील खपराळ हे गाव भूकंपाचे केंद्र असल्याचे दिसून आले आहे. तसेच या भूकंपाची खोली १० किलोमीटर असल्याचे दिसत आहे. मुखेड तालुक्यातील खपराळ, हिब्बट, धनज, जामखेड, चोंडी अशा अनेक ठिकाणी या भूकंपाचे धक्के बसल्याचे दिसून आले आहे. सदरील भूकंप वेधशाळेतील भूकंप यंत्रणेवरील नोंद पाहण्यासाठी विचार विकास मंडळाचे अध्यक्ष अँड किशनराव बेंडकुळे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. व्ही. पी. पवार, भूगोल विभागाचे प्रमुख प्रो. डॉ. नितीन देशमुख, प्रसिद्धी प्रमुख डॉ यादव सूर्यवंशी, डॉ. राजेश जोंधळे, कार्यालयीन अधीक्षक श्री. विशाल करंजे आदी उपस्थित होते. या यंत्रणेमुळे अहमदपूर परिसरातील लोकांना सदरील वेधशाळेचा उपयोग होणार आहे. ही वेधशाळा आणण्यासाठी महात्मा गांधी महाविद्यालयाचे भूगोल विभागाचे विभाग प्रमुख डॉ नितीन देशमुख यांनी प्रयत्न केल्यामुळे आणि ते भूकंपाचे अद्ययावत यंत्र या महाविद्यालयात आणले असल्यामुळे डॉ. नितीन देशमुख यांचे सर्व मंडळाच्या वतीने व प्राचार्यांच्या वतीने कौतुक केले जात आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!