Homeमहाराष्ट्रडोळ्यांच्या शस्त्रक्रियेदरम्यान 6 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू:दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेने खळबळ; चुकीची भूल...

डोळ्यांच्या शस्त्रक्रियेदरम्यान 6 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू:दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेने खळबळ; चुकीची भूल दिल्याचा पालकांचा गंभीर आरोप

पुण्यातील एरंडवणे परिसरातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका ६ वर्षांच्या चिमुरडीचा डोळ्यांच्या शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रियांशी जितेंद्र बागडे असे मृत मुलीचे नाव असून, तिच्या पालकांनी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच मुलीचा बळी गेल्याचा गंभीर आरोप केला आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांशीला डोळ्यांच्या तिरळेपणा आणि काचबिंदूच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी सकाळी तिला शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. “माझी मुलगी आत जाताना पूर्णपणे शुद्धीत होती आणि खेळत होती, मग अचानक असे काय झाले?” असा टाहो तिच्या वडिलांनी फोडला आहे. शस्त्रक्रिया सुरू असतानाच मुलीची प्रकृती खालावली आणि डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. नातेवाईकांनी आरोप केला आहे की, उपचारादरम्यान मुलीच्या तोंडातून रक्त येत होते, जे डॉक्टरांच्या अक्षम्य चुकीकडे बोट दाखवते. चुकीच्या भुलीमुळे (ॲनेस्थेशिया) किंवा उपचारातील हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा संशय पालकांनी व्यक्त केला आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. अलंकार पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. “ससूनच्या वैद्यकीय समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे अधिकृत कारण स्पष्ट होईल आणि त्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे पोलिसांनी सांगितले आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Gemini Financial Gain & Capricorn Promotion 2026

0
9 तासांपूर्वीकॉपी लिंकसोमवार, 2 नोव्हेंबर रोजी मिथुन राशीच्या नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नतीची शक्यता आहे आणि दीर्घकाळापासून रखडलेले पैसेही परत मिळू शकतात. मकर राशीच्या...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!