Homeमहाराष्ट्रसुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याच्या दिवशीच बारामतीमध्ये रोहित पवारांचा स्टंट:धनंजय मुंडेंनी टायमिंगवरुन...

सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याच्या दिवशीच बारामतीमध्ये रोहित पवारांचा स्टंट:धनंजय मुंडेंनी टायमिंगवरुन साधला निशाणा; विलिनीकरणाच्या चर्चेवरूनही सवाल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. मुंबईतील वरळी येथील डोममधील सभागृहात ही बैठक पार पडली. राज्यभर आणि देशभरातील प्रमुख पदाधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते. याच बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आणि नरहरी झिरवाळ यांसारखे नेते उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर बोलताना धनंजय मुंडे यांनी काही नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका करत पक्षातील अलीकडच्या घडामोडींवर भाष्य केले. धनंजय मुंडे म्हणाले की, दादांच्या अकाली निधनानंतर पक्षातील सर्वांनी एकमताने निर्णय घेतला की सुनेत्रा पवार यांच्यावर राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवावी. त्या वेळी सर्वांनी एकत्र येत निर्णय घेतला होता, असे त्यांनी स्पष्ट केले. माझी मध्यंतरी वाचा गेली होती. ती कायमची गेली असती तर बरे झाले असते, असे वाटण्याची वेळ माझ्यावर आली आहे, असे भावनिक विधान करत त्यांनी दुःख व्यक्त केले. आपल्या तोंडून दादांबद्दल शोक व्यक्त करण्याची वेळ येऊ नये, अशी भावना त्यांनी मांडली. महाराष्ट्राच्या विकासाची धुरा सुनेत्राताई सक्षमपणे सांभाळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र, काही जणांकडून शपथविधीबाबत घाई केल्याचा आरोप केला जात असल्याने त्यांनी त्यावरही तीव्र प्रतिक्रिया दिली. वहिणींना शपथविधीची घाई झाली होती, आम्ही दबाव टाकला, असे म्हणणाऱ्यांना माझा प्रश्न आहे, असे म्हणत मुंडेंनी हल्ला चढवला. त्यांनी थेट विचारले की, अजित दादांना अग्नी द्यायच्या आधी तुम्ही विलिनीकरणाची भाषा बोलत होतात, ते काय होते? या विधानाने सभागृहात एकच खळबळ उडाली. पुढे त्यांनी असेही म्हटले की, ज्यावेळी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या, तेव्हा तुम्हाला साध्या शुभेच्छाही देता आल्या नाहीत का? एक साधा संदेश जरी दिला असता, तरी तो सन्मानाचा भाग ठरला असता, असे ते म्हणाले. महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला काही कळत नाही का? असा सवाल करत त्यांनी उपस्थितांना विचार करायला भाग पाडले. त्यांच्या या वक्तव्यामुळे रोहित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला असल्याचे स्पष्ट झाले. धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा निर्णय आधीच जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर काही घटनांवरून अनावश्यक वाद निर्माण करण्यात आले, असा त्यांचा आरोप होता. काल तक्रार नोंदवली नाही म्हणून एक प्रकारचा देखावा केला गेला. आज बारामतीत तक्रारीसाठी पुन्हा देखावा केला, असे ते म्हणाले. हे सर्व प्रकार केवळ आमच्या बातम्या दाबण्यासाठी आणि लक्ष विचलित करण्यासाठी होत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या मते, अशा हालचालींमुळे पक्षातील वातावरण दूषित होत आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हे सगळे अत्यंत किळसवाणे वाटते, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले. धनंजय मुंडे यांच्या भाषणामुळे राजकीय वातावरण तापले या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या निवडीमुळे पक्षात नवे नेतृत्व पुढे आले असल्याचा संदेश देण्यात आला. मात्र, या निमित्ताने सुरू झालेली टीका आणि आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आले आहेत. एकीकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या सुनेत्रा पवार यांच्यावर विश्वास व्यक्त केला जात असताना, दुसरीकडे काही नेत्यांच्या भूमिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे आगामी काळात पक्षातील राजकीय समीकरणे कशी बदलतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. धनंजय मुंडे यांच्या भाषणामुळे राजकीय वातावरण आणखी तापले असून, या वक्तव्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!