Homeमहाराष्ट्रमुकुंदवाडीत मोबाइल चोरीच्या वादातून सराईत गुन्हेगाराचा पहाटेतच गोळीबार:घरात पळाल्याने मनपा स्वच्छता निरीक्षक...

मुकुंदवाडीत मोबाइल चोरीच्या वादातून सराईत गुन्हेगाराचा पहाटेतच गोळीबार:घरात पळाल्याने मनपा स्वच्छता निरीक्षक थोडक्यात बचावले, आरोपी अटकेत

मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात सोमवारी (१९ जानेवारी) सकाळी सहा वाजेच्या सुमारास सराईत गुन्हेगारांच्या टोळक्याने गोळीबार करून एकास जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाचवण्यासाठी पुढे आलेल्या नागरिकांना धमकी देऊन त्याने दहशत निर्माण केली. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात शुभम जाट, मयूर उनगे, शिवा ऊर्फ छोट्या रवी भालेराव, गोल्या ऊर्फ विजय दिनकर धनई, मनोज संजय पडूळ, सागर राऊत, अमर ऊर्फ अतुल पवार यांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. सचिन लाहोट (३५, शिवशाहीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. सकाळीच टोळके त्यांच्या नावाने शिवीगाळ करून बाहेर येण्यासाठी चिथावणी देत होते. त्यांनी खिडकीतून पाहिले असता, शुभमच्या हातात गावठी कट्टा तर अन्य टोळक्याच्या हातात तलवारी व चाकू होते. कुटुंब दरवाजा उघडत नसल्याने त्याने दगड दरवाजावर मारून तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सचिन घराच्या गच्चीवर पळाले. त्यांना बघून शुभमने त्यांच्या दिशेने गोळी झाडली. हा गदारोळ ऐकून आजूबाजूची मंडळी जमली. टोळक्याने कुणी मध्ये आले तर त्यांनादेखील जिवे मारण्याची धमकी दिली. मात्र लोकांचा जमाव वाढत असल्याने त्यांनी पळ काढला. तातडीने पुंडलिकनगर पोलिसांच्या पथकासह गुन्हे शाखेचे टीम दाखल झाली. त्यांनी आरोपींच्या शोधासाठी तीन पथके रवाना केली. घटनास्थळी पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले, निरीक्षक गजानन कल्याणकर, अशोक भंडारे, सचिन इंगोले यांनी पाहणी केली. पोलिसांना बघून पाण्याच्या टाकीत लपला बीड बायपास येथील म्हस्के पेट्रोल पंपाच्या परिसरात शुभमचे घर आहे. तिथे उपनिरीक्षक अर्जुन राऊत यांचे पथक दाखल होताच शुभम गच्चीवरून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. पथकाने चहुबाजूने वेढा घातला. त्या वेळी तो पाण्याच्या टाकीत लपून बसला होता. बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्यावर त्याने खिशातील ब्लेड काढून स्वतःवर हल्ला करण्याची धमकी दिली. त्याच्या आई, बहीण व भावानेदेखील पोलिसांच्या कारवाईत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने टाकी फोडून त्याला बाहेर काढत ताब्यात घेतले. तिथून त्याला खाली आणत असताना त्यांच्या कुटुंबाने अडवण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांसह आरोपीही पडला होता. एमपीडीएच्या कारवाईनंतर वर्षभराने शहरात येऊन राडा शुभम जाट हा सराईत गुन्हेगार अाहे. त्याच्यावर २०१३ पासून १० गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर २०२१ मध्ये एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवस त्याने शहरात वास्तव्य केले. मात्र त्यानंतर तब्बल दीड वर्ष तो हैदराबादमध्ये राहायला होता. तो गेल्या महिन्यातच शहरात परतला आहे. परत येताच आपली दहशत पुन्हा निर्माण करण्यासाठी तो चोरी व गावठी कट्टा नाचवण्याचे प्रकार करत होता. त्यातूनच त्याने हा राडा केला आहे. त्याच्यासोबत अटकेत असलेल्या अमर पवारवर एमआयडीसी वाळूज ठाण्यात खुनाच्या गुन्ह्यासह अन्य तीन गुन्हे दाखल आहेत. तर, मयूर उनगे व विजय धनई यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. यातील आरोपींना मोठ्या शिताफीने पोलिसांच्या पथकाने अटक केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पॅरलल इन्व्हेस्टिगेशन



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!