प्रतिनिधी | अहिल्यानगर रब्बी हंगामाच जिल्हाभरात सुमारे १ लाख ५४ हजार ६२५ हेक्टवर गव्हाची पेरणी झाली. हे प्रमाण सरासरीच्या १२० टक्के आहे. सद्यस्थितीत पक्वतेच्या टप्प्यावर आहे. परंतू, दोन दिवसांत अचानक हवामानात बदल होऊन, ढगाळ वातावरण निर्माण झाले. शनिवारी मध्यरात्रीनंतर सर्वदूर पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दोन दिवस हवामान ढगाळ राहणार आहे. वादळी पाऊस झाल्यास गव्हाचे पीक आडवे होऊन नुकसानीची धास्ती आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात नव्याने ७५ हजार ४८६ हेक्टर क्षेत्रावर उसाची नव्याने लागवड झाली आहे. ऊस वगळता एकूण सरासरी रब्बी क्षेत्र ४ लाख ४९ हजार ४६७ हेक्टर आहे. त्यापैकी ४ लाख ३४ हजार ३५२ हेक्टरवर पेरणी झाली. हे प्रमाण सरासरीच्या ९६.५९ टक्के आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस सुरू राहिल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीचा वेग मंदावला होता. त्यानंतर नोव्हेंबर व डिसेंबर अखेरपर्यंत पेरणी करण्यात आली. त्यात ज्वारीची पेरणी यंदा सरासरीच्या ७५ टक्के झाली. तर मका १०९ टक्क्यांवर पेरणी करण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक गव्हाची पेरणी झाल्याची नोंद झाली. हे पीक साधारणपणे ११० ते १४० दिवसांचे असते. पेरणीपासून ते पक्वतेपर्यंत अंकुरण, फुटवे येणे, ओंब्या धरणे आणि दाणे भरणे असे टप्पे येतात. सद्यस्थिती बहुतांश ठिकाणी दाणे भरून, शेवटच्या पाण्यावर गहू आहे. तर काही ठिकाणी पक्व होऊन सोंगणीच्या स्थितीत आहे. पुढील कालावधीत अवकाळी पाऊस बरसल्यास, गहू उत्पादकांना फटका बसण्याची भिती आहे. रवी आंधळे, शास्त्रज्ञ, कृषी विद्यापीठ अहिल्यानगर १४४६२, पारनेर १८५४८, श्रीगोंदे ६९६४, कर्जत २०४२२, जामखेड ३६५२१, शेवगाव २६७२, पाथर्डी ११५३५, नेवासे ११३९, राहुरी १७००, संगमनेर ४१२२, अकोले ८७६, कोपरगाव ६२, श्रीरामपूर ४८९, राहारात ३२१८ हेक्टर क्षेत्रावर रब्बीतील गव्हाची पेरणी झाली आहे. यंदा मशागतीला विलंब झाल्यामुळे उशिरापर्यंत पेरणी सुरू आहे. सद्यस्थितीत गव्हाची पिके पक्वतेच्या टप्प्यावर आहेत. बंगालच्या उपसागरातून आर्द्रतायुक्त वारे व उत्तरेकडील वारे यामुळे वातावरण ढगाळ बनले आहे. दोन्ही वऱ्यांचा संयोग मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या वरील भागात होतो आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विदर्भ, पुणे, अहिल्यानगरसह काही भागात दोन दिवस हवामान ढगाळ राहील, तसेच पावसाच्या हलकी सरी कोसळू शकतात. सद्यस्थितीत गव्हाचे पिक पक्वतेच्या टप्प्यावर आहेत. अशा स्थितीत वादळी पाऊस झाल्यास गव्हाचे नुकसान होऊ शकते. याव्यतिरिक्त अंब्याचा मोहर गळून उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.
Source link
हवामान बदलतय, १.५४ लाख हेक्टर क्षेत्रावरील गव्हावर संकट:गहू पक्वतेच्या टप्प्यावर, वादळी पाऊस झाल्यास पिके आडवी होण्याची धास्ती
- Advertisment -
- Advertisment -
ताज्या बातम्या
स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.
...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...
हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

























