Homeमहाराष्ट्रबाळासाहेबांनी हेच शिकवलं का?: भाजपचा संजय राऊत यांच्यावर पलटवार; कर्तृत्वशून्य, म्हणत उद्धव...

बाळासाहेबांनी हेच शिकवलं का?: भाजपचा संजय राऊत यांच्यावर पलटवार; कर्तृत्वशून्य, म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा – Mumbai News

महाराष्ट्र (मुंबई) : जम्मू-काश्मिरातील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. इतकेच नाही तर रामालाही आता तुमचा कंटाळा आला असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्य.

या संदर्भात चित्रा वाघ यांनी एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्या म्हणाल्या की, या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असताना आणि अमेरिका, रशिया सारखे शक्तिशाली देश भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभे असताना, तुम्हाला अशी अवदसा का आठवते? तसेच बाळासाहेबांनी हेच शिकवलं का? असा प्रश्नही वाघ यांनी उपस्थित केला.

नेमक्या काय म्हणाल्या चित्रा वाघ ते देखील पहा….

सर्वज्ञानी रडतरौत, तोंड उघडलं की त्यातून वाहणारं ते गटार थांबवा.. देशावर, देशातील हिंदूंवर, आमच्या अस्मितेवर दहशतवादी हल्ला झाला आहे..आणि तुम्ही खुशाल अकलेचे तारे तोडत आहात..थोडीशी जनाची नाही तर मनाची तरी…?

या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असताना आणि अमेरिका, रशिया सारखे शक्तिशाली देश भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभे असताना, तुम्हाला अशी अवदसा का आठवते हो? वंदनीय बाळासाहेबांनी हेच शिकवलं का? लाज वाटली पाहिजे तुम्हाला….!

दहशतवादी हल्ला झाल्याचे वृत्त समजताच देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी सर्व प्रमुख नेत्यांशी आणि सुरक्षा दलाच्या प्रमुखांशी चर्चा करून त्यांना सूचना दिल्या..गृहमंत्री अमितभाई शहा तातडीने काश्मीरमध्ये पोहोचलेसुद्धा..एवढेच काय, आपला सौदी अरेबियाचा दौरा गुंडाळून स्वतः मोदीजी भारतात पोहचले आणि तुमची आपली वायफळ बडबड खुशाल सुरूच आहे !

एक लक्षात घ्या, केंद्रात मोदीजींच्या नेतृत्वाखालील भाजपाचे भक्कम आणि कर्तव्यदक्ष सरकार आहे. कोणालाही सुट्टी मिळत नाही.. दहशतवादाला तर नाहीच नाही..!

शेवटचे एकच सांगते.. गटारासारखं वाहणारं ते थोबाड सांभाळा आणि बंद करा..तुमच्यासारख्या नतद्रष्टांमुळेच राष्ट्र विरोधकांना ताकद मिळते आणि तिकडे पाकिस्तानचेही फावते !

शहाणे व्हा, दहशतवादाविरुद्ध लगेच ‘ॲक्शन मोड’ मध्ये येणारे हे सरकार आहे.. चार भिंतींच्या आड, एसी मध्ये बसून, तकलादू आदेश देणारं हे कर्तृत्वशून्य सरकार नाही..सध्या एवढंच ! सौ.दिव्यमराठी.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

देणगी चोरी प्रकरणी VHPने म्हटले- हिशोबासाठी ट्रस्ट जबाबदार:SITने तपासाची व्याप्ती वाढवावी, मंदिराच्या नावाखाली देणग्या...

0
हरिद्वारमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या (VHP) केंद्रीय मार्गदर्शक मंडळाची दोन दिवसीय बैठक शुक्रवारी संपली. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत विहिपने अयोध्या राम मंदिर देणगी वादाच्या...

आदित्य साहेब, आता मैदानात उतरा अन् गद्दारांना जागा दाखवा!:शिवसेना ठाकरे गटाच्या वर्धापन दिनी नितीन...

0
शिवसेना ठाकरे गटाच्या वर्धापन दिन सोहळ्यात 'दंगलकार' नितीन चंदनशिवे यांनी आपल्या वक्तृत्व शैलीने उपस्थित प्रेक्षकांची व शिवसैनिकांचे मने जिंकली आहेत. आदित्य साहेब, आता...

नृपेंद्र मिश्रा म्हणाले- राम मंदिराच्या देणगीवर दरोडा टाकला गेला:मंदिर विश्वस्तांनी सांगितले- विश्वासघात झाला, संपूर्ण...

0
श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष माजी IAS नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, राम मंदिरात अर्पण चोरीवर उघडपणे दरोडा टाकण्यात आला. मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन...

ऑगस्ट 2026 सर्व 12 चिन्हांसाठी राशिचक्र अंदाज

0
15 तासांपूर्वीलिंक कॉपी करा20 जूनच्या रात्रीपासून मंगळ वृषभ राशीत प्रवेश करेल. या राशीत 2 ऑगस्टपर्यंत राहील. वृषभ शुक्राच्या मालकीची रास आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य...
spot_img

अविष्काच्या शतकामुळे श्रीलंका-ए ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत:अफगाणिस्तानला 103 धावांनी हरवले; 21 जून रोजी भारताशी...

0
अविष्का फर्नांडोच्या शतकामुळे श्रीलंका-ए संघ वनडे ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. संघाने दांबुला येथे अफगाणिस्तान-ए संघाला 103 धावांनी हरवले. 21 जून रोजी...

वर्तमानपत्रात कधीही अन्न गुंडाळू नका:शाईमुळे कर्करोग आणि फूड पॉयझनिंगचा धोका, अन्न पॅकेजिंगचा योग्य आणि...

0
जर तुम्हाला स्ट्रीट फूड आवडत असेल, तर तुम्ही वर्तमानपत्रात गुंडाळलेले समोसे, वडापाव किंवा जिलेबी खाल्लीच असेल. पण तुम्हाला माहीत आहे का की खाण्यापिण्याच्या...

पुष्पा-2 चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनला न्यायालयाचे समन्स:हजर राहावेच लागेल, चार्जशीटमध्ये आरोपी क्रमांक 11 बनवण्यात...

0
हैदराबादमधील नंपल्ली न्यायालयाने तेलुगु चित्रपट स्टार अल्लू अर्जुनला न्यायालयात वैयक्तिकरित्या हजर राहण्यासाठी समन्स जारी केले आहे. ही कायदेशीर कारवाई डिसेंबर 2024 मध्ये त्यांच्या...

आयफोनसह ॲपलची उत्पादने महाग होतील:टिम कुक म्हणाले- चिपच्या कमतरतेमुळे खर्च वाढला, किंमती वाढवणे भाग...

0
टेक कंपनी ॲपल लवकरच आयफोन आणि तिच्या इतर उत्पादनांच्या किमती वाढवू शकते. कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी 'द वॉल स्ट्रीट जर्नल'ला दिलेल्या एका...
error: Content is protected !!