Homeमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरचा रील स्टार अरुण तुपेचे अकाली निधन:सकाळी झोपेतच मृत्यू झाल्याची प्राथमिक...

छत्रपती संभाजीनगरचा रील स्टार अरुण तुपेचे अकाली निधन:सकाळी झोपेतच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती, कारण अद्याप अस्पष्ट

छत्रपती संभाजीनगरचा लोकप्रिय रील स्टार अरुण तुपेचे आज सकाळी निधन झाले आहे. बालाजी नगर येथील त्याच्या घरी सकाळच्या सुमारास मृतावस्थेत आढळून आला. अरुणच्या अकाली निधनाने सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अरुण तुपे सकाळी त्याच्या कुटुंबीयांना अत्यंत गंभीर अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. मात्र, अरुणचा मृत्यू कशामुळे झाला याचे कारण अद्याप समजू शकले नाही. इन्स्टाग्रामवर अरुण तुपेने मृत्यूच्या 22 तास आधीच एक रील शेअर केली होती. तसेच त्या रीलवरील कमेंट्सला तो रिप्लाय देखील देत होता. त्यामुळे अचानक असे काय घडले ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला, हे कारण अद्याप समजू शकले नाहीये. संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात त्याच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्याच्या गावी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. अरुण तुपेने सोशल मीडियावर आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याचे व्हिडिओ कॉमेडी असायचे. त्याचा स्वभाव देखील नेहमीच हसता-खेळता असायचा. त्याच्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्याचा मित्र परिवार देखील मोठा होता. त्याच्या अकाली निधनाने मित्र परिवारावरही शोककळा पसरली आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!