22 तासांपूर्वी
- लिंक कॉपी करा
उद्या (गुरुवार, 2 एप्रिल) श्रीराम भक्त हनुमानजींचा प्रकट उत्सव आहे. त्रेता युगात चैत्र पौर्णिमेला शिवजींच्या अंशावतार म्हणून केसरी आणि माता अंजनी यांच्या घरी ते अवतरले होते, त्यांचे नाव मारुती होते. नंतर देवराज इंद्राच्या प्रहारामुळे मारुतीचे नाव हनुमान पडले. 2 एप्रिल रोजी चैत्र महिना संपेल आणि वैशाख महिन्याचे स्नान सुरू होईल.
उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्या मते, चैत्र पौर्णिमेला श्रीराम, हनुमानजी, भगवान विष्णू, बाळ गोपाळ यांची विशेष पूजा करावी. या दिवशी भगवान सत्यनारायणाची कथा देखील वाचली आणि ऐकली जाते. हनुमानजींचे भक्त सुंदरकांड आणि हनुमान चालीसाचे पठण करतात. बाळ गोपाळांना लोणी-मिश्रीचा नैवेद्य दाखवा. विष्णूंच्या पूजेमध्ये ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करा.
अशी करू शकता हनुमानजींची सोपी पूजा
- हनुमानजींच्या प्रकट उत्सवाच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करा. सूर्यदेव हनुमानजींचे गुरु आहेत. त्यांच्या पूजेने हनुमानजी प्रसन्न होतात.
- सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर घरातील मंदिरात सर्वप्रथम गणेश पूजा करा. गणेशजींना स्नान घाला. हार-फुले आणि वस्त्रांनी शृंगार करा. दूर्वा अर्पण करा. लाडूंचा नैवेद्य दाखवा. धूप-दीप लावून आरती करा.
- गणेश पूजेनंतर राम दरबारासह हनुमानजींचा अभिषेक करा. हनुमानजींना शेंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा. पूजेचे साहित्य अर्पण करा. देवांसमोर धूप-दीप लावा. हार-फुले अर्पण करा. मिठाईचा नैवेद्य दाखवा.
- या दिवशी हनुमान चालीसा आणि सुंदरकांडाचे पठण करावे. ॐ रामदूताय नमः या मंत्राचा जप कमीतकमी १०८ वेळा करा.
देवराज इंद्राने वज्राने बाल मारुतीवर प्रहार केला होता
- पौराणिक कथा अशी आहे की, मारुती लहान असताना, एके दिवशी त्यांनी सूर्याला फळ समजून गिळून टाकले होते. सूर्य गिळल्यामुळे सृष्टीवर अंधार पसरला. सर्व देवी-देवता चिंतेत पडले. त्यावेळी देवराज इंद्र मारुतीवर रागावले आणि त्यांनी आपल्या वज्राने प्रहार केला.
- वज्राच्या प्रहाराने मारुतीच्या हनुवटीला (ठोडीला) दुखापत झाली. मारुतीवर प्रहार झाल्याने त्यांचे वडील पवनदेव रागावले, त्यांनी संपूर्ण सृष्टीतील हवाच थांबवली. तेव्हा सर्व देवतांनी पवनदेवांना प्रार्थना केली की त्यांनी वायूला थांबू नये, अन्यथा सृष्टी नष्ट होईल.
- सृष्टीच्या भल्यासाठी पवनदेवांनी देवतांचे हे म्हणणे मान्य केले. यानंतर सर्व देवतांनी मारुतीला वेगवेगळ्या शक्ती दिल्या. हनुवटीला (ठोडीला) झालेल्या दुखापतीमुळे मारुतीला हनुमान हे नवीन नाव मिळाले.

























