पुणे : पुण्यातील नामांकित चितळे बंधू मिठाईवाले यांच्या प्रसिद्ध असलेल्या बाकरवडीची कॉपी करून चितळे स्वीट होम नावाने संबंधित बनावट बाकरवडी बाजारात विक्री केले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चितळे बंधू मिठाईवाले यांच्या नावाचा गैरवापर करून ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चितळे बंधू मिठाईवाले यांना बाकरवडीच्या संदर्भात वेगवेगळ्या ग्राहकांच्या तक्रारी मागील काही दिवसांपासून येणे सुरू झाले. या तक्रारींची दखल घेत चितळे बंधू मिठाईवाले यांनी पाहणी केली असता, कोणीतरी चितळे स्वीट होम नावाने बाकरवडीची पाकिटे विक्री करत असल्याचे निदर्शनास आले. चितळे स्वीट होमचे नाव सदर पाकिटांवर वापरून चितळे बंधू मिठाईवाले यांचाच कस्टमर केअर नंबर, कॉन्टॅक्ट डिटेल्स, ई-मेल आयडी, मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स, वेबसाईट याची माहिती पाकिटावर नोंदवण्यात आली असल्याचे दिसून आले आहे. अशाप्रकारे सदर पाकिटे चितळी स्वीट होमचीच असल्याचे भासविण्यात आले आहे. मात्र, या पाकिटांची योग्य प्रकारे तपासणी केली असता, त्याच्या बाकरवडी बनवण्याच्या पत्त्यात फरक आहे. चितळे बंधू मिठाईवाले यांचे भोर तालुक्यात राजे याठिकाणी बाकरवडी तयार करण्याचा मुख्य कारखाना असून पुण्यातील पर्वती इंडस्ट्रियल कॉलनी मुकुंदनगर येथे बाकरवडी तयार करण्याचे छोटे युनिट्स देखील आहेत. मात्र ,बनावट बाकरवडीच्या पाकिटावर वेगळाच पत्ता दिसून आलेला आहे. याबाबत पुढील तपास विश्रामबाग पोलिस करत आहे.
खरेदी केलेल्या पाकिटांची तपासणी केली असता बाकरवडीमध्ये तफावत असल्याचे फिर्यादी यांना आढळून आले. तसेच त्या पाकिटावर चितळे बंधू मिठाईवाले यांचे अधिकृत ई मेल आयडी customercare@chitalebandhu.in कस्टमर केअर नंबर 9922944482, व वेबसाईट www.chitalebandhu.in डिटेल्स हे पाकिटांच्या साईड पट्टीवर हुबेहुब छापले असल्याचे दिसून आले. सौ.दिव्य.मराठी.भास्कर.





























