Homeमहाराष्ट्रविधान परिषदेसाठी भाजपचे 11 उमेदवार जाहीर:प्राजक्त तनपुरे यांना संधी, सुप्रिया सुळेंच्या होणाऱ्या...

विधान परिषदेसाठी भाजपचे 11 उमेदवार जाहीर:प्राजक्त तनपुरे यांना संधी, सुप्रिया सुळेंच्या होणाऱ्या व्याह्यांनाही उमेदवारी; पाहा यादी

राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झालेल्या या अधिकृत पत्रात ११ मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेले प्राजक्त तनपुरे आणि सुप्रिया सुळे यांचे होणारे व्याही अरुण लखाणी यांना भाजपने संधी दिली आहे. विशेष म्हणजे, प्रदीर्घ चर्चा आणि दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर या नावांवर रात्री उशिरा अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले. भाजपने या यादीच्या माध्यमातून विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्र या सर्वच विभागांतील प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमधील विजयाचे गणित लक्षात घेऊन भाजपने त्या-त्या भागातील प्रभावशाली नेत्यांना उमेदवारी दिली आहे. अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी देऊन भाजपने या भागात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या मतदारसंघातून अरुण लखाणी यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. लखाणी हे खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचे होणारे सासरे असल्याने त्यांच्या उमेदवारीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार खालीलप्रमाणे दिल्लीतून झाली घोषणा विधान परिषद निवडणुकीसाठी कुणाला संधी द्यायची, याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून भाजपमध्ये खलबतं सुरू होती. राज्यस्तरावर झालेल्या विविध बैठकांनंतर ४८ संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली होती. ही यादी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाचे प्रभारी नितीन नबीन यांच्याकडे सोपवली होती. त्यानंतर दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर आज अंतिम ११ नावांची घोषणा करण्यात आली. उद्या शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरणार पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता हे सर्व ११ उमेदवार उद्या आपापल्या संबंधित मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता असून, या अर्जांनंतर विधान परिषदेच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. १८ जून रोजी मतदान, २२ जूनला मतमोजणी विधान परिषदेच्या निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना २५ मे २०२६ रोजी जारी करण्यात आजी. अर्ज भरण्याची शेवटची तारीख १ जून आहे. तर अर्जांची छाननी २ जून रोजी होणार आहे. उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी शेवटची तारीख ४ जून आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर मतमोजणी २२ जून रोजी होणार आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

इंडिया ब्लॉक अलायन्स वाद; माकपने काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली आहे

0
नवी दिल्ली5 तासांपूर्वीलिंक कॉपी कराइंडिया ब्लॉकच्या बैठकीपूर्वी मित्रपक्षांनी काँग्रेसवर सहकार्य न केल्याचा आरोप केला आहे. शनिवारी, CPI(M) चे सरचिटणीस एम. ए. बेबी यांनी...

‘कॉकरोच जनता पार्टी’चे दिल्लीत जोरदार आंदोलन:CM फडणवीसांची ‘अराजकता’ म्हणत टीका, तर ठाकरेंचा सरकारला इशारा

0
सोशल मीडियाच्या माध्यमातून कोट्यवधी तरुणांना आकर्षित करणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी'ने (CJP) आज देशाची राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर थेट रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन केले. या...

गांगुली म्हणाले- मी युसूफ पठाण यांना खासदारकी सोडायला सांगितले नाही:मला राजकारणात रस नाही, दावा-...

0
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली म्हणाले की, मी ममता बॅनर्जींच्या सांगण्यावरून टीएमसी खासदार आणि माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांना राजीनामा देण्यास...

6 जूनचे राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कुंभ राशीच्या लोकांना उत्पन्नाचे स्रोत...

0
शनिवार, 6 जून रोजी मेष राशीचे लोक प्रॉपर्टी किंवा गाडी खरेदी-विक्री करण्याचा विचार करू शकतात. मिथुन राशीच्या लोकांना व्यवसायात महत्त्वाचे ऑर्डर मिळण्याची शक्यता...
spot_img

कर्णधार म्हणून गिलच्या दुसऱ्या सर्वात जलद हजार धावा:पंत 50 कसोटी सामने खेळणारा तिसरा भारतीय...

0
भारत-अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने 85 षटकांत 3 गडी गमावून 368 धावा केल्या. भारतीय कर्णधार शुभमन गिल आणि सलामीवीर केएल...

कंट्री काउंटर्स; जगातील सर्व देश फिरण्याचा ट्रेंड:गर्दीला कंटाळलेले लोक अस्पर्शित ठिकाणांकडे वळत आहेत, तज्ज्ञ...

0
प्रशांत महासागरातील छोटासा बेट असलेला देश ‘तुवालु’... हवाई आणि ऑस्ट्रेलियाच्या मध्ये वसलेला हा देश जगातील त्या मोजक्या ठिकाणांपैकी एक आहे, जिथे वर्षभरात एखादाच...

शिल्पा शिंदेवर कायदेशीर कारवाईची CM फडणवीसांकडे मागणी:निर्मात्यावर लैंगिक छळाचे खोटे आरोप केले; शिल्पाची पोस्ट-...

0
टेलिव्हिजन अभिनेत्री शिल्पा शिंदेच्या एका अलीकडील खुलाश्यावर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने तीव्र आक्षेप घेतला आहे. शिल्पाने कॉमेडियन भारती सिंग आणि...

दिल्ली E85 फ्लेक्स इंधन लाँच

0
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी करा85% इथेनॉल मिश्रित E85 इंधन दिल्लीत अधिकृतपणे लॉन्च झाले आहे. विशेष म्हणजे, हे दिल्लीत विकल्या जाणाऱ्या E20 पेट्रोलपेक्षा ₹20...
error: Content is protected !!