अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा निकाल भाजपाला एकतर्फी सत्ता देणारा आहे, तर शिवसेनेचे उमेदवार माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांचे मुलगा व मुलगी दोघेही निवडून आल्याने दोन्ही पक्षाच्या कार्यकर्ते आनंदी झाले आहेत. आमदार सचिन
.
त्यातच माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या घरातील मुलगा व मुलगी पहिल्यांदा निवडणूक लढवत होते. त्यामुळे त्यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक होती. त्यातच ऐन निवडणुकीत पदाधिकारी कार्यकर्ते भाजपा मध्ये गेले होते. शिवराज म्हेत्रे व मुलगी शीतल म्हेत्रे हे दोघेही निवडून आल्याने कार्यकर्ते मध्ये उत्साह संचारला आहे. चपळगाव गटात व गणात भाजपाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी व भाऊ निवडणूक लढवत असल्याने निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. तशातच वागदरी गटातील आनंद तानवडे शिवसेना शिंदे सेनेत गेल्याने चुरस वाढली. जिल्हा परिषदेच्या सहा गटापैकी तब्बल चार ठिकाणी भाजपा विजयी ठरला तर पंचायत समितीच्या १२ गणापैकी भाजपने ८ जागा जिंकत जनतेने भाजपालाच परत पसंती दिली तर दोन जिल्हा परिषद गट व चार पंचायत समिती गण जिंकत शिवसेना शिंदे गट माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली रंगतदार लढत दिली.
भाजपने चपळगांव, मंगरूळ, जेऊर व नागणसुर चार जिल्हा परिषद गट ताब्यात घेतले तर चपळगांव , कुरनूर, वागदरी , जेऊर, दहिटणे, सुलेरजवळगे, मंगरूळ, नागणसूर या आठ गण जिंकत पंचायत समितीवर भाजपाचा झेंडा फडकवला. शिवसेना शिंदे गटाने वागदरी व सलगर जिल्हा परिषद गटावर विजयी झाले तर शिवसेना शिंदे गटाने गटाने शिरवळ, तोलनूर,सलगर व मुगळी या चार पंचायत समिती जिंकत कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य भरले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेना शिंदे सोबत एकत्र निवडणुका लढवल्या होत्या. पण त्याचा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ला एकही जागा जिंकुन आणता आलेली नाही. इतर पक्षालाही प्रभाव पाडता आले नाही. भाजपा पक्षाने चपळगांव गटात भाजपाच्या शांभवी कल्याणशेट्टी यांनी सर्वाधिक ७१५८ मताधिक्य घेतले तर चपळगांव गणात सागर कल्याणशेट्टी यांनी २६४१ मताधिक्य घेतले. तर कुरनूर गणात विनोद मोरे याला १९८७ मताधिक्य मिळाले.वागदरी जिल्हा परिषद गट शिवसेना प्रवीण तानवडे याने ३४२८ मताधिक्य मिळवत ऐनवेळेस तानवडे परिवाराने भाजपा सोडून शिवसेनेत प्रवेश करूनही विजय मिळवले.
काँग्रेसचा गड भाजपने केला हस्तगत शिरवळ पंचायत समिती गणेश मोरे शिवसेना २१२३ मताधिक्य मिळवून विजयी झाले. पण वागदरी गणात राखता आले नाही. तेथे भाजपाचे अप्पासाहेब किवडे अवघ्या १४६ मताधिक्य मिळवत विजयी झाले. जेऊर जिल्हा परिषद गट मध्ये काँग्रेसचे मल्लिकार्जुन पाटील यांचा गड हस्तगत करत भाजपाचे तीनही जागा जिंकल्या. माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या निधनानंतर मंगरूळ जिल्हा परिषद गट त्यांना राखता आले नाही. तेथेही भाजपाने सिद्रामप्पा पाटील गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हरवत तीनही जागा जिंकल्या.


























