पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका निष्पाप चिमुकलीवर नराधमाने आधी अत्याचार केला आणि त्यानंतर तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याचे उघड झाले असून, या पाशवी कृत्यामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. नसरापूर गावात माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका 65 वर्षीय नराधमाने घरासमोर खेळणाऱ्या अवघ्या 4 वर्षीय चिमुकलीला गोठ्यात नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्या केली. इतकेच नव्हे, तर आरोपीने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला होता. या अमानवीय कृत्यामुळे संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली असून सध्या तिथे कमालीचे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुपारी खेळता खेळता चिमुकली बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी केलेल्या शोधाशोधीत तिचा मृतदेह गोठ्यात आढळून आला. यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संबंधित नराधम तिला गोठ्याकडे नेताना स्पष्टपणे दिसल्याने हा घृणास्पद प्रकार उघडकीस आला. सुट्टीनिमित्त आपल्या आजीकडे आलेल्या या चिमुकलीचा असा करुण अंत झाल्याने परिसरात प्रचंड संतापाची लाट असून, पोलिसांनी संशयित आरोपीला तातडीने ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी सुरू केली आहे. या हृदयद्रावक घटनेनंतर नसरापूरचे ग्रामस्थ अत्यंत आक्रमक झाले असून, जोपर्यंत नराधम आरोपीला त्यांच्या ताब्यात दिले जात नाही, तोपर्यंत चिमुकलीचा मृतदेह हलवू देणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. संतप्त गावकऱ्यांनी सध्या गोठ्याबाहेरच ठिय्या मांडला असून, पोलिस प्रशासनाकडून चर्चेचे आणि समजावण्याचे प्रयत्न सुरू असले तरी ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने घटनास्थळी मोठा तणाव आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, घटनास्थळी पोहोचलेल्या नातेवाईकांनीही आपला तीव्र संताप व्यक्त करत आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
Source link
पुण्यातील भोरमध्ये माणुसकीला काळिमा!:65 वर्षांच्या नराधमाने 4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून केली निर्घृण हत्या, गावकऱ्यांचा संताप
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
NTA म्हणाले- NEET पेपर आमच्या प्रणालीतून लीक झाला नाही:संसदीय समितीने विचारले- पुन्हा परीक्षा का,...
NEET-UG पेपरफुटी प्रकरणासंदर्भात गुरुवारी संसदेच्या स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीत NEET परीक्षा घेणारी संस्था नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) चे अधिकारीही उपस्थित होते....
सातारा जिल्ह्यातही ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची धडक:धुळदेव ग्रामसभेत तरुणांचा एल्गार, हातात पोस्टर घेऊन आक्रमकपणे उपस्थित...
देशभरात चर्चेत आलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) या व्यंगात्मक मोहिमेचे पडसाद आता सातारा जिल्ह्यातीस माण तालुक्यातही उमटू लागले आहेत. माण तालुक्यातील धुळदेव येथील...
गुजरात विधानसभा निवडणुका 2027 मध्ये होणार:2029 मध्ये ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची अंमलबजावणी झाल्यास 2034...
वन नेशन, वन इलेक्शन प्रकरणी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीने (JPC) विविध राज्यांमध्ये जाऊन राजकीय पक्ष आणि अधिकाऱ्यांशी सल्लामसलत सुरू केली आहे. तीन...
स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:शास्त्रे सत्याचा मार्ग दाखवतात आणि आम्हाला शुभ संकल्पांसह जीवन जगण्याची...
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; पवित्र शास्त्र सत्याचा मार्ग दाखवते आणि उदात्त संकल्प आणि सकारात्मक मूल्यांसह जीवन...
भारत देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2026-27 वेळापत्रक; दुलीप ट्रॉफी सुरू, रणजी दोन टप्प्यात
मराठी बातम्याखेळभारत देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2026 27 वेळापत्रक; दुलीप ट्रॉफी सुरू, रणजी दोन टप्प्यातमुंबई1 तासापूर्वीलिंक कॉपी कराभारतीय देशांतर्गत हंगाम 2026-27 ची सुरुवात 23...
‘हिटलर’ बॉस; सहानुभूतीत शून्य:संशोधनातून खुलासा – इतरांच्या कामाचे श्रेयही घेतात, नफ्याच्या नादात चुकीची निवड...
एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकाची उत्कृष्ट कामगिरी, शानदार संवादक, कंपनी बोर्डाचा आवडता. पण त्याच्या टीममध्ये सतत राजीनामे, भीतीचे वातावरण आणि अनैतिक निर्णयांच्या तक्रारी....
सोनाक्षी सिन्हा-झहीर इकबालने मेलोडी टॉफीवर व्हिडिओ बनवला:PM मोदींनी मेलोनींना भेट दिली टॉफी; सोशल मीडियावर...
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचे पती झहीर इक्बाल सोशल मीडियावर सुरू असलेल्या 'मेलोडी' ट्रेंडमध्ये सामील झाले आहेत. दोघांनी बुधवारी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर...
2031 पर्यंत चंद्र मोहिमेसाठी 8 तास टॉयलेट बॅकअप
न्यू यॉर्क6 दिवसांपूर्वीलिंक कॉपी करानासाच्या 2028 पर्यंत मानवांना पुन्हा चंद्रावर पाठवण्याच्या मोहिमेला धक्का बसू शकतो. अमेरिकन ऑडिट रिपोर्टनुसार, 'एक्झिओम स्पेस'चे नवीन स्पेस सूट...































