Homeमहाराष्ट्रआर्ट ऑफ लिविंगला 45 वर्षे पूर्ण:गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या 70 व्या...

आर्ट ऑफ लिविंगला 45 वर्षे पूर्ण:गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त 5 उपक्रमांचा शुभारंभ

बेंगळुरू येथील ‘द आर्ट ऑफ लिविंग इंटरनॅशनल सेंटर’ येथे संस्थेच्या ४५ वर्षांच्या मानवतावादी सेवेच्या पूर्ततेनिमित्त आणि गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते युवक विकास, उद्योजकता, शाश्वतता, चेतना अभ्यास आणि शिक्षण या क्षेत्रांशी संबंधित ५ राष्ट्रीय उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. द आर्ट ऑफ लिविंगच्या प्रवासाच्या स्मरणार्थ एका विशेष टपाल तिकिटाचे अनावरणही यावेळी करण्यात आले. या सोहळ्यात ‘युथ करिअर एक्सलन्स प्रोग्राम’, ‘फॅकल्टी ऑफ इस्टर्न नॉलेज सिस्टिम्स’, ‘आर्ट ऑफ लिविंग इनोव्हेशन अँड आंत्रप्रिन्युअरशिप इनक्युबेशन’, ‘सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन कॉन्शसनेस स्टडीज अँड ह्युमन पोटेंशियल’ आणि ‘इको शांती’ या पाच महत्त्वाकांक्षी उपक्रमांची घोषणा करण्यात आली. हे उपक्रम पर्यावरण, नाविन्यता आणि मानवी विकासावर संस्थेचा वाढता भर दर्शवतात. कार्यक्रमाला संबोधित करताना उपराष्ट्रपतींनी संस्थेच्या १८२ देशांमधील जागतिक कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “अंतर्गत शांतता हाच बाह्य समन्वयाचा पाया आहे, या विचाराने गुरुदेवांनी जगभरात शांतता आणि सौहार्दाचा संदेश पोहोचवला आहे.” कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनीही गुरुदेवांच्या शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी मानवी जीवनात ‘ज्ञान, ध्यान आणि संगीत’ या त्रिसूत्रीचे महत्त्व अधोरेखित करत ‘वसुधैव कुटुंबकम्’च्या निर्मितीचे आवाहन केले. आपल्या भेटीदरम्यान उपराष्ट्रपतींनी ‘श्री श्री गुरुकुलम’, ‘प्रताप गणपती मंदिर’, ‘श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग’ आणि सुमारे १,६०० देशी गायींचे निवासस्थान असलेल्या ‘श्री श्री गोशाळे’ला भेट देऊन पाहणी केली. महिनाभर चाललेल्या या उत्सवाची सांगता या सोहळ्याने झाली. या उत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगपती मुकेश अंबानी, अनंत अंबानी, निरंजन हिरानंदानी आणि चित्रपट सृष्टीतील जॅकी श्रॉफ, राजकुमार हिराणी यांसारख्या देश-विदेशातील ६७८ प्रतिष्ठित मान्यवरांनी हजेरी लावली होती. ‘इंट्युइशन प्रोग्राम’ अंतर्गत मुलांनी सादर केलेले अंतर्ज्ञान क्षमतेचे प्रात्यक्षिक या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दिल्लीत आंदोलनानंतर आपल्या घरी पोहोचले अभिजीत दीपके:म्हणाले- सरकारने ट्रेलर पाहिला कॉकरोच काय करू शकतात,...

0
कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी रविवारी सांगितले की, परीक्षांमधील गोंधळावरून त्यांचे आंदोलन तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री...

बंगाल सीमा पडताळणी | बांगलादेशात परतणारे स्थलांतरित

0
लेखक : अजय प्रकाश2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील हकीमपूर चेकपोस्टवर सध्या बेकायदेशीरपणे भारतात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची गर्दी जमा होत...

स्वामी अवधेशानंद जी गिरी यांचे जीवन सूत्र:अज्ञान, आळस, संकुचित विचार, कमकुवतपणा आणि नकारात्मक भावना...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; अज्ञान, आळस, संकुचित विचारसरणी, कमकुवतपणा आणि नकारात्मक भावना माणसाला आयुष्यात पुढे जाऊ...

वेस्ट इंडिज-श्रीलंका दुसरा वनडे पावसामुळे रद्द:टॉस झाल्यानंतर एकही चेंडू टाकता आला नाही, मालिका 1-1...

0
श्रीलंकेच्या वेस्ट इंडिज दौऱ्यातील दुसरा एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. किंग्स्टन येथील सबीना पार्क स्टेडियममध्ये शनिवारी रात्री टॉस झाल्यानंतर एकही चेंडू टाकता...
spot_img

वेस्ट इंडिज-श्रीलंका दुसरा वनडे पावसामुळे रद्द:टॉस झाल्यानंतर एकही चेंडू टाकता आला नाही, मालिका 1-1...

0
श्रीलंकेच्या वेस्ट इंडिज दौऱ्यातील दुसरा एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. किंग्स्टन येथील सबीना पार्क स्टेडियममध्ये शनिवारी रात्री टॉस झाल्यानंतर एकही चेंडू टाकता...

कर्णधार म्हणून गिलच्या दुसऱ्या सर्वात जलद हजार धावा:पंत 50 कसोटी सामने खेळणारा तिसरा भारतीय...

0
भारत-अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने 85 षटकांत 3 गडी गमावून 368 धावा केल्या. भारतीय कर्णधार शुभमन गिल आणि सलामीवीर केएल...

कंट्री काउंटर्स; जगातील सर्व देश फिरण्याचा ट्रेंड:गर्दीला कंटाळलेले लोक अस्पर्शित ठिकाणांकडे वळत आहेत, तज्ज्ञ...

0
प्रशांत महासागरातील छोटासा बेट असलेला देश ‘तुवालु’... हवाई आणि ऑस्ट्रेलियाच्या मध्ये वसलेला हा देश जगातील त्या मोजक्या ठिकाणांपैकी एक आहे, जिथे वर्षभरात एखादाच...

शिल्पा शिंदेवर कायदेशीर कारवाईची CM फडणवीसांकडे मागणी:निर्मात्यावर लैंगिक छळाचे खोटे आरोप केले; शिल्पाची पोस्ट-...

0
टेलिव्हिजन अभिनेत्री शिल्पा शिंदेच्या एका अलीकडील खुलाश्यावर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने तीव्र आक्षेप घेतला आहे. शिल्पाने कॉमेडियन भारती सिंग आणि...
error: Content is protected !!