Homeमहाराष्ट्रबच्चू कड्डूचा शिवसेनेत प्रवेश; शेतकरी आणि अपंगांसाठी लढण्याची शपथ

बच्चू कड्डूचा शिवसेनेत प्रवेश; शेतकरी आणि अपंगांसाठी लढण्याची शपथ

‘प्रहार’चे आक्रमक नेतृत्व आणि सामान्यांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे बच्चू कडू यांनी आज अधिकृतपणे आपल्या राजकीय प्रवासाचे नवे पान उलटले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बच्चू कडू यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. राष्ट्रसंत तुकडोजी

.

शिवसेना प्रवेशावेळी बोलताना बच्चू कडू यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे स्मरण केले. ते म्हणाले की, “तुकडोजी महाराजांनी आपली ‘ग्रामगीता’ शेतकऱ्यांना अर्पण केली होती. आज त्यांच्याच जयंतीदिनी आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसेनेसोबतचा प्रवास सुरू करत आहोत. माझी राजकीय सुरुवात शिवसेनेतूनच झाली होती आणि आता पुढील कार्यही याच पक्षात राहून अधिक प्रभावीपणे करेन.”

एकनाथ शिंदेंच्या कार्यपद्धतीवर मोहोर

केवळ आमदारकीच्या पदासाठी नाही, तर मुद्द्यांची लढाई अधिक मजबूत झाली पाहिजे. शिंदे साहेबांचा स्वभाव सेवाभावी आहे. ते मुख्यमंत्री असताना रात्री २ वाजता सुद्धा वर्षा बंगल्याची दारे उघडी होती. देशातील ऐतिहासिक निर्णय दिव्यांग मंत्रालय देण्याचे काम केले. कर्जमाफीत घेतलेला पुढाकार निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे. म्हणून केवळ पद नाही, तर विचार जुळणे महत्त्वाचे असते. विचारासोबत कर्तृत्व महत्त्वाचे असते. त्या दोन्ही गोष्टी आम्ही शिंदे साहेबांत पाहतो. ही लढाई फक्त पदापुरतीच मर्यादीत राहणार नाही, तर आम्ही जे मुद्दे दिलेत, दिव्यांग मंत्रालयाचे बळकटीकरण, पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामे असतील, हमीभावाची लढाई असेल. आमच्या विधवा भगिनी, कामगारांची लढाई आणि युवकांसाठी वेगळे धोरण, या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करून आपण हा निर्णय घेतलेला आहे.

‘प्रहार’ सामाजिक कार्यासाठी, राजकारण शिवसेनेचे

प्रहार ही एक सामाजिक संघटना म्हणून पावले टाकेल, पण राजकारण मात्र शिवसेनेचे मजबूत केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसैनिक उभा करू. छत्रपती शिवरायांनी जो विचार ठेवला होता, हे राज्य रयतेचे आहे. ते रयतेचे राज्य पुन्हा निर्माण व्हावे आणि त्या सर्वोच्च गादीवर आम्हाला पुन्हा शिंदे साहेब दिसावेत यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत. फक्त आमदारकीसाठी आम्ही निर्णय घेतलेला नाही. आमचे मुद्दे मोठ्या पक्षाच्या हाती जावे आणि हा अजेंडा आम्ही भगवा झेंडा राबवणार आहोत. जो अजेंडा प्रहारचा पांढरा झेंडा घेऊन राबवत आहोत, आता झेंडा बदलला असला, तरी अजेंडा कायम आहे. तोच अजेंडा घेऊन पुढे जाऊ, असे बच्चू कडू म्हणाले.

शिवसेनेत प्रवेश करताना शिंदेंपी बच्चू कडूंना दिला महत्वाचा शब्द

बच्चू कडू यांचे एकनाथ शिंदे यांनी पक्षात स्वागत केले. ते म्हणाले, ”बच्चू कडू यांच्यासारखा कडवट कार्यकर्ता, सर्वसामान्यांचा नेता, दिव्यांगासाठी झटणारा, शेतमजूर, गोरगरीब, दलित, शोषित पीडित यांच्यासाठी आंदोलन करणारा, गोरगरीबांचा आंदोलक नेता, दिव्यांगांसाठी खऱ्या अर्थाने लढणारा, झटणारा नेता म्हणून बच्चू भाऊ तुमची ओळख आहे. तुम्ही आज शिवसेनेत असंख्य लोकांसह प्रवेश केला. त्यासाठी तुमचं मनापासून शिवसेनेत स्वागत करतो.”

बच्चू कडू यांना शिवसेना नवीन नाही

एकनाथ शिंद म्हणाले, “शिवसेना तुम्हाला नवीन नाही. तुम्ही मूळचे शिवसैनिक आहात. 25 वर्ष प्रहार सामाजिक संघटनेचे काम केले. आज स्वगृही शिवसेनेत आलात. आपण आमदारकरीसाठी आलेला नाहीत हे स्पष्ट केले. तुमची धेय्य, धोरणे, गरीबांना न्याय देण्याचा मुद्दा याला कुठेतरी सत्तेचे बळ लागते. आपण पाहिले माझ्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात, त्यावेळी अनेक निर्णय घेतलेत. आपण सोबत राहिला. बच्चू कडू यांना शिवसेना नवीन नाही, शिवसेनेला बच्चू कडू नवीन नाहीत. बाळासाहेबांनी, दिघेसाहेबांनी अन्यायाविरोधात लढायला शिकवले. आपण दोघे त्याच विचारांचे आहोत. म्हणून विचारांची लढाई, विचाराने लढायची आहे.”

आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही

“एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मी एकदा कमिटमेंट केली की माझी कमिटमेंट कमिटमेंट असते. आज डायलॉग सांगत नाही. राजकारणात शब्द देणे आणि पाळणे महत्वाचे असते. म्हणूनच या राज्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चांदा ते बांदा शिवसेना पोहोचवण्याचे काम एकनाथ शिंदे याने केले. आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, याची ग्वाही देतो” असे एकनाथ शिंदे या प्रसंगी म्हणाले.

हे ही वाचा…

बच्चू कडू शिवसेनाचा धनुष्यबाण हाती घेणार:म्हणाले- ‘प्रहार’ कायम राहणार; रक्ताचा प्रत्येक थेंब जितका पक्षासाठी तितकाच दिव्यांग, शेतकऱ्यांसाठी धावणार

शेतकरी, मजूर, दिव्यांगांसाठी आम्ही शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार आहोत, अशी भूमिका बच्चू कडू यांनी आज सकाळीच माध्यमांशी बोलताना जाहीर केली होती. आमचे सगळे मुद्दे शिवसेनेने स्वीकारले आहेत. आमचे सगळे मुद्दे मान्य झाल्यानंतरच धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेत आहोत, असे बच्चू कडू यांनी म्हटले. सविस्तर वाचा…



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Gemini Financial Gain & Capricorn Promotion 2026

0
9 तासांपूर्वीकॉपी लिंकसोमवार, 2 नोव्हेंबर रोजी मिथुन राशीच्या नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नतीची शक्यता आहे आणि दीर्घकाळापासून रखडलेले पैसेही परत मिळू शकतात. मकर राशीच्या...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!