Homeमहाराष्ट्रकाँग्रेस नेतृत्वहीन; तो नात्यागोत्याचा पक्ष झाला: प्रेरणा देण्यासारखे काही शिल्लक नाही, अशोक...

काँग्रेस नेतृत्वहीन; तो नात्यागोत्याचा पक्ष झाला: प्रेरणा देण्यासारखे काही शिल्लक नाही, अशोक चव्हाणांचा घणाघात – Maharashtra News

महाराष्ट्र : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव पाटील यांची नातसून जयश्री पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्याच्या राजकारणात सध्या उलथापालथ सुरू असून, राजकीय नेत्यांच्या पक्षांतराच्या घडामोडी वाढत आहेत. कोण कधी कोणत्या पक्षात जाणार, कोण कोणासोबत युती करणार हे सांगता येत नाही. नाशिकमधील ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. तर सांगलीतील काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव पाटील यांची नातसून जयश्री पाटील यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत काँग्रेसमध्ये आता ना नेतृत्व उरलं आहे, ना दिशा, असा थेट हल्लाबोल केला आहे.

नेमके काय म्हणाले अशोक चव्हाण?

काँग्रेसची अवस्था ही नात्यागोत्याचा पक्ष असल्यासारखी झाली असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले. काँग्रेसकडे प्रेरणा देण्यासारखे काम नाही, रोड मॅप तयार करावा लागतो, अशी टीकाही चव्हाण यांनी केली. तसेच, काँग्रेस नेतृत्वहीन झाली आहे, हेच यामागचे प्रमुख कारण असल्याचेही ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले, काँगेसच्या काळात विकास झाला, मात्र त्यापेक्षा दुपटीने मागच्या अकरा वर्षात देशाचा विकास झाला. मी काँगेस मध्येच होतो. काँग्रेसच्या काळात विकास झाला नाही का? या प्रश्नाचा रोख माझ्याकडेच आहे, हे मला कळले, असा टोलाही अशोक चव्हाण यांनी लगावला. काँग्रेसच्या काळात ही विकास झाला, मात्र मागच्या अकरा वर्षात झालेला विकास हा अधिक गतीने झाला, असे अशोक चव्हाण म्हणाले. आज जमाना आयपीएलचा आहे. त्यामुळे कमी वेळेत लक्ष्य गाठणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकसित भारत 2047 पर्यंत करण्याचे धोरण ठेवल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

जयश्री पाटलांच्या भाजप प्रवेशाची तारीख ठरली

जयश्री पाटील या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री स्वर्गीय मदन पाटील यांच्या पत्नी आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी नाकारल्यानंतर जयश्री पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. यानंतर त्यांनी स्वतंत्र राजकीय प्रवास सुरू करत कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि आपले पुढील राजकीय निर्णय ठरवण्यास सुरुवात केली.

जयश्री पाटील यांना भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर मिळाल्या होत्या. अखेर त्यांनी भाजपचा पर्याय निवडला. यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतः त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीत भाजप प्रवेशाची तारीख निश्चित करण्यात आली असून, येत्या बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जयश्री पाटील भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करणार आहेत.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

महिलांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय:पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ, कर्ज परतफेडीचा भार होणार...

0
राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनवण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या 'पिंक ई-रिक्षा' योजनेबाबत राज्य मंत्रिमंडळाने एक अतिशय ऐतिहासिक आणि मोठा निर्णय घेतला आहे. महिला...

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...

चीनमध्ये भ्रष्टाचारावर मोठी कारवाई:माजी पोलिट ब्युरो सदस्य मा शिंगरुई पक्षातून निष्कासित

0
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेअंतर्गत आणखी एक मोठी कारवाई करत, पोलिट ब्युरोचे माजी सदस्य मा शिंगरुई यांना कम्युनिस्ट पक्षातून निष्कासित करण्यात...
spot_img

जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...

0
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...

0
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...

सोने ₹476 ने घसरून ₹1.42 लाखांवर:चांदी ₹849 ने वाढून ₹2.19 लाख प्रति किलोवर, या...

0
आज म्हणजेच 14 जुलै रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव...

न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 5 गडी राखून हरवले:जेडेन लेनोक्सचे 19 धावांत 5 बळी, 3 सामन्यांची...

0
न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 5 गडी राखून पराभव केला आहे. गयाना येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, जेडेन लेनोक्सच्या पाच विकेट्सच्या जोरावर...
error: Content is protected !!