Homeमहाराष्ट्रदिव्य मराठी विश्लेषण‎:विधानसभेतील पराभवानंतर तनपुरेंची जंगम मालमत्ता 1 कोटीने, कर्ज 22 लाखांनी...

दिव्य मराठी विश्लेषण‎:विधानसभेतील पराभवानंतर तनपुरेंची जंगम मालमत्ता 1 कोटीने, कर्ज 22 लाखांनी वाढले, ईडी न्यायालयाने दोषमुक्त केल्याने एकही गुन्हा दाखल नाही

दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीकडून (शरद पवार गट) कडून निवडणूक लढवणारे प्राजक्त तनपुरे आता भाजपकडून विधान परिषद लढवत आहेत. सन २०२४ च्या विधानसभेवेळी आणि आता विधान परिषदेसाठी त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रातून त्यांच्या वैयक्तिक वार्षिक उत्पन्नात घट दिसून

.

प्राजक्त तनपुरे यांच्या वैयक्तिक वार्षिक उत्पन्नात १० लाख ४० हजार १०० रुपयांची घट झाली. सन २०२४ मध्ये आयकर विवरण पत्रात त्यांचे वार्षिक उत्पन्न ४६ लाख ८ हजार २३० रुपये होते. आता हे उत्पन्न २०२६ मध्ये ३५ लाख ६८ हजार १३० रुपयांवर आले. दुसरीकडे त्यांच्या पत्नी सोनाली यांच्या उत्पन्नात मात्र १९ हजार ५९० रुपयांची वाढ नोंदवली असून ते २१ हजार ५४० रुपयांवरून ४१ हजार १३० रुपये झाले. उत्पन्न घटले तरी दोघांच्याही जंगम मालमत्तेत वाढ आहे. प्राजक्त तनपुरे यांची स्वतःची जंगम मालमत्ता १ कोटी ४ लाख २५ हजार ९४ रुपयांनी वाढून ती आता १ कोटी ३१ लाख ९२ हजार ७७४ रुपयांवरून थेट २ कोटी ३६ लाख १७ हजार ८६९ रुपयांवर पोहोचली आहे. तसेच, त्यांच्या पत्नीच्या जंगम मालमत्तेतही ९ लाख ८३ हजार ५१८ रुपये भर पडली असून ती १ कोटी ६३ लाख ५१ हजार ८०६ रुपयांवरून १ कोटी ७३ लाख ३५ हजार ३२५ रुपये इतकी झाली.

तनपुरे दाम्पत्याकडे ११.२५ कोटींच्या जागा प्राजक्त तनपुरे यांच्या नावावर राहुरी येथील ९ एकर २३ गुंठे शेतजमीन, वांबोरी येथील ३०६ चौरस मीटर बिगरशेती जमीन आणि पुण्याच्या लोहगाव येथील एकूण ३५०० चौरस फुटांचे दोन निवासी फ्लॅट्स आहेत. तसेच त्यांच्या पत्नीच्या नावावर धाराशीव येथील ६ एकर ५ गुंठे शेतजमीन आहे. बाजारमूल्य वाढल्याने स्थावर मालमत्तेत ६० लाख रुपयांची वाढ होऊन ती १० कोटी ८२ लाख ५ हजार रुपये झाली आहे. तर त्यांच्या पत्नीची स्थावर मालमत्ता ४३ लाख १८ हजार ५५० रुपये आहे.

दोघांकडेही प्रत्येकी १०० ग्रॅम सोने, ८ लाखांनी किंमत वाढली दोघांकडे प्रत्येकी १०० ग्रॅम सोने कायम आहे. बाजारभाव वधारल्यामुळे या सोन्याचे मूल्य प्रत्येकी ४ लाख रुपयांनी वाढून आता ८ लाख रुपयांवरून १२ लाख रुपये झाले आहे. याव्यतिरिक्त पत्नीच्या जडजवाहिर मूल्यात १ लाख ३० हजार रुपयांची वाढ होऊन ते १० लाख रुपये झाले आहे. प्राजक्त टेक्सटाईल, प्रसाद शुगर आणि गोवर्धन मिल्क या कंपन्यांमधील शेअर्स प्राजक्त तनपुरे यांच्याकडे आहेत.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शिल्पा शिंदेवर कायदेशीर कारवाईची CM फडणवीसांकडे मागणी:निर्मात्यावर लैंगिक छळाचे खोटे आरोप केले; शिल्पाची पोस्ट-...

0
टेलिव्हिजन अभिनेत्री शिल्पा शिंदेच्या एका अलीकडील खुलाश्यावर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने तीव्र आक्षेप घेतला आहे. शिल्पाने कॉमेडियन भारती सिंग आणि...

दिल्ली E85 फ्लेक्स इंधन लाँच

0
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी करा85% इथेनॉल मिश्रित E85 इंधन दिल्लीत अधिकृतपणे लॉन्च झाले आहे. विशेष म्हणजे, हे दिल्लीत विकल्या जाणाऱ्या E20 पेट्रोलपेक्षा ₹20...

यूएस पेंटागॉन स्पाय अलर्ट; इस्रायलवर ट्रम्प सरकारवर हेरगिरीचा आरोप

0
वॉशिंग्टन डीसी48 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराअमेरिका आणि इस्रायल यांच्यात इराणवरून मतभेद वाढत आहेत. यादरम्यान, अमेरिकेच्या संरक्षण विभागामध्ये (पेंटागॉन) ही चिंता वाढली आहे की, इस्रायल...

Google India ने Atrium Place Tower 1 गुरुग्राम मध्ये 617,000 sq ft भाड्याने दिले...

0
मराठी बातम्याव्यवसायगुगल इंडिया एट्रिअम प्लेस टॉवर 1 गुरुग्राममध्ये 617,000 चौरस फूट भाडेपट्टीवर, 5 वर्षांमध्ये ₹671 कोटी भरण्यासाठीनवी दिल्ली1 तासापूर्वीलिंक कॉपी करागूगल इंडियाने गुरुग्राममधील...
spot_img

शिल्पा शिंदेवर कायदेशीर कारवाईची CM फडणवीसांकडे मागणी:निर्मात्यावर लैंगिक छळाचे खोटे आरोप केले; शिल्पाची पोस्ट-...

0
टेलिव्हिजन अभिनेत्री शिल्पा शिंदेच्या एका अलीकडील खुलाश्यावर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने तीव्र आक्षेप घेतला आहे. शिल्पाने कॉमेडियन भारती सिंग आणि...

दिल्ली E85 फ्लेक्स इंधन लाँच

0
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी करा85% इथेनॉल मिश्रित E85 इंधन दिल्लीत अधिकृतपणे लॉन्च झाले आहे. विशेष म्हणजे, हे दिल्लीत विकल्या जाणाऱ्या E20 पेट्रोलपेक्षा ₹20...

Google India ने Atrium Place Tower 1 गुरुग्राम मध्ये 617,000 sq ft भाड्याने दिले...

0
मराठी बातम्याव्यवसायगुगल इंडिया एट्रिअम प्लेस टॉवर 1 गुरुग्राममध्ये 617,000 चौरस फूट भाडेपट्टीवर, 5 वर्षांमध्ये ₹671 कोटी भरण्यासाठीनवी दिल्ली1 तासापूर्वीलिंक कॉपी करागूगल इंडियाने गुरुग्राममधील...

लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवशी 17 विकेट पडल्या:इंग्लंडने न्यूझीलंडला 254 धावांचे लक्ष्य दिले; 36 धावांवर...

0
लॉर्ड्समध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जात असलेला कसोटी सामना गोलंदाजांच्या नावावर राहिला. पहिल्या दिवशी 16 विकेट पडल्यानंतर दुसऱ्या दिवशीही फलंदाज संघर्ष करताना...
error: Content is protected !!