Homeमनोरंजनशॉयब अख्तर यांच्यासह भारताने त्यांच्या वाहिन्यांची बंदी मारहाण केल्यावर पाकिस्तान क्रिकेटर्स आणि...

शॉयब अख्तर यांच्यासह भारताने त्यांच्या वाहिन्यांची बंदी मारहाण केल्यावर पाकिस्तान क्रिकेटर्स आणि यूट्यूबर्सला आर्थिक दुखापत झाली आहे.


शोएब अख्तरवर भारत सरकारच्या निर्णयाचा परिणामः भारत सरकारने पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानाविरोधात काही कठोर निर्णय घेतले आहेत. पाणीबंदीपासून ते युट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्यापर्यंतचे अनेक निर्णय भारत सरकारने घेतले आहेत. एकीकडे या निर्णयाचा सर्वसामान्य पाकिस्तानी लोकांना फटका बसत असतानाच भारताच्या कठोर भूमिकेचा फटका पाकिस्तानमधील अनेक माजी क्रिकेटपटूंबरोबरच युट्यूबर्सलाही बसला आहे. पाकिस्तानमधून चालणाऱ्या अनेक युट्यूब चॅनेल्सवर भारतात बंदी घातल्यानंतर याचा मोठा आर्थिक फटका या युट्यूबर्सबरोबरच पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनाही बसतोय. याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कमाईला बसला मोठा फटका

भारताने बंदीची कारवाई केलेल्या युट्यूब चॅनेल्समध्ये माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरबरोबरच प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर वासे हबीबचाही समावेश आहे. या दोन्ही खात्यांवरुन खोचक पद्धतीने क्रिकेटसंदर्भातील विश्लेषण केलं जातं. या दोन्ही चॅनेल्सचा मोठा चाहता वर्ग क्रिकेटवेड्या भारतात आहे. मात्र अचानक भारत सरकारने या चॅनेल्सवर भारतात बंदी घातल्याने युट्यूबच्या माध्यमातून होणाऱ्या मोठ्या कमाईला या कंटेट क्रिएटर्सला मुकावं लागत आहे. दोन्ही देशांमधील ताणाव वाढल्याची झळ शोएब अख्तरबरोबरच अनेक पाकिस्तानी कंटेट क्रिएटर्सला बसत आहे.

स्वत: शोएब अख्तरने व्यक्त केली चिंता

“आमच्या चॅनेलला मिळणाऱ्या व्हूअरशीपपैकी मोठा वाटा हा भारतीयांचा आहे. भारतातून आम्हाला फार मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळतात. पाकिस्तानातून चालणारी युट्यूब चॅनेल्स मोठ्या प्रमाणात भारतीय प्रेक्षकांवर अवलंबून असतात हे नाकारता येणार नाही. या बंदीचा अनेक युट्यूबर्सला मोठा फटका बसणार आहे. हा फटका आर्थिक आणि व्ह्यूजच्या हिशोबानेही बसणार आहे,” असं शोएब अख्तरने आयएएनएस या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना नमूद केलं.

शोएबचं अकाऊंट प्रचंड लोकप्रिय झालं

पाकिस्तानमधील अनेक माजी क्रिकेटपटूंनी कॉमेंट्री आणि वृत्तवाहिन्यांवर तज्ञ म्हणून सहभागी होत प्रचंड लोकप्रियता मिळवली. मात्र शोएब अख्तरने युट्यूबवरुनही बरीच लोकप्रियता मिळवली. युट्यूबवरुन अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या नावाजलेल्या नावांमध्ये शोएब अख्तरचा समावेश होतो. 2019 च्या वर्ल्ड कपदरम्यान शोएबचं युट्यूब चॅनेल प्रचंड लोकप्रिय झालं. शोएब अख्तरने अनेकदा भारतीय संघाच्या कामगिरीचं विश्लेषण करुन भारतीय चाहत्यांची मनं जिंकत व्ह्यूज मिळवले. अनेकदा शोएब अख्तरने भारतातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटू असलेल्या विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या खेळाडूंचं उघडपणे कौतुक केल्याचं या व्हिडीओंमधून पाहायला मिळालं. शोएब पाठोपाठ रमीज राजा आणि इंझमाम-उल-हक यांनीही सोशल मीडियाचा कल पाहून भारताचं कौतुक करत या वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचा प्रयत्न केला.

जाहिरातीही मिळत नाहीत

“जे क्रिएटर्स युट्यूबवरील मॉनेटायझेशनवर अवलंबून आहेत त्यांच्यासाठी भारतीय व्ह्यूअरशीपला फटका बसणे म्हणजे जाहिरातींच्या माध्यमातून मिळणाऱ्या कमाईला ब्रेक लागण्यासारखं आहे,” असं लाहोरमधील एका मिडिया स्ट्रॅटर्जिस्टने ‘आयएएनएस’शी संवाद साधताना म्हटलं.

बंदी घातलेल्या 16 युट्यूब चॅनेल्समध्ये यांचाही समावेश

भारताने प्रसिद्ध पाकिस्तानी कंटेट क्रिएटर्सबरोबरच पाकिस्तानमधील वृत्त वाहिन्यांची युट्यूब चॅनेल्सही बंद केली आहेत. यामध्ये जीओ न्यूज, समा न्यूज यासारख्या वृत्तवाहिन्यांचा समावेश आहे. या वहिन्या खोटी माहिती पसरवत असल्याने राष्ट्र हित्याच्या दृष्टीने आणि खोट्या माहितीचा प्रसार थांबवण्यासाठी त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. भारताने पाकिस्तानमधील एकूण 16 युट्यूब चॅनेल्सवर बंदी घातली आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

TMC चे 3 माजी राज्यसभा खासदार भाजपत सामील:सुष्मिता, सुखेंदू व प्रकाश चिक यांनी विधानसभा...

0
तृणमूल काँग्रेस (TMC) चे तीन माजी राज्यसभा खासदार सुष्मिता देव, सुखेंदू शेखर राय आणि प्रकाश चिक बराइक गुरुवारी भाजपामध्ये सामील झाले. प्रदेशाध्यक्ष सामिक...

मोशी कचरा डेपो अपघात | आयुक्त सूर्यवंशी यांनी अडकलेल्या नातेवाईकांना दिले आश्वासन

0
मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या बचावकार्यादरम्यान महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज घटनास्थळी इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांची भेट घेऊन...

पतियाळामध्ये संपूर्ण कुटुंबाने विष प्राशन केले:बँक मॅनेजर वडील आणि मुलीचा मृत्यू; आई-मुलगा गंभीर अवस्थेत...

0
पंजाबच्या पतियाळा येथे एकाच कुटुंबातील चार सदस्यांनी विषारी पदार्थ खाल्ला. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली, ज्यामुळे सर्वांना राजिंद्रा रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे उपचारादरम्यान...

9 जुलैचे राशिभविष्य:मिथुन, कर्क राशीच्या लोकांना नोकरीशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते, कुंभ राशीच्या...

0
गुरुवार, 9 जुलै रोजी मिथुन राशीच्या लोकांना नोकरीशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते आणि व्यवसायात नवीन प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. कर्क राशीच्या सरकारी...
spot_img

भारत U19 विरुद्ध श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी

0
मराठी बातम्याखेळक्रिकेटभारत U19 Vs श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी | व्हीके विनीत सेंच्युरी, चमिका हीनातीगालाहंबनटोटा2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराश्रीलंका अंडर-19...

पावसात खराब होते लाकडी फर्निचर:आर्द्रतेच्या 12 चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ञांकडून जाणून घ्या ओलसरपणापासून...

0
जर पावसाळा सुरू होताच लाकडी कपाट व्यवस्थित बंद होत नसेल, कपाटाचे ड्रॉवर अडकत असतील किंवा सोफ्यातून ओलसर वास येत असेल, तर याला सामान्य...

अभिनेता राजेश शर्मा आजारी, तेलंगणा मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी:अभिनेता गंभीर अवस्थेत दाखल; कामगार संघटनेने विचारले-...

0
ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने प्रभास अभिनीत 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर अभिनेता राजेश शर्मा यांच्यासोबत घडलेल्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे....

6000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा, ₹29,999 किंमत

0
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटेक कंपनी नथिंगने भारतात आपली नवीन 'b' सीरीजचा पहिला पारदर्शक स्मार्टफोन नथिंग फोन (4b) लॉन्च केला आहे. हा फोन...
error: Content is protected !!