Homeमहाराष्ट्रSanjay Raut Criticizes Prime Minister Narendra Modi And The Central Government Over...

Sanjay Raut Criticizes Prime Minister Narendra Modi And The Central Government Over The Mock War Drill | युद्ध सरावात आणखी एक दिवस का घालवता?: एकदा काय ते होऊन जाऊ द्या, किती दिवस टांगती तलवार ठेवणार? संजय राऊत यांचा सवाल – Mumbai News

एखाद्या देशावर हल्ला झाल्यानंतर 24 तासांच्या आत बदला घेतला जातो. आता आमचा युद्ध सराव घेतला जातोय. म्हणजे आमच्या हातात बंदूक देणार का? असा प्रश्न उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. ज्या पद्धतीने थाळ्या वाजवल्या आणि टाळ्या वाजवल

?

भारत पाकिस्तानमधील युद्धाचा आर्थिक दृष्ट्या भारताला भविष्यात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. देश आणि जनता भारताच्या सुरक्षेसाठी आणि अभिमानासाठी कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार आहे. तुम्ही आहात म्हणून नाही, एका पक्षासाठी नाही, तर या देशासाठी आपण कायमच एक असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मॉकड्रील घ्यायचे असेल तर घेत राहा, मात्र तुम्ही काय करत आहात? हे दाखवा, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.

दोन दिवसीय संसदेचे अधिवेशन मागणी

काश्मीरच्या प्रश्नावर सध्याच्या परिस्थितीत दोन दिवसीय संसदेचे अधिवेशन घेण्याची आमची मागणी आहे. काश्मीरच्या प्रश्नावर सध्याच्या परिस्थितीत दोन दिवसीय संसदेच्या अधिवेशन तुम्ही घ्यायला हवे आणि सर्वांशी मनमोकळी चर्चा करायला पाहिजे. सर्वपक्षीय बैठकीत होते तसे नाही. आम्हाला उणे दुणे काढायचे नाही. आम्ही एखाद्या पक्षासोबत नाही. मात्र आम्ही सरकार आणि देशासोबत आहोत. हा देश आमचा देखील असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी

या सर्व गोष्टीचा विचार करून एकदा काय ते होऊन जाऊ द्या, किती दिवस टांगती तलवार कायम ठेवणार? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पुढील काळात जी परिस्थिती निर्माण होईल, त्यासाठी आतापासून या देशातील सर्व पक्षांना विश्वासात घेऊन काम करायला हवे, असा सल्ला देखील राऊत यांनी दिला. युद्ध करणे सोपे असते मात्र युद्धा नंतरची परिस्थिती निर्माण होते, तिचा सामना करणे अवघड असते, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. मात्र हे सर्व करण्यापूर्वी देशाचे गृहमंत्री अपयशी गृहमंत्री आहेत. त्यांना पुढची परिस्थिती देखील सांभाळता येणार नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा द्यायला पाहिजे, अशी मागणी पुन्हा एकदा संजय राऊत यांनी केली आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

TMC चे 3 माजी राज्यसभा खासदार भाजपत सामील:सुष्मिता, सुखेंदू व प्रकाश चिक यांनी विधानसभा...

0
तृणमूल काँग्रेस (TMC) चे तीन माजी राज्यसभा खासदार सुष्मिता देव, सुखेंदू शेखर राय आणि प्रकाश चिक बराइक गुरुवारी भाजपामध्ये सामील झाले. प्रदेशाध्यक्ष सामिक...

मोशी कचरा डेपो अपघात | आयुक्त सूर्यवंशी यांनी अडकलेल्या नातेवाईकांना दिले आश्वासन

0
मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या बचावकार्यादरम्यान महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज घटनास्थळी इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांची भेट घेऊन...

पतियाळामध्ये संपूर्ण कुटुंबाने विष प्राशन केले:बँक मॅनेजर वडील आणि मुलीचा मृत्यू; आई-मुलगा गंभीर अवस्थेत...

0
पंजाबच्या पतियाळा येथे एकाच कुटुंबातील चार सदस्यांनी विषारी पदार्थ खाल्ला. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली, ज्यामुळे सर्वांना राजिंद्रा रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे उपचारादरम्यान...

9 जुलैचे राशिभविष्य:मिथुन, कर्क राशीच्या लोकांना नोकरीशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते, कुंभ राशीच्या...

0
गुरुवार, 9 जुलै रोजी मिथुन राशीच्या लोकांना नोकरीशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते आणि व्यवसायात नवीन प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. कर्क राशीच्या सरकारी...
spot_img

भारत U19 विरुद्ध श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी

0
मराठी बातम्याखेळक्रिकेटभारत U19 Vs श्रीलंका U19 3रा ODI अपडेट; SL 1 विकेटने विजयी | व्हीके विनीत सेंच्युरी, चमिका हीनातीगालाहंबनटोटा2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराश्रीलंका अंडर-19...

पावसात खराब होते लाकडी फर्निचर:आर्द्रतेच्या 12 चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ञांकडून जाणून घ्या ओलसरपणापासून...

0
जर पावसाळा सुरू होताच लाकडी कपाट व्यवस्थित बंद होत नसेल, कपाटाचे ड्रॉवर अडकत असतील किंवा सोफ्यातून ओलसर वास येत असेल, तर याला सामान्य...

अभिनेता राजेश शर्मा आजारी, तेलंगणा मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी:अभिनेता गंभीर अवस्थेत दाखल; कामगार संघटनेने विचारले-...

0
ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने प्रभास अभिनीत 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर अभिनेता राजेश शर्मा यांच्यासोबत घडलेल्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे....

6000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा, ₹29,999 किंमत

0
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटेक कंपनी नथिंगने भारतात आपली नवीन 'b' सीरीजचा पहिला पारदर्शक स्मार्टफोन नथिंग फोन (4b) लॉन्च केला आहे. हा फोन...
error: Content is protected !!