Homeपुणे / पिंपरी-चिंचवडआमदारकीचे कवच गेल्याने तालुक्यावर अन्याय – बाळासाहेब थोरात,संगमनेरच्या हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष

आमदारकीचे कवच गेल्याने तालुक्यावर अन्याय – बाळासाहेब थोरात,संगमनेरच्या हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष

संगमनेर:आपला तालुका, विविध सहकारी संस्था यांना आमदारकीचे संरक्षणाचे कवच होते. जातीधर्माच्या नावाखाली खोट्या भुलथापांमुळे हे कवच जनतेने घालवले. तालुक्याचे हक्काचे पाणी मिळवण्याबरोबर तालुका जपण्यासाठी संघटित होऊन संघर्ष करावा लागणार असल्याचे प्रतिपादन माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर खुर्द येथे थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी ॲड. माधवराव कानवडे, बाबासाहेब ओहोळ, रणजितसिंह देशमुख, संपतराव डोंगरे, पांडुरंग घुले, अर्चना बालोडे, रामनाथ कुटे, विनोद हासे, विजय राहणे, विलास शिंदे, अंकुश ताजणे, सरपंच गणेश शिंदे आदी उपस्थित होते.

थोरात म्हणाले,धर्माच्या नावावर विधानसभा निवडणुकीत जनतेला फसवले गेले.निवडणुकीनंतर तालुक्याची बसवलेली घडी थोडी विस्कटली.आता पाण्यासाठी पुन्हा संघर्ष करण्याची वेळ आली आहे.आमदारकी हे सर्व तालुका व सहकारी संस्थांना मोठे कवच होते.मात्र जनतेने ते कवच गमावले आहे.त्याचा लगेच त्रास सुरू झाला आहे. शहराजवळील गावांना आश्वीच्या अतिरिक्त तहसील कार्यालयाला जोडण्याचा डाव आहे.शहरामध्ये अशांतता निर्माण झाली आहे.अशी परिस्थिती यापूर्वी कधीही नव्हती. आपले सुसंस्कृत राजकारण व संस्कृती टिकवण्यासाठी मतभेद विसरून संघटित होऊन संघर्ष करावा लागणार आहे.

हेही वाचा

स्पर्धेतही भारतीय वस्त्रोद्योगाचा जागतिक बाजारपेठेत प्रभाव; वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्याकडून गौरव

कारखान्याने कायम सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या शिस्तीवर काम केले असून आगामी काळात प्रति एकर १०० टन ऊस उत्पादन करावे लागेल, तरच राज्यात एक नंबर भाव देणे शक्य होणार आहे. विधानसभेत चूक झाली असेल, परंतु आता सहकारी संस्थांबाबत होणार नाही. झालेल्या चुका दुरुस्त करून सर्वांनी एकजुटीने तालुक्याच्या विकासासाठी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले. ॲड. कानवडे, बाबासाहेब ओहोळ यांचीही यावेळी भाषणे झाली. प्रास्ताविक सुभाष गुंजाळ यांनी केले. रवी नेहे यांनी आभार मानले.

पाईप कोणाच्या सांगण्यावरून फोडले?

संगमनेर तालुक्याला हक्काचे पाणी मिळाले पाहिजे. कालव्यांच्या वरील भागातील शेतकऱ्यांनाही त्यांचे पाणी देण्यासाठी तातडीने काम झाले पाहिजे. आम्ही हक्काचे पाणी मागत आहोत. ते मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी पाईप टाकले. हे पाईप अधिकाऱ्यांनी कुणाच्या सांगण्यावरून फोडले असा प्रश्न करताना, मंत्री महोदय असा चुकीचा आदेश देतील असे मला वाटत नाही. मग हे पाईप फोडण्याचे धारिष्ट कुणी केले? प्रवरा नदीकाठच्या शेतकऱ्यांना १८ तास वीज मिळाली पाहिजे. मात्र आवर्तन चालू असताना पाच ताससुद्धा वीज मिळत नाही. आमदारकीचे कवच नसल्याने हा त्रास सहन करावा लागत अ

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

व्यायामानंतरही वजन कमी होत नाही:कॅलरी ट्रॅक करणे पुरेसे नाही, हार्मोन टेस्ट करा, तज्ञांकडून वजन...

0
वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांची सर्वात मोठी तक्रार हीच असते- "मी रोज चालतो, जिममध्ये जातो, डाएटही कंट्रोल करतो, तरीही वजन कमी होत...

लग्नासाठी गोव्यात पोहोचले साऊथ आणि बॉलिवूड स्टार्स:अनिल कपूर-जॅकी श्रॉफ, चिरंजीवी आणि नागार्जुन पारंपरिक लूकमध्ये...

0
अभिनेत्री आणि राजकारणी खुशबू सुंदर आणि चित्रपट निर्माता सुंदर सी यांची मोठी मुलगी अवंतिका सुंदर विवाहबंधनात अडकली आहे. तिने 25 जून रोजी गोव्यातील...

50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 22 भाषा सपोर्ट

0
नवी दिल्ली4 तासांपूर्वीलिंक कॉपी करासॅमसंगने आपला गॅलेक्सी A-सिरीजचा नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी A27 5G जागतिक बाजारात लॉन्च केला आहे. हा नवीन हँडसेट जुन्या गॅलेक्सी...

युरोपियन युनियनच्या बैठकीत प्रथमच बालकाचा समावेश:स्वीडनच्या मंत्री आपल्या 3 महिन्यांच्या मुलासोबत पोहोचल्या

0
युरोपियन युनियन (EU) च्या हवामान मंत्र्यांच्या बैठकीत गुरुवारी स्वीडनच्या हवामान मंत्री रोमिना पूरमोख्तारी त्यांच्या 3 महिन्यांच्या मुलगा ॲडमसोबत पोहोचल्या. EU परिषदेच्या अधिकाऱ्यांनुसार, मंत्रीस्तरीय...
spot_img

व्यायामानंतरही वजन कमी होत नाही:कॅलरी ट्रॅक करणे पुरेसे नाही, हार्मोन टेस्ट करा, तज्ञांकडून वजन...

0
वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांची सर्वात मोठी तक्रार हीच असते- "मी रोज चालतो, जिममध्ये जातो, डाएटही कंट्रोल करतो, तरीही वजन कमी होत...

लग्नासाठी गोव्यात पोहोचले साऊथ आणि बॉलिवूड स्टार्स:अनिल कपूर-जॅकी श्रॉफ, चिरंजीवी आणि नागार्जुन पारंपरिक लूकमध्ये...

0
अभिनेत्री आणि राजकारणी खुशबू सुंदर आणि चित्रपट निर्माता सुंदर सी यांची मोठी मुलगी अवंतिका सुंदर विवाहबंधनात अडकली आहे. तिने 25 जून रोजी गोव्यातील...

50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 22 भाषा सपोर्ट

0
नवी दिल्ली4 तासांपूर्वीलिंक कॉपी करासॅमसंगने आपला गॅलेक्सी A-सिरीजचा नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी A27 5G जागतिक बाजारात लॉन्च केला आहे. हा नवीन हँडसेट जुन्या गॅलेक्सी...

सौदी अरेबियामध्ये भारतीयही स्वतःचे घर खरेदी करू शकतील:तेल अर्थव्यवस्थेवरील अवलंबित्व कमी करण्याचा मोठा निर्णय;...

0
सौदी अरेबियाने आपला रिअल इस्टेट क्षेत्र परदेशी लोकांसाठी खुला केला आहे. ‘सौदी प्रॉपर्टीज’ नावाच्या नवीन डिजिटल पोर्टलद्वारे आता परदेशी नागरिक, कंपन्या आणि गुंतवणूकदार...
error: Content is protected !!