Homeपुणे / पिंपरी-चिंचवडमेळघाटात वाघ बघायला जाताय? मग आधी ‘हे’ वाचा, कारण…

मेळघाटात वाघ बघायला जाताय? मग आधी ‘हे’ वाचा, कारण…


अकोला: मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणारी शहानूर येथील जंगल व नरनाळा किल्ला सफारी १ मेपासून बंद झाली आहे. नरनाळा वन पर्यटन संघटनेच्या जिप्सी चालकांनी भाडेवाढ करण्याच्या मागणीसाठी बंद पुकारला. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून सफारी बंद असून पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. स्थानिकांचा रोजगार देखील बुडाला आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत अकोट वन्यजीव विभागामध्ये नरनाळा किल्ला व शहानूर येथील जंगलाचा समावेश आहे. नरनाळा किल्ल्याच्या पायथ्याशी शहानूर येथे वन पर्यटन केंद्र असून त्या ठिकाणावरून नरनाळा किल्ला व शहानूर जंगलासाठी सफारी केली जाते. यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात येते. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून ही सफारी बंद आहे. विविध मागण्यांसाठी नरनाळा वन पर्यटन संघटनेने संप पुकारला.

पेट्रोलचे वाढलेले दर लक्षात घेता व पर्यटन मार्गात नव्याने वाढ झाल्यामुळे शहानूर सफारीचे केवळ जिप्सी प्रवास भाडे अडीच हजारावरून चार हजार व नरनाळा किल्ला सफारीचे दीड हजारावरून अडीच हजार करण्याची मागणी संघटनेने केली. करोना काळामुळे बंद केलेली रात्रीची सफारी व पूर्ण दिवसाची सफारी सुरू करण्यात यावी, नरनाळा परिक्षेत्रातील बफर क्षेत्रात मचाण सुरू करावे, शहानूर सफारी द्वारावरील गाईड व जिप्सी चालक यांना गणवेश व ओळखपत्र द्यावे, शहानूर सफारी मार्गावरील खासगी सर्व वाहने बंद करण्यात यावी, शहानूर सफारी द्वार ते नरनाळा किल्ला दरम्यान रस्त्याचे डांबरीकरण होत असल्यामुळे पावसाळ्यात नरनाळा किल्ला सफारी सुरु ठेवावी, जिप्सी गाईड व जिप्सी चालक यांना प्रशिक्षण देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन संघटनेच्यावतीने अकोट वन्यजीव विभागात ११ एप्रिलला देण्यात आले होते.

हेही वाचा

उत्तर व दक्षिण भारताला जोडणारी नवीन रेल्वे गाडी धावणार, उन्हाळ्यातील गर्दीत आता…

या मागण्यांची दखल न घेतल्यास १ मेपासून सफारी बंद करण्याचा इशारा संघटनेने दिला होता. मागण्यांची दखल शासकीय पातळीवर घेण्यात आली नाही. त्यामुळे संघटनेने आक्रमक पवित्रा घेऊन १ मेपासून शहानूर येथील सफारीसाठी बंद पुकारला. ऐन हंगामाच्या काळात पर्यटक व वन्यजीव प्रेमींची निराशा होत आहे. शिवाय स्थानिकांचा रोजगार देखील प्रभावित झाला.

२६ जिप्सींचा चक्काजाम

शहानुर येथील द्वारावरून जंगल सफारी व किल्ला सफारीसाठी २६ जिप्सी उपलब्ध आहेत. पेट्रोलचे भाव वाढण्यासोबतच गाडीची दैनंदिन देखभाल व दुरुस्ती करणे खर्चिक झाले. त्यामुळे या दरात सफारी पुरत नाही. भाडेवाढ करण्यासह विविध मागण्यांसाठी १ मेपासून बंद पुकारला. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली, मात्र कुठलाही तोडगा निघू शकला नाही, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष हरिश्चंद्र राठोड व सचिव चंद्रशेखर गायकवाड यांनी दिली.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!