Homeमहाराष्ट्रAjit Pawar Reiterates His Desire for the Chief Minister's post | अजित...

Ajit Pawar Reiterates His Desire for the Chief Minister’s post | अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा पुन्हा बोलून दाखवली: म्हणाले – गेल्या अनेक वर्षांपासून मलाही मुख्यमंत्री व्हावे वाटते, पण कुठे जमतंय? – Maharashtra News

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. अनेक वर्षांपासून त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी ही भावना वेळोवेळी सूचित केली आहे. उपमुख्यमंत्रिपदावर त्यांनी तब्बल सहावेवेळा विराजमान होत ऐक्याचा विक्रम केला असला

?

मुंबईतील एका कार्यक्रमात अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदावर भाष्य करताना आपल्या मनातील भावना उघडपणे व्यक्त केल्या. पत्रकार राही भिडे यांनी राज्याला महिला मुख्यमंत्री मिळाल्या पाहिजे, अशी आशा व्यक्त केली होती. राही भिडे यांच्या विधानाचा धागा पकडून अजित पवारांनी मुख्यमंत्रिपदावर भाष्य केले. राही भिडे म्हणाल्या की भविष्यात या महाराष्ट्रात एखादी महिला मुख्यमंत्री झाली पाहिजे. आपल्याला सगळ्यांनाच तसं वाटत असतं. पण शेवटी तो योग जुळून यावा लागतो. कारण मलाही गेल्या अनेक वर्षांपासून वाटतं की मी मुख्यमंत्री व्हावं. पण कुठे जमतंय? असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

राज्याला महिला मुख्यमंत्री मिळण्याचा योग येईल

अजित पवारांनी पुढे बोलताना राज्याला महिला मुख्यमंत्री मिळेल असा विश्वास व्यक्त केला. राज्याला महिला मुख्यमंत्री मिळण्याचा योग कधीतरी जुळून येईल. पश्चिम बंगालमध्ये ज्याप्रमाणे ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री झाल्या. हा फुले, शाहू आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, त्यामुळे तो योगही राज्यात येईल, असे अजित पवार म्हणाले.

अजित पवार एकूण सहा वेळा उपमुख्यमंत्री

अजित पवार यांनी आतापर्यंत पाचवेळा उपमुख्यमंत्री पद भूषवले आहे. सध्या त्यांची सहावी टर्म आहे. अजित पवार 2010 मध्ये काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर 2012 साली काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये त्यांना पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली. नोव्हेंबर 2019 मध्ये अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. यावेळी ते फक्त 80 तास उपमुख्यमंत्री राहिले होते. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाले. अडीच वर्षे ते या पदावर होते. 2022 सालीच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड केले आणि भाजपासोबत सत्तेत सामील झाले. यावेळी पाचव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची माळ अजित पवारांच्या गळ्यात पडली. आता महायुती सरकारमध्ये ते सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पावसात खराब होते लाकडी फर्निचर:आर्द्रतेच्या 12 चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ञांकडून जाणून घ्या ओलसरपणापासून...

0
जर पावसाळा सुरू होताच लाकडी कपाट व्यवस्थित बंद होत नसेल, कपाटाचे ड्रॉवर अडकत असतील किंवा सोफ्यातून ओलसर वास येत असेल, तर याला सामान्य...

पुणे खान कुटुंबाने आषाढी वारी सेवा सुरू ठेवली आहे, सर्व-विश्वास एकोपा कायम ठेवला आहे

0
आषाढी वारीनिमित्त पुण्यात दाखल होणाऱ्या वारकरी बांधवांच्या सेवेसाठी अनेक व्यक्ती आणि संस्था पुढे येत आहेत. यामध्ये येरवडा येथील गोल्फ चौकात पुणे गोल्फ क्लबचे...

अभिनेता राजेश शर्मा आजारी, तेलंगणा मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी:अभिनेता गंभीर अवस्थेत दाखल; कामगार संघटनेने विचारले-...

0
ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने प्रभास अभिनीत 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर अभिनेता राजेश शर्मा यांच्यासोबत घडलेल्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे....

6000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा, ₹29,999 किंमत

0
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटेक कंपनी नथिंगने भारतात आपली नवीन 'b' सीरीजचा पहिला पारदर्शक स्मार्टफोन नथिंग फोन (4b) लॉन्च केला आहे. हा फोन...
spot_img

पावसात खराब होते लाकडी फर्निचर:आर्द्रतेच्या 12 चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ञांकडून जाणून घ्या ओलसरपणापासून...

0
जर पावसाळा सुरू होताच लाकडी कपाट व्यवस्थित बंद होत नसेल, कपाटाचे ड्रॉवर अडकत असतील किंवा सोफ्यातून ओलसर वास येत असेल, तर याला सामान्य...

अभिनेता राजेश शर्मा आजारी, तेलंगणा मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी:अभिनेता गंभीर अवस्थेत दाखल; कामगार संघटनेने विचारले-...

0
ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने प्रभास अभिनीत 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर अभिनेता राजेश शर्मा यांच्यासोबत घडलेल्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे....

6000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा, ₹29,999 किंमत

0
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटेक कंपनी नथिंगने भारतात आपली नवीन 'b' सीरीजचा पहिला पारदर्शक स्मार्टफोन नथिंग फोन (4b) लॉन्च केला आहे. हा फोन...

अमेरिकन व्यावसायिक पायलट म्हणाले- डिजिटल जगात घाई करू नका:फक्त टेक्स्ट मेसेजमुळे ओळख हिरावली; डोळ्यासमोर...

0
जर तुमच्या मुलांचे फोटो, बँक खात्यांचे पासवर्ड आणि तुमची डिजिटल ओळख एकाच 'की'ने सुरक्षित असतील आणि ती एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागली, तर...
error: Content is protected !!