Homeमनोरंजनऑटो न्यूज ह्युंदाई आय 10 ने 33 लाख मारुती वॅगनरला 6 लाख...

ऑटो न्यूज ह्युंदाई आय 10 ने 33 लाख मारुती वॅगनरला 6 लाख कारच्या किंमतीत मारहाण केली


ऑटो न्यूज: सर्वासामान्य व्यक्ती कार खरेदी करण्यासाठीचा निर्णय घेताना काही गोष्टी कायमच विचारात घेतल्या जातात. कारचं मायलेज, कारची किंमत इथपासून कारच्या फिचर्ससुद्धा चर्चेचा विषय ठरतात. भारतीय ऑटो क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणारी एक कंपनी म्हणजे मारुती वॅगन आर.

मागील 25 वर्षांचा आढावा घेतला असला मारुतीला मागे टाकणं एकाही कार ब्रँडला जमलेलं नाही. मध्यमवर्गीय ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवत दमदार कार डिझाईन सादर करणाऱ्या या कंपनीचं वर्चस्व आता मात्र धोक्यात येऊ शकतं आणि त्यास आव्हान देणारी कंपनी आहे ह्युंडई. 6 लाखाच्या परवडणाऱ्या बजेटमध्ये ह्युंडईनं बाजारात आणलेल्या हॅचबॅक कारमुळं मारुती वॅगन आरला धोबीपछाड मिळताना दिसत आहे.

लाँच होऊन 18 वर्षांनंतर ह्युंडईची ही कार दमदार प्रदर्शन करत असून, तिनं अगदी सहजपणे ग्राहकपसंतीच्या श्रेणीत मारुतीच्या कारला मागे टाकलं आहे. 2007 मध्ये ही कार पहिल्यांदा भारतीय ऑटो क्षेत्रात दाखल झाली होती. ड्युअल एअरबॅगची सुविधा देणाऱ्या कारच्या सुरुवातीच्या पर्वातील कार, अशीही ह्युंडईच्या या कारची ओळख.

या कारमध्ये 18 वर्षांपूर्वी काही अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित सुविधा देण्यात आल्या होत्या. यामध्ये एबीएस, चावीशिवाय असणारे डोअरलॉक अशा फिचरचा समावेश होता. या सुविधा देणारी ही पहिलीच कार ठरली होती. याच कारनं आता चक्क मारुती वॅगन आरच्या विक्रीला मागे टाकत विक्रमी खपाचा नवा पल्ला गाठला आहे.

दोन्ही गाड्यांच्या एकूण विक्रीवर नजर टाकल्यास मारुती वॅगन आरच्या आतापर्यंतच्या 25 वर्षांच्या प्रवासात एकूण 34 लाख कारची विक्री करण्याक आली. तर, ह्युंडई आय10 नं फक्त 18 वर्षांमध्येच 33 लाख कार युनिटची विक्री करत एक नवा विक्रम रचला. आतापर्यंत या कारचे 3 जनरेशन मॉडेल भारतात लाँच झाले असून, यामध्ये ह्युंडई आय10, ग्रँड आय10 आणि ग्रँड आय 10 एनआयओएसचा समावेश आहे.

ह्युंडई आय10 च्या 20 लाख युनिटची भारतात विक्री झाली असून, कंपनीनं 13 लाख युनिट भारतात तयार करून 140 देशांमध्ये एक्सपोर्ट केल्याचं सांगण्यात येत आहे. भारतातून या कारची विक्री दक्षिण आफ्रिका, मेक्सिको, चिली, पेरु अशा देशांमध्ये करण्यात आली आहे.

कारचं दमदार इंजिन जमेची बाजू

ह्युंडईच्या या तिन्ही जनरेशनच्या कार त्यांच्या दमदार इंजिनसाठी ओळखल्या जातात. ह्युंडई ग्रँड आय10 एनआयओएसमध्ये 1.2 लीटर कप्पा पेट्रोल मॅन्युअल, 1.2 लीटर कप्पा पेट्रोल एएमटी  आणि 1.2 लीटर बाय-फ्यूल कप्पा पेट्रोल सीएनजी पावरट्रेन ऑप्शन असे पर्याय उपलब्ध आहेत.

हेसुद्धा वाचा : अविश्वसनीय! घराचा आराखडा, हाडांच्या वस्तू…महाराष्ट्रात सापडले 3000 वर्षांपूर्वीच्या सभ्यतेचे भारावणारे अवशेष

कारच्या किमतीविषयी सांगावं तर, ह्युंडई आय10 एनआयओएस 5.98 लाख रुपये इतक्या बेस प्राईजपासून विकली जाते. तर, तिच्या टॉप वर्जनसाठी 9.70 लाख इतकी किंमत मोजावी लागते. ही कार पहिल्यांदाच खरेदी करणाऱ्या वर्गाची टक्केवारी 45 टक्के इतकी असून भारतात बजेट फॅमिली कारच्या शोधात असणाऱ्यांसाठी उत्तमोत्तम सुविधा दिल्यानंच या कारनं मारुतीला सहजासहजी मागे टाकता आलं आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शिवसेना ठाकरे गटाला संसदेतील कार्यालय रिकामे करावे लागणार:फूट पडल्यानंतर खासदारांची संख्या घटली; किमान 5...

0
शिवसेना (UBT) ला संसद भवनातील त्यांचे सध्याचे कार्यालय रिकामे करावे लागू शकते. संसद भवनाच्या नियमांनुसार, फक्त 5 किंवा त्याहून अधिक खासदार असलेल्या पक्षाला...

सिगारेट न दिल्याने वृद्धाचा खून:अमरावतीत एकाला अटक, दोन आरोपी फरार

0
सिगारेट न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका ६५ वर्षीय वृद्धाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. ही घटना बुधवार, २४ जून रोजी सकाळी राजापेठ पोलीस...

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात फेरबदल मंत्र्यांची यादी अपडेट; AAP TMC शिवसेना खासदार

0
मराठी बातम्याराष्ट्रीयपंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात फेरबदल मंत्र्यांची यादी अपडेट; AAP TMC शिवसेना खासदार | भाजपनवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी...

बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीचे योग आणि तूळ राशीचे लोक मोठ्या योजनेवर काम...

0
बुधवार, २४ जून रोजी मेष राशीच्या व्यक्तींचे नवीन संपर्क बनतील आणि कामात लोकांचे सहकार्य मिळेल. मिथुन राशीच्या व्यक्तींना आई किंवा घरातील एखाद्या महिलेच्या...
spot_img

Vaibhav Suryawanshi ICC Rules Separate Dressing Room England

0
क्रीडा डेस्क4 तासांपूर्वीलिंक कॉपी करा15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी इंग्लंड दौऱ्यावर संघातील इतर खेळाडूंपेक्षा वेगळा ड्रेसिंग रूम वापरेल. सूर्यवंशीसाठी हा निर्णय आयसीसी (ICC) आणि...

कारच्या हेडलाइटमधून दिसेल सिनेमा:सारख्या चेहऱ्यामुळे 17 वर्षे निर्दोष व्यक्ती तुरुंगात राहिला; मशरूम खाल्ल्याने महिलेची...

0
चिनी टेक कंपनी हुआवे ने असे स्मार्ट हेडलाइट सादर केले आहे ज्यामुळे लोक सिनेमाचा आनंद घेऊ शकतात. दुसरीकडे, अमेरिकेत एका निर्दोष व्यक्तीला 17...

संजय लीला भन्साळींविरुद्ध FIRची मागणी:लव्ह अँड वॉरच्या सेटवर विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू, असोसिएशनने...

0
संजय लीला भन्साळींचा आगामी चित्रपट ‘लव्ह अँड वॉर’ सेटवर झालेल्या अपघातानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटाचे शूटिंग मुंबई फिल्मसिटीजवळच्या रॉयल पंप स्टुडिओमध्ये सुरू...

मेटा, ॲमेझॉन सारख्या कंपन्यांमध्ये AIचा वापर मर्यादित:वेगाने येणारे नवीन मॉडेल महाग झाल्याने खर्च वाढला;...

0
या वर्षाच्या सुरुवातीला टेक कंपन्या कर्मचाऱ्यांना अधिकाधिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वापरण्यासाठी प्रोत्साहित करत होत्या. अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांमध्ये एआय टूल्सवर खर्च होणाऱ्या 'टोकन'च्या संख्येवरून...
error: Content is protected !!