Homeदेश-विदेशभोपाळ बलात्कार आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणात एकाच वेळी तीन मुलींवर बलात्कार करण्यासाठी आरोप...

भोपाळ बलात्कार आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणात एकाच वेळी तीन मुलींवर बलात्कार करण्यासाठी आरोप केला


भोपाळ बलात्कार आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणः मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये अनेक तरुणींवर  बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलींना ब्लॅकमेल करुन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला जात होता. दोन सख्ख्या बहिणींनी तक्रार केल्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला. दरम्यान आरोपींच्या क्रूरतेचा व्हिडीओ समोर आला असून तो पाहिल्यानंतर पोलीसही हादरले आहेत. आरोपींना यामध्ये दोन तरुणीही साथ देत होत्या. ज्या मुलींचं ब्रेनवॉशिंग करायच्या. या तरुणी एखाद्या एजंटप्रमाणे काम करत होत्या. मुलींना जाळ्यात ओढून त्यांना मोठी स्वप्नं दाखवणं हे त्यांचं काम होतं. ते पूर्ण कऱण्यासाठी आरोपींशी मैत्री करणं गरजेचं आहे असं त्या भासवत होत्या. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.

भोपाळमध्ये बलात्कार आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणात बळी पडलेल्या दोन सख्ख्या बहिणींच्या तक्रारीनंतर, आरोपींच्या क्रूरतेचे व्हिडिओही समोर आले आहेत. हे पाहून पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली आहे. एका व्हिडिओमध्ये, मास्टरमाइंड आरोपी तीन मुलींवर एकत्रित बलात्कार करताना दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये, मुलीला सिगारेटने चटके देत असल्याचं दिसत आहे. इंदूरमध्येही या टोळीने केलेले गुन्हे समोर आले आहेत.

भोपाळच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीने आपण कशाप्रकारे आरोपीच्या जाळ्यात अडकलो हे सांगितं आहे. तिच्या एका मैत्रिणीने आरोपीशी मैत्री करुन दिली होती. यानंतर त्याने एक एक तर दोन्ही बहिणींना जाळ्यात ओढलं आणि लैंगिक अत्याचार करतानाचे व्हिडीओ शेअर केले. यानंतर त्याने इतका त्रास दिला की, अखेर त्यांना कॉलेज सोडावं लागलं.

विरोध केल्यानंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

मोठ्या बहिणीने सांगितलं की, आरोपीने आधी मैत्री करुन नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. यानंतर त्याने बलात्कार केला. जेव्हा लग्नाची विचारणा करण्यात आली तेव्हा त्याने धर्मांतर करण्यास सांगितलं. विरोध केल्यानंतर लैंगिक अत्याचाराच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तिच्या छोट्या बहिणीलाही अशाच प्रकारे फसवण्यात आलं.

इंदूर पोलिसांना पत्र

आरोपी मुलींना निर्घृण मारहाण करायचे. तसंच याचे व्हिडिओही बनवायचे आणि मोबाईलमध्ये सेव्ह करायचे. विद्यार्थ्यावर क्रूर अत्याचार केल्याचा व्हिडिओ देखील सापडला आहे. डीसीपी संजय अग्रवाल यांनी इंदूर पोलिसांना एक पत्र पाठवलं असल्याचं सांगितलं आहे.

एकाच वेळी तीन मुलींवर बलात्कार

टोळीचा प्रमुख फरहान याच्या मोबाईल फोनवरून पोलिसांना त्याचे क्रूर कृत्य दाखवणारे व्हिडिओ सापडले आहेत. एका व्हिडिओमध्ये तो तीन मुलींवर एकत्र बलात्कार करताना दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये पीडितेला सिगारेटने जाळताना दिसत आहे.

या टोळीच्या जाळ्यात एक डझनहून अधिक मुली अडकल्याचा पोलिसांना संशय आहे. यामधील एक मुलगी अल्पवयीन आहे. पोलिसांनी आरोपीच्या मोबाईलमधून डझनभरापेक्षा जास्त अश्लील व्हिडीओ मिळाले आहेत. पोलिसांनी डिलीट केलेले व्हिडीओही रिकव्हर केले आहेत. पोलीस व्हिडीओत दिसणाऱ्या तरुणींची ओळख पटवत आहेत.

आरोपी मोबाईलमधील व्हिडीओ कुठे शेअर करायचा याची माहिती पोलीस मिळवत आहेत. आरोपीने पॉर्न इंडस्ट्रीला हे व्हिडीओ पाठवले तर नाहीत ना याचा पोलिसांना संशय आहे. यासाठी त्याच्या बँक खात्याची छाननी केली जात आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!