Homeमनोरंजनकाश्मीर आमचा हा संदेश मुंबई अभिनेता अतुल कुलकर्णी येथे बसला जाऊ शकला...

काश्मीर आमचा हा संदेश मुंबई अभिनेता अतुल कुलकर्णी येथे बसला जाऊ शकला नाही.


वेडा पर्यटन अतुल कुलकर्णी: काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला असून आता पर्यटक काश्मीरमध्ये परतणार की नाही याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. असं असतानाच मराठमोळा अभिनेता अतुल कुलकर्णी थेट पहलगाममध्ये पोहोचला आहे. 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने आपल्याला फार वाईट वाटल्याचं अतुल कुलकर्णीने म्हटलं आहे. तसेच 90 टक्के पर्यटकांनी बुकिंग रद्द केल्याचं पाहून आपण फार दुखी झालो आहोत, असंही अतुल कुलर्णीने म्हटलं आहे. याच कारणामुळे आपण काश्मीरला भेट देत असल्याचं अतुल कुलर्णीने म्हटलं आहे. मुंबईमध्ये बसून केवळ चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन संदेश देणं मला महत्त्वाचं वाटलं, असंही अतुल कुलकर्णी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

…म्हणून मुंबईहून काश्मीरला आलो

“22 एप्रिल रोजी घडलेली ही घटना फारच धक्कादायक होती. हे घडायला नको होतं. संपूर्ण देश यामुळे दुखी झाला आहे. मी याबद्दल वाचलं तेव्हा मला असा प्रश्न पडला की अशावेळी आपण काय करतो? आपण सोशल मीडियावर पोस्ट करतो, लोकांबरोबर बोलतो आणि काहीतरी लिहीतो. मात्र मी प्रत्यक्षात कृती म्हणून काय करु शकतो असा विचार केला,” असं अतुलने एएनआयशी बोलताना सांगितलं.

“त्यावेळी माझ्या वाचनामध्ये असं आलं की 90 टक्के पर्यटकांनी येथील बुकींग रद्द केल्या आहेत. त्यांना (दहशतवाद्यांना) नेमका काय संदेश द्यायचा आहे याचा मी विचार करु लागलो. ते खरं तर असं म्हणत आहेत की काश्मीरमध्ये येऊ नका. मात्र याला आपण कसं उत्तर दिलं पाहिजे की, आम्ही येणार. काश्मीर आमचं आहे. मला हा संदेश मुंबईत बसून देता आला नसता. म्हणूनच मी स्वत: इथे येणं महत्त्वाचं होतं,” असं अतुल कुलकर्णी म्हणाला.

रिकाम्या सीट्स

अतुल कुलकर्णीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन मुंबईवरुन श्रीनगरच्या प्रवासादरम्यानच्या काही पोस्ट केल्या होत्या. त्याने विमानातील बहुतांश सीट रिकाम्या असल्याचा आणि स्वत:च्या बोर्डींग पासचा फोटो पोस्ट केलेला.

पुन्हा एकदा ही विमानं भरली पाहिजेत

अतुलने विमानातील कर्मचाऱ्यांना त्याला दिलेल्या छोट्या चिठ्ठीचाही फोटो शेअर केला. “मुंबई ते श्रीनगर. विमानातील कर्मचारी सांगत आहेत की विमानं पूर्ण क्षमतेनं जात होती. आता आपल्याला पुन्हा एकदा ही विमानं भरुन जातील असं पाहिलं पाहिजे. चला, काश्मीरला जाऊ,” असं कॅप्शनमध्ये लिहिलं होतं.

रिकाम्या पर्यटनस्थळांचे फोटोही पोस्ट केले

अतुलने पेहलगाममधील पर्यटनस्थळांचे फोटोही पोस्ट केला आहे. या फोटोंमध्ये पर्यटनस्थळं रिकामी असल्याचं त्याने दाखवलं आहे.

गर्दीच नाही

या ठिकाणांवर सामान्यपणे प्रचंड गर्दी असते. आता या ठिकाणी फारच मोजके लोक दिसत असल्याचं अतुलला अधोरेखित करायचं आहे.

कवितेसहीत पोस्ट

अतुलने इतरही अनेक फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केले आहेत. एका फोटोत स्थानिक काश्मिरी लोकांनी, “आम्ही या हल्ल्याचा निषेध करतो” असा मजकूर लिहिलेला दिसतोय तर इतर लोक भारतीय झेंडे पकडून उभे आहेत. अतुलने कवितेसहीत स्वत:चे दोन फोटो पोस्ट केले आहेत.

अनेकांनी अतुलने घेतलेल्या या भूमिकेचं कौतुक केल्याचं दिसत आहे. त्याच्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

या गोष्टींसोबत जांभूळ खाऊ नका:होऊ शकते गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, जाणून घ्या याचे फायदे, खाण्याची...

0
पाऊस सुरू होताच बाजारात जांभळांची रेलचेल सुरू होते. आंबट-गोड चवीचे हे गडद जांभळ्या रंगाचे फळ पोषक तत्वांचा खजिना आहे. यात फायबर, लोह, व्हिटॅमिन...

नाचते हुए मरी तो मिसाल बन जाउंगी!:’ईठा’चा थक्क करणारा टीझर रिलीज; लावणी सम्राज्ञी विठाबाईंच्या...

0
'स्त्री २' या ऐतिहासिक यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर कोणत्या भूमिकेत दिसणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर मॅडॉक फिल्म्सने श्रद्धाच्या आगामी 'ईठा'...

ब्रिटनच्या ‘पहिल्या गे वडिलांवर’ बाल लैंगिक गुन्ह्यांचे आरोप:’पती’सह 18 नवीन प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल

0
ब्रिटनमध्ये 'पहिले गे वडील' म्हणून प्रसिद्ध असलेले व्यावसायिक बॅरी ड्रुइट-बार्लो आणि त्यांचे 'पती' स्कॉट ड्रुइट-बार्लो यांच्यावर बाल लैंगिक गुन्हे आणि बलात्कार यासह 18...

टाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग

0
मराठी बातम्याव्यवसायटाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग | ऍपल टेस्ला गुप्त फायलीनवी दिल्ली6 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटाटा ग्रुपची कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा डेटा...
spot_img

या गोष्टींसोबत जांभूळ खाऊ नका:होऊ शकते गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, जाणून घ्या याचे फायदे, खाण्याची...

0
पाऊस सुरू होताच बाजारात जांभळांची रेलचेल सुरू होते. आंबट-गोड चवीचे हे गडद जांभळ्या रंगाचे फळ पोषक तत्वांचा खजिना आहे. यात फायबर, लोह, व्हिटॅमिन...

नाचते हुए मरी तो मिसाल बन जाउंगी!:’ईठा’चा थक्क करणारा टीझर रिलीज; लावणी सम्राज्ञी विठाबाईंच्या...

0
'स्त्री २' या ऐतिहासिक यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर कोणत्या भूमिकेत दिसणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर मॅडॉक फिल्म्सने श्रद्धाच्या आगामी 'ईठा'...

टाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग

0
मराठी बातम्याव्यवसायटाटा इलेक्ट्रॉनिक्स डेटा ब्रीचचा वाद; डार्क वेब हॅकिंग | ऍपल टेस्ला गुप्त फायलीनवी दिल्ली6 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटाटा ग्रुपची कंपनी टाटा इलेक्ट्रॉनिक्सचा डेटा...

Mbappe पहिला खेळाडू 6 वेळा 2+ गोल; फ्रान्स, नॉर्वे अंतिम ३२ मध्ये पोहोचले

0
16 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराफ्रान्सचा स्टार फॉरवर्ड किलियन एमबाप्पे वर्ल्ड कपच्या इतिहासात एका सामन्यात दोन किंवा अधिक गोल सर्वाधिक वेळा करणारा खेळाडू बनला आहे....
error: Content is protected !!