Homeदेश-विदेशपंतप्रधान मोदी मान की बाट गुन्हेगारांना पहलगम दहशतवादी हल्ल्याच्या षडयंत्रकारांना उत्तर मिळेल

पंतप्रधान मोदी मान की बाट गुन्हेगारांना पहलगम दहशतवादी हल्ल्याच्या षडयंत्रकारांना उत्तर मिळेल


पहलगम दहशतवादी हल्ला मोदी मान की बाट: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज आपल्या मासिक ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 121 व्या भागामध्ये देशाला संबोधित केलं. पंतप्रधान मोदींनी यावेळेस पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात आपल्या भावना व्यक्त करताना, या हल्ल्याने संपूर्ण देश दुखी असल्याचं सांगितलं. दहशतवादी “हल्ल्याचे फोटो पाहून प्रत्येक भारतीयाचा संताप आणि रक्त उसळून येत आहे. हा हल्ला दहशतवाद्यांचा दुबळेपणा दाखवतो. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होत होती. विकास कामांना गती मिळत होती हे दहशतवाद्यांना पाहवलं नाही”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले, आपली सर्वात मोठी ताकद म्हणजे…

“जम्मू-काश्मीरमधील पर्यटकांच्या संख्येत विक्रमी वाढ होत होती. या माध्यमातून स्थानिकांच्या कमाईमध्ये वाढ होत होती. मात्र दहशतवाद्यांना हे सारं सहन झालं नाही”, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. “दहशतवादाविरूद्धच्या या लढाईमध्ये 140 कोटी भारतीयांनी एकत्र राहणं ही सर्वात मोठी ताकद आहे. ही आपल्यामधील एकताच आपल्या दहशतवादाविरूद्धच्या लढाईमधील सर्वात मोठा आधार आहे”, असंही मोदींनी म्हटलं आहे.

पीडितांच्या कुटुंबियांना दिलं आश्वासन

दहशतवादी हल्ल्याबद्दल बोलताना पंतप्रधानांनी, “आज जग पाहत आहे की संपूर्ण भारत या दहशतवादी हल्ल्याविरोधात एकाच स्वरात आवाज उठवत आहे. भारतामधील लोकांमध्ये जो संताप आहे तोच संपूर्ण जगात आहे. मला अनेक अंतरराष्ट्रीय नेत्यांचे फोन आले. त्यांनी मला विशेष मेसेजही पाठवले. या हल्ल्याचा सर्वांनीच निषेध खेला आहे. सर्वांनीच मयत व्यक्तींच्या कुटुंबांबद्दल सांत्वना व्यक्त केली. संपूर्ण जग या लढाईमध्ये आपल्यासोबत आहे. पीडितांच्या कुटुंबियांना मी विश्वास देऊ इच्छितो की त्यांना नक्कीच न्याय मिळेल. हा कट रचणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जाईल,” असं आश्वासन दिलं.

यासाठीच दहशतवाद्यांनी एवढा मोठा कट रचला

दहशतवाद्यांनी पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला करण्याचा कट का रचला याबद्दलही पंतप्रधानांनी भाष्य केलं. “या दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील वेगवेगळ्या राज्यांमधील, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या नागरिकांना पिडितांच्या दुखाचा अंदाज आहे. दहशतवाद्यांच्या हस्तकांना पुन्हा एकदा काश्मीर उद्धवस्त झालेलं पाहायचं आहे. त्यासाठीच त्यांनी एवढा मोठा कट रचला. देशासमोरच्या या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्याला ठामपणे उभं राहायला हवं”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

‘सचेत’ अॅप्लिकेशनबद्दल केलं भाष्

पंतप्रधान मोदींनी मन की बातमध्ये ‘सचेत’ नावाच्या अॅप्लिकेशनबद्दलही भाष्य केलं. “नैसर्गिक आपत्तींमध्ये तुम्ही अडकून पडू नये यासाठी हे अॅप्लिकेशन भारतीयांना फायद्याचं ठरु शकतं,” असं पंतप्रधानांनी सांगितलं. “हे अॅप्लिकेशन भारताच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनक प्राधिकरणाने विकसित केलं आहे. ‘सचेत’ अॅप्लिकेशनचा हेतू हा लोकांना मदत करण्याचा आणि त्यांना सुरक्षित ठेवण्याचा आहे. या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून हवामानाचे अपडेट्स मिळवता येतील,” असं मोदींनी भारतीयांना सांगितलं. तसेच हे अॅप्लिकेशन अनेक स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध असल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!