Homeदेश-विदेशजपानमधील चॅटरपती शिवाजी महाराज पुतळा तयार करणारे भारतीय जपानी राजकारणी योगेंद्र पुराणक...

जपानमधील चॅटरपती शिवाजी महाराज पुतळा तयार करणारे भारतीय जपानी राजकारणी योगेंद्र पुराणक बद्दल जाणून घ्या टोकियो मराठी अध्यापनाचा आग्रह धरतात


जपानमधील चॅटरपती शिवाजी महाराज पुतळा: पुण्यातून जपानमध्ये स्थायिक झालेल्या एका व्यक्तीने आपल्या जपानमधील घरासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे. यासंदर्भातील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही व्यक्ती जपानमधील आमदार आहे. या व्यक्तीचा प्रवास खरोखरच थक्क करणारा असून एका मराठमोळ्या व्यक्तीने नुकतीच त्यांना जपानमध्ये भेट दिली त्यावेळी त्यांना आलेला अनुभव त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासोबत या आमदाराचा फोटो शेअर करत सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मराठी शिकवण्याचा जपानमध्ये आग्रह

विजय मंगल दत्तात्रय गाढवे यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट लिहिली असून या पोस्टमध्ये एक इसम जपानमधील त्याच्या घराबाहेर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या बाजूला उभा असल्याचं दिसत आहे.

या पोस्टमध्ये गाढवे यांनी, “काल मी आणि माझी फॅमिली जपानमधील टोकियोमध्ये कसाई भागात एका मराठी अवलियाला भेटायला गेलो. पुण्यात शनिवार पेठेत जुनी पोलीस चौकी येथे त्यांचा वाडा होता. तो माणूस 1995 ला जपानची स्कॉलरशिप घेऊन जपानला येतो काय आणि तिथे एका प्रायव्हेट शाळेचा प्रिन्सिपल होतो. आई तिथे पुरण पोळी ते साबुदाणा खिचडीपर्यंत व सर्व भारतीय चटण्या तसेच भारतीय पोशाख शिवते व भारतीय रेस्टोरंट चालवते. हा माणूस स्वतः तीन मजली प्रचंड मोठ घर बांधतो व संपूर्ण घर मराठी पुस्तकं व तसेच मराठी भाषा शिकवण्याचे कलासेस व सर्व जपानी शाळांना आग्रह धरणारा व्यक्ती ठरतो,” असं म्हटलं आहे.

10 लाख रुपयांचा खर्च करुन पुण्यातून नेला पुतळा

“जपानमध्ये भारतीय माणूस नंतर तिथं आमदार होतो. अजून बरंच काही आहे. सगळ्यावर कळस म्हणजे आता त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्या घराशेजारी उभारला. पुण्यातील खटावकर यांनी तो तयार केला. तो जपानला विमानाने 10 लाख रुपये फक्त वाहतूक खर्च करुन आणला व 8 मार्च 2025 ला उभारला. सुमारे 900 भारतीय लोक उपस्थित होते. यांच्याकडे सुमारे छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेली 300 हस्तलिखित पत्रांचा खजिना आहे. त्यांनी आम्हाला सर्व घर दाखवून सुमारे 2 तास आमच्याशी गप्पा मारल्या आणि एक अंकल्पित दिवस साजरा झाला. त्या माणसाचं नांव आहे योगेंद्र पुराणिक,” असंही गाढवे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

ही व्यक्ती आहे तरी कोण?

योगेंद्र पुराणिक हे जपानमधील आमदार आहे. त्यांचा जन्म 3 जून 1977 साली झाला आहे. ज्यांचे टोपणनाव योगी असे आहे. योगेंद्र यांची जपानमधील ओळख भारतीय वंशाचे जपानी राजकारणी अशी आहे. जपानमध्ये निवडणूक जिंकणारे योगेंद्र हे भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती आहेत. एप्रिल 2019 मध्ये ते टोकियोच्या एडोगावा सिटी असेंब्लीवर सिटी कौन्सिलर म्हणून निवडून आले. त्यांना जपानच्या कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रॅटिक पार्टीने पाठिंबा दिला होता.

एप्रिल 2022 मध्ये, पुराणिक यांची इब्राराकी प्रीफेक्चरमधील त्सुचिउरा फर्स्ट हायस्कूलचे प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीमुळे योगेंद्र हे जपानमधील सार्वजनिक (सरकारी) शाळेतील पहिले परदेशी वंशाचे प्राचार्य आणि जपानमधील पहिले भारतीय वंशाचे राजपत्रित प्रशासकीय सेवा अधिकारी ठरले. या शाळेत हायस्कूल, ज्युनियर हायस्कूल आणि नाईट स्कूल आहे. योगेंद्र यांच्या नेतृत्वाखालील शाळेत एकूण 1100 हून अधिक विद्यार्थी आणि 100 शिक्षक आहेत. ही शाळा जपानमधील सर्वोच्च दर्जाच्या शाळांपैकी एक आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

विजयचा नवीन चित्रपट चर्चेत:’स्त्री’ च्या निर्मात्यांसोबत विजय देवरकोंडा हातमिळवणी करू शकतो, पॅन-इंडिया चित्रपटाची तयारी

0
तेलुगू सिनेमातील मोठा स्टार आणि सतत आपल्या करिअरची दिशा बदलताना दिसणारा विजय देवरकोंडा आणखी एका मोठ्या प्रोजेक्टबद्दल चर्चेत आहेत. इंडस्ट्रीच्या गल्लीबोळात जोरदार चर्चा...

बांगलादेशच्या पंतप्रधानांचे विशेष सहाय्यक दिल्ली विमानतळावर थांबले, आयओआरएच्या बैठकीला उपस्थित न राहता परतले

0
मराठी बातम्याआंतरराष्ट्रीयबांगलादेशच्या पंतप्रधानांचे विशेष सहाय्यक दिल्ली विमानतळावर थांबले, आयओआरएच्या बैठकीला उपस्थित न राहता परतलेढाका3 तासांपूर्वीलिंक कॉपी कराबांगलादेशच्या पंतप्रधानांचे सल्लागार डॉ. जाहेद उर रहमान...

चांदी ₹8,429 ने वाढून ₹2.51 लाखांवर पोहोचली:या वर्षी किंमत ₹21 हजारने वाढली, सोनं आज...

0
सोन्या-चांदीच्या दरात 15 जून रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी 8,429 रुपयांनी वाढून 2.51 लाख...

ओबीसी आरक्षणाची 50 टक्के मर्यादेत कोंडी:ओबीसी मुक्ती मोर्चाची भुजबळ-बावनकुळेंच्या राजीनाम्याची मागणी

0
राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाने ओबीसी आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेतील कोंडी आणि कोट्यात झालेल्या कपातीवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी मंत्री छगन भुजबळ...
spot_img

विजयचा नवीन चित्रपट चर्चेत:’स्त्री’ च्या निर्मात्यांसोबत विजय देवरकोंडा हातमिळवणी करू शकतो, पॅन-इंडिया चित्रपटाची तयारी

0
तेलुगू सिनेमातील मोठा स्टार आणि सतत आपल्या करिअरची दिशा बदलताना दिसणारा विजय देवरकोंडा आणखी एका मोठ्या प्रोजेक्टबद्दल चर्चेत आहेत. इंडस्ट्रीच्या गल्लीबोळात जोरदार चर्चा...

चांदी ₹8,429 ने वाढून ₹2.51 लाखांवर पोहोचली:या वर्षी किंमत ₹21 हजारने वाढली, सोनं आज...

0
सोन्या-चांदीच्या दरात 15 जून रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी 8,429 रुपयांनी वाढून 2.51 लाख...

फिफा विश्वचषकात आज काबो वर्डे संघाचे पदार्पण:2010 च्या चॅम्पियन स्पेनशी सामना; स्पर्धेत पहिल्यांदाच बेल्जियम...

0
फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये आज स्पेनचा सामना पहिल्यांदाच टूर्नामेंट खेळणाऱ्या काबो वर्डे संघासोबत होईल. दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने येतील. हा सामना अटलांटा...

फुटबॉल विश्वचषकादरम्यान इराणी प्रशिक्षण-केंद्राबाहेर मृतदेह सापडला:संघाने कॅम्प अमेरिकेतून मेक्सिकोला हलवला होता; उद्या न्यूझीलंडविरुद्ध पहिला...

0
फुटबॉल विश्वचषकादरम्यान, इराण फुटबॉल संघाच्या प्रशिक्षण तळाजवळ एका कारमध्ये मृतदेह आढळल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी स्टेडियमबाहेर उभ्या असलेल्या कारच्या डिक्कीतून मृतदेह ताब्यात...
error: Content is protected !!