Homeमनोरंजनआयपीएल 2025 आरसीबी वि आरआर विराट कोहलीने बाबार आझमला अनन्य रेकॉर्ड तोडले

आयपीएल 2025 आरसीबी वि आरआर विराट कोहलीने बाबार आझमला अनन्य रेकॉर्ड तोडले


विराट कोहलीने बाबर आझमचा विक्रम मोडला: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने गुरुवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यामध्ये प्रथम फंलदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्सच्या मोबदल्यात 205 धावा केल्या. बंगळुरुकडून विराट कोहलीने 70 आणि देवदत्त पडिक्कलने 50 धावांचं योगदान दिलं. कोहलीने 42 चेंडूंमध्ये आठ चौकार आणि दोन षटकार लगावले. कोहलीने आयपीएल 2025 मधील आपलं चौथं अर्धशतक झळकावलं. या खेळीबरोबरच विराटने टी-20 क्रिकेटमधील एका मोठा विक्रम स्वत:च्या नावावर करताना पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि विद्यमान सलमीवीर बाबर आझमला मागे टाकलं आहे.

विराटने कोणता विक्रम मोडला?

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यामध्ये बंगळुरुच्या संघातून विराटबरोबर इतरांनाही शक्य तितक्या धावांची भर घातली. यामध्ये फिल सॉल्टने केलेल्या 26 धावा, टिम टेव्हिडच्या 23 आणि जितेश शर्मा नाबाद 19 धावा यांचं योगदानही महत्त्वाचं ठरलं. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना विराटने अर्थशकत झळकावत पहिल्यांदा फलंदाजी करताना सर्वाधिक अर्धशतकं झळकावण्याचा टी-20 क्रिकेटमधील विक्रम स्वत:च्या नावावर करुन घेतला. विराटने टी-20 मध्ये 62 वं अर्थशतक झळकावलं आहे.

या यादीत कोण कितव्या स्थानी?

बाबर आझमने टी-20 मध्ये प्रथम फलंदाजी करताना एकूण 61 वेळा अर्थशतक झळकावलं आहे. तुफान फटकेबाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलने टी-20 मध्ये अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम 57 वेळा केला आहे. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने टी-20 मध्ये 55 अर्धशतकं झळकावली आहेत. जॉस बटलरनेही 52 अर्धशतकं टी-20 मध्ये झळकावलीयेत. 52 वेळा अर्धशतक झळकावणाऱ्यांमध्ये फॅफ ड्युप्लेसीचाही समावेश आहे.

बंगळुरुची तिसऱ्या स्थानी झेप

बंगळुरुच्या संघाने दिलेलं 206 धावांचं आव्हान राजस्थानच्या संघाला पेलवलं नाही. राजस्थानच्या संघाला निर्धारित 20 ओव्हरमध्ये  194 धावांपर्यंत मजल मारता आली. आयपीएलमधील हा 42 वा सामना बंगळुरुने 11 धावांनी जिंकला. हा बंगळुरुचा या स्पर्धेतील सहावा विजय ठरला आहे. बंगळुरुचा संघ या विजयासहीत थेट तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. बंगळुरुच्या वर केवळ गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन संघ असून त्यांनीही प्रत्येकी सहा विजय मिळवले आहेत. मुंबईचा संघ 5 विजयांसहीत चौथ्या स्थानी तर पंजाबच्या संघ पाच विजयांसहीत पाचव्या स्थानी आहे.

लखनऊचा संघ सहाव्या स्थानी असून त्यांनी 9 पैकी 5 सामने जिंकलेत. कोलकात्याच्या संघाला 8 पैकी 3 सामने जिंकता आल्याने हा संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये सातव्या स्थानी आहेत. राजस्थानचा बंगळुरुविरुद्धचा पराभव हा सातवा पराभव ठरला आहे. राजस्थान आठव्या, सनरायझर्स हैदराबाद नवव्या आणि चेन्नई सुपर किंग्जचा संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये दहाव्या स्थानी आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!