Homeमनोरंजनरितेश देशमुख राजा शिवाजी मूव्ही सेट अपघात कनिष्ठ कलाकार डेड बॉडी 36...

रितेश देशमुख राजा शिवाजी मूव्ही सेट अपघात कनिष्ठ कलाकार डेड बॉडी 36 तासांनंतर सापडला


विधी देशमुख: प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) हा महाराष्ट्राचं आराध्यदैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. यात रितेश स्वतः छत्रपती शिवरायांची भूमिका साकारत असून तो या चित्रपटाचं दिग्दर्शन सुद्धा करतोय. मात्र या चित्रपटाचं शुटिंग सुरु असताना एका घटनेमुळे याला गालबोट लागलं आहे. साताऱ्यात माहुली संगममध्ये ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचं शूट सुरु असताना रितेशच्या एका सहकलाकाराचा नदीत बुडून मृत्यू झाला. तब्बल 36 तासांनी अखेर त्याचा मृतदेह सापडला आहे.

नेमकं काय घडलं होतं?

दिग्दर्शक रितेश देशमुख आणि निर्माती जिनिलिया देशमुख यांचाय मुंबई फिल्म कंपनीकडून या घटनेविषयीचं अधिकृत निवेदन जाहीर केलं. यात त्यांनी म्हटले की, ‘संगम माहुली मंदिर, सातारा इथे आमच्या आगामी चित्रपटाचं शूट सुरु असताना ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली. दोन दिवसांचं शूटिंग निर्विघ्न पार पडलं होते. दुस-या दिवशीचे पॅकअप झाल्यानंतर, सगळे हॉटेलकडे परतण्याच्या तयारीत असताना काही कलाकार जवळच्या नदीपात्रात पोहण्यासाठी उतरले होते. ह्यामध्ये आमचा डान्स कलाकार सौरभ शर्मा हा देखील होता आणि दुर्दैवाने तो नदीपात्रात हरवला.

सदर बातमी समजताच, तातडीने अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुख, निर्मात्या जिनेलिया देशमुख आणि नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा हे संपूर्ण टीमसह तात्काळ नदीकाठी पोहोचले. सौरभ याला शोधण्यासाठी विनाविलंब स्थानिक पोहणा-यांची मदत घेण्यात आली आणि लगेच चित्रीकरणाच्या ड्रोनचा शोधकार्यसाठी वापर करण्यात आला. रितेश देशमुख यांनी साताऱ्याचे जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून शोधमोहीम वेगवान करण्याची विनंती केली. सौरभच्या कुटुंबाशी आम्ही सतत संपर्कात आहोत आणि त्यांना संपूर्ण मदत करत आहोत. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पुढील शुटिंग आम्ही स्थगित करत आहोत. सदर घटनेनंतर चित्रपटाचं शूटिंग थांबवण्यात आलं होतं.

हेही वाचा : आमदाराची मुलगी, 16 वर्षांच्या करिअरमध्ये दिला फक्त 1 ब्लॉकबस्टर, तुम्ही ओळखलं का?

36 तासांनंतर सापडला मृतदेह :

अखेर 36 तासांनंतर सौरभ शर्माचा मृतदेह सापडला आहे. साताऱ्यातील शिवेंद्रराजे रेस्क्यु टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड ट्रेकर्स यांनी शोधमोहीम सुरु ठेवली होती. दरम्यान त्यांच्या या शोधमोहीमेला अखेर यश मिळालं. ज्यादिवशी ही घटना घडली त्याच दिवशी सौरभला शोधण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते मात्र अंधार पडल्यानंतर शोधमोहीम थांबवण्यात आली होती. नदी पात्राच्या खोलीचा अंदाज न आल्याने सौरभ शर्माचा मृत्यू झाला असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली.

बॉलिवूडचे मोठे कलाकार साकारणार भूमिका :

रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाची प्रतीक्षा अनेक वर्षांपासून होती. हा चित्रपट म्हणजे रितेशच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक आहे. हा चित्रपट मराठीतील सर्वात बिग बजेट सिनेमा असणार अशी माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर येत असून यात संजय दत्त, फरदीन खान, अभिषेक बच्चन सारखे कलाकार चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहेत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!